Posts

Showing posts from 2020

करिअर घडवताना

Image
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. प्रयत्नांती परमेश्वर... अश्या अनेक म्हणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्येक म्हणीचा मतितार्थ हाच की, प्रयत्न आणि कष्ट केले तरच यश प्राप्ती होते.  एक सामान्य व्यक्ती प्रचंड मेहनत घेत असते, पण तरीही त्या व्यक्तीला पाहिजे तसं मेहनतीचं फळं मिळत नाही आणि मग आपण ताण, नैराश्य, औदासिन्य ह्याला सामोरे जातो. कधीकधी नशिबाला दोष देतो.  खूप पैसा असला तरीही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की, चार पैसे कमी चालतील पण ही नोकरी नको. मस्करी मध्ये आपण एवढंही म्हणतो की वडापाव विकून पैसे कमवू पण नोकरी, त्याची वेळ, त्यातलं राजकारण नको...पण तेच काही लोकांना आपण त्यांच्या करिअर मध्ये खूप समाधानी बघतो.  नक्की असं काय आहे की ते खुश आहेत पण आपण नाही?  खूप पैसा आला म्हणजे करिअर घडलं असं होतं नाही.  सगळ्यात मह्त्वाचं आहे की ह्या करिअर मधल्या नैराश्याच्या मुळाशी जाणं. जसं भारतीय आयुर्वेदात आपल्या ऋषीमुनींनी सगळ्या त्रासाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी औषध शोधली अगदी तसचं आपल्याला पण करिअर मधल्या नैराश्याला मुळापासून उखडून टाकायचं आहे.  करिअर घडवताना जसं शिक्षण महत्वाचं आहे अ

शाळेत बाई आणि घरात आई

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे." ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? "  अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात..  आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो...   " नावात काय आहे "  असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी  "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे... २०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क

गोरी गोरी पान फुलासारखी छान......

Image
" काय झालं का गाणं म्हणून?"  अहो मी तुम्हालाच विचारत आहे. शिर्षकच असं आहे की गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.. हे गाणं आपोआप आपण गुणगुणारच.  आपल्या घरातली अशी एक व्यक्ती जिच्या बद्दल आपल्याला लहानपणापासून ओढ निर्माण होते. मगं ती सख्खी वहिनी असेल किंवा चुलत मामे वहिनी , आपल्याला तिची चाहूल हवीहवीशी असते. कारण कुठेतरी आपण तिला मनातूनच बहीण मानलेल असतं.  आपल्याकडे लग्नं ठरल्या दिवसापासून मुलींकडून अपेक्षांना सुरवात होते. ती कुणाचीतरी मामी होते, कुणाचीतरी काकू होते, कुणाचीतरी वहिनी, जाऊ होते.. अशी अनेक नाती तिला सांभाळायची असतात. खूप पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. बरं बाकीची नाती निभावताना तिला तिचं लग्नाआधीच्या आयुष्याची उणीव भासते.. तिला परत ते आयुष्य जगावस वाटतं.. कारण लग्नाआधी तिच्या आयुष्यात एक मोकळीक असते.  पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर नणंद भावजया (वहिनी) ह्यांच्यावर भरपूर किस्से लिहिले जातात. आमची पिढी तर सरळ तिला तिच्या नावाने हाक मारते. मला वाटतं आपण आपल्या घरातल्या सगळ्याच व्यक्तींना बरोबर ओळखत असतो. पण वहिनीने जर का आपल्या घरातल्यांविरुद्ध काह

हक्क - महत्वाचा की नाही?🤔🤔

Image
हक्क ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच बजावयची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत पहिल्यापासूनच हक्क ह्या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. सगळ्यात जास्त महत्व तर खुर्चीवरच्या हक्काला आहे. मग ती खुर्ची राजकारणातली असुदे किंवा बस आणि ट्रेन मधली, ती ज्याला मिळाली ते नशीबवान असतात. बरं त्याच्यामुळे आजूबाजूच्या नात्यांवर काय परिणाम होतील त्याची शाश्वती नाही..  मात्र तोच हक्क तुम्ही एकमेकांवर बजावला तर त्याचे परिणाम खूपच वेगळे असू शकतात. प्रत्येक गोष्टीला जश्या सीमा असतात अगदी तश्याच प्रत्येक नात्यात सुध्दा असतात. मग ते नात बहीण भावांच असेल, मित्र मैत्रिणीच असेल, आई मुलांमधले असेल, बाबा - मुलांमधले असेल, सासू- जावई मधले असेल, सासू - सूनेतल असेल.   आपल्याला वाटतं की असं काही नसतं आणि घरातल्यांशी वागताना कुठल्याच सीमा नाही ठेऊ शकत. सत्य पचवणं आणि मानणं कठीण असतं ते हेच. एरवी आपण पूर्वजन्मी च्या गोष्टी करतो. प्रारब्धाच्या गोष्टी करतो ते मान्य असतं कारण आपल्याला सोयीस्कर वागण्याची सवय झालेली असते.  जर का घराबाहेरच्या व्यक्ती बरोबर तुमचं खूप चांगलं पटतं असेल तर लगेच आपण म्हणतो, की गे

आलोय तुमचा निरोप घ्यायला..

Image
अथिती देवो भव.. ही म्हण तुमच्या जगात आहे. निश्चितच मला अशी वागणूक मिळणारच नव्हती. कारण बीनबुलाये मेहमानाच तुम्ही माणसं किती मनापासून स्वागत करता याबद्दल पण ऐकलंय.... मी तर सगळ्यात नावडता पाहुणा.  तुम्ही सगळ्यांनी माझा शोध घेतला. माझ्या विषयी जाणून घेतलं. मी तुमच्या जवळपास पण येऊ नये म्हणून तुम्ही खूप काळजी घेतलीत. माझ्याबद्दल अपशब्द पण उच्चारले.  " काळजी करू नका, मला त्याचा राग नाही आला. मी मान्य करतो की मी चुकलो.  खरंतर तुम्हाला जवळून बघितल्यावर असं जाणवलं की तुम्ही इतकेही वाईट नाही. काहीजणांनी माझ्यासाठी  कविता रचल्या, गाणी गायली. माझ्यासाठी अगदी मंत्र , आरत्या पण रचल्या. तर काहीजणांनी माझ्यावर विनोद केले, माझी चेष्टा केली.  माझ्या जाण्यासाठी जेवढे जमतील तेवढे उपाय केलेत. तुम्हाला मी दिसत नाही याचाही राग आला, पण काय करणार मला रूपच असे दिले. म्हणूनच आता निरोप घ्यायला आलोय कारण मला माहिती आहे, एक दिवस तुम्ही मला नष्ट करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही मान्य करा किंवा नका करू माझ्या येण्याने तुमच्या जीवनशैलीत भरपूर फरक पडला. अहो लहान मुलं तर किती खुश झालेत कारण त्यांना तुमचा सहवास म

कोरोना आणि ‍ बदलते नातेसंबंध

Image
नातं, एक असा शब्द जो एकमेकांना एकमेकांशी जोडतो. मगं त्या प्रत्येक नात्याला नावं असेलच असं नाही. काही नाती ही निःस्वार्थी उद्देशाने केलेली असतात, तर काही नाती कुठल्यातरी योजनेसाठी केलेली असतात.  नातं, घरातल्यांशी असुदे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनबरोबर असुदे. नातं, निसर्गाशी असुदे किंवा देशाशी असुदे. नातं, जुन्या काळातल्या (पुरातन) गोष्टींशी असुदे किंवा नवीन तंत्रज्ञानाशी असुदे. सगळ्यात महत्वाचं आहे, ते नातं जोपासणं. मगं ते जोपासताना तुम्हाला कधीकधी योग्य वेळेची वाट बघावी लागते.  कारण नातं जोडणं कठीण आहे पण तोडण खूप सोप्पं आहे.  जशी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहे अगदी तशीच नात्याला सुद्धा आहे. मोबाईल बंद झाला तर आपण (restart) परत चालू करतो. पण (restart) परत चालू करताना थोडा वेळ थांबतो.  कारण वेळ हेच औषध आहे. पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हणतात,  योग्य वेळ आली की सगळं नीट होईल.  बरं मग ती वेळ नक्की येणार कधी हे आपल्याला माहीत नसतं पण विश्वास ठेऊन आपण त्या वेळेची वाट बघत असतो. कारण मनात कुठेतरी एक आशेचा किरण लपून बसलेला असतो, ज्याला त्या योग्य वेळेची उत्सुकता असते. जणू क

आई , बाबा आणि मी

आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे पालकत्व स्वीकारणं. आपल्याकडे असं म्हणतात की आयुष्यातला दुसरा टप्पा हा पन्नाशी ओलांडली की मग सुरू होतो. पण मला तर वाटत की दुसरा टप्पा (second inning) हि आपण बाळाचा विचार करायला लागतो तेव्हाच सुरू होतो. कारण नंतरच आयुष्य (अगदी पन्नाशी ओलांडल्यावर सुध्दा) हे मुलांच्या अवतीभोवती असतं.  बाळाचा विचार करण्यापासून ते प्रत्यक्ष आई बाबा झाल्यावर कसं वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जावं लागतं त्यावर माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.  आई बाबा आणि मी हे शीर्षक मुद्दाम ठेवले आहे कारण पालकत्वामध्ये नुसते आई बाबा नाही तर त्यांचं मुलं (एक किंवा दोन) पण तेवढाच महत्वाचा भाग असतो.  आणि म्हणूनच आई बाबा आणि मी ह्यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.  तुमचा अभिप्राय नक्की कळवा. #NehaP

अस्तित्वाची तुलना

Image
कालच मी जब वी मेट बघत होते. त्यामध्ये नायिकेच स्वतः वर खूपच प्रेम असतं. तिचा ठरलेला डायलॉग म्हणजे मैं अपनी favourite हुं | असा आहे. चित्रपट बघताना खूपच भारी वाटत. एकदम जबरी वाटतं. असं वाटायला लागतं की बासच आपणच ती नायिका आहोत आणि आज पासून मी पण म्हणणार, की मैं अपनी favourite हुं |   असं म्हणत नकळत आपण त्या नायिकेच्या भूमिकेत शिरतो आणि उगाच वाटतं की आपण तिच्या पेक्षा नक्कीच चांगला अभिनय केला असता.  पण मग आजुबाजुच्या माणसांकडे बघितलं की असं वाटतं , जणू काही मालिकांमधल्या खलनायिका किंवा खलनायक आपल्याच नशिबात आहेत. तिथेच आपण ठरवतो की साध्या आयुष्यात आपल्या अस्तित्वाची तुलना केली जाते तीच सांभाळताना नाकिनव येतो . तर हे असं दुहेरी आयुष्य सांभाळताना काय होईल आपलं. खरंच हे सगळं सांभाळणं सोप्पं नाहीये.  मात्र एक विचार नेहमी येतो की आपल्याकडे तुलना करणं कधी थांबणार. प्रत्येक गोष्टीत तुलना. लहान मुलं एकत्र खेळत असतील तरी तुलना. अभ्यास करत असतील तरी तुलना करणार. खरंतर त्या मुलांमध्ये हे विचार निर्माण करणारे आपणच आहोत. अहो मुलं निरागस असतात त्यांच्या मनात हे विचार सुध्दा नसतात. मात्र आप

मैत्रिणींनो तुमच्यासाठी..,

Image
पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हटलं जातं की, नावं ठेवणं फार सोप्पं आहे पण कौतक करणं तेवढंच कठीण.  आज मात्र मला खरंच माझ्या सगळ्या मैत्रिणींच कौतुक करावस वाटतं. आम्ही सगळ्या आधुनिक पिढीतल्या म्हणजे चूल मुलं ह्या संकल्पनेतल्या तर आम्ही नक्कीच नाही. आधीच्या पिढीतल्या नक्कीच काही कारणास्तव त्या संकल्पनेत अडकलेल्या त्यामुळे त्यांचा आदर तेवढाच आहे.🙏🙏.  आमची पिढी बिनधास्त, बेधडक बोलणारी म्हणून तर नक्कीच  प्रसिद्ध आहे. काहीजण आमच्या संस्कारांचा उद्धार सुध्दा करतात. पण तो त्यांच्याकडे🙏🙏.  असं म्हणतात की आपण काळानुरूप बदललं पाहिजे. येईल त्या प्रसंगाना सामोरं जाता आलं पाहिजे. कदाचित ह्याचाच परिणाम आमच्यावर झाला. सध्याच्या lockdown च्या काळात खूप वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जातोय. त्यातून माझ्या सगळ्याच मैत्रिणींना साधारण ३-७/८ वर्षातली मुलं आहेत.  सकाळपासून थेट रात्री झोपे पर्यंत त्यांची कामं सुरूच असतात. त्यात काहीजणींचं work from home चालू आहे. ते सांभाळून घरची कामं आणि मुलांच्या शाळा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेच त्या कमी नाही पडत. मुलांना बाहेर जाता येत नाही म्हणून त्यांना नवीन

पालकत्व - हवंय की नकोय?

Image
पालकत्व - हवंय की नकोय?  काल माझ्या मैत्रिणीचा लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. सध्या lockdown असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी तिला फोन वरच शुभेच्छा दिल्या. खरंतर WhatsApp चे आभार आम्ही तिची anniversary Video call करून तरी साजरी करू शकलो.  खूप मजा आली. मात्र जेवढ्या खुश आम्ही होतो तेवढा आनंद जीची anniversary होती तिच्या चेहऱ्यावर नव्हता. वाटलं, कदाचित दमली असेल म्हणून आम्ही कोणीच काही बोललो नाही. पण जवळची मैत्रिण असल्यामुळे मला राहवलं नाही आणि रात्री उशिरा आम्ही दोघी बोललो.  आता लग्नाला ३ वर्ष झाली म्हंटल्यावर विषय साहजिकच मुलं कधी होणार हा होता. तेव्हा तिने सांगितलं की आम्हाला दोघांना IVF treatment आणि कुठलच औषधोपचार घ्यायचे नाही असं ठरलेलं परंतु समाज काय म्हणेल आणि घरातल्यांचे विचार ह्याच्या दबावाखाली येऊन तिच्या नवऱ्याने निर्णय बदलला. हे निम्मित ठरलं तिचा मूड जायला.  ते ऐकल्यावर असं वाटलं की, आपल्या आयुष्याचे निर्णय जर समाज घेणार असेल तर उगाच कर्तृत्वाच्या बाता तरी का करायच्या?. कारण शेवटी समाजात काय मान्य होईल तसेच आपण  वागतो.  सगळ्यात महत्वाचं लग्न ठरल्यापासून आपल्याकडे सगळे उपदेश द्यायला ल

आई बाबा आणि मी - पहिली गोष्ट

गोष्टीचं नाव -  मी केलेली मदत.   Hi, मी कोण आहे ते ओळखलं का? बरोबर, तुमचा मित्र शिवम. आजपासून मी रोज तुम्हाला गोष्ट सांगायला येणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनातली गोष्ट...  आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती आहे माझ्या मित्राची, "रियांश" ची.  खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. रियांश आपल्या आई बरोबर शाळेतून घरी परत येत होता. नेहमीप्रमाणे आई ने रियांश ला विचारलं, "अरे रियांश, आज तू तुझ्या मित्रमैत्रिणींना मदत केलीस का? आज टीचर ने काय शिकवलं? "  "रियांश, एकदम गप्प. तो काहीच बोलत नव्हता. " "आई ने परत विचारलं, बाळा काय झाल, तू गप्प का आहेस?" त्यावर रियांश म्हणाला, "आई माझ्या शाळेतली ती परी आहे ना, ती कधीच माझ्याबरोबर नीट नाही बोलतं."  "बरं, आई म्हणाली.  "तू , परी ला मदत करतोस का रे?" आई ने विचारलं.  रियांश म्हणाला, "ती नाही करत मग मी का करू?"  मगं रियांशच्या आईच्या लक्षात आलं आणि तिने त्याला नीट समजवून सांगितलं.  "रियांश, आपल्याला शक्य आहे तेवढी मदत आपण करायची. आता तू मला सांग तुला काही हवं असलं की मी किंवा बाबा तुला मद

आई बाबा आणि मी - भाग १ - ओळख

आपलं लहानपण हे पंचतंत्र इसापनीती आणि अश्या अनेक कथांच्या संग्रहाचा आनंद घेत गेला. ती जणू काही परंपराच होती. आपल्या काळात स्पर्धा होती पण कमी प्रमाणात ज्यामुळे आपल्याला कथांमध्ये रमायला वेळ मिळाला. पण हल्लीच्या पिढीच तसं नाहीये. अहो छोटा शिशु वर्गापासून ह्यांच्यात स्पर्धा सुरू होते. अशावेळी त्यांच्या वयाला मान्य असणाऱ्या आणि त्यांना यश - अपयशात मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या गोष्टी ह्या संग्रहातून आपण मांडणार आहोत.  आई बाबा आणि मी हा एक संग्रह आहे. रोजच्या जीवनातल्या घटनांच गोष्टी स्वरूपात रूपांतर करून आपण हा संग्रह तयार केला आहे.

संवाद - पिढ्यांचा

Image
संवाद, एका मनाचा दुसऱ्या मनाशी.... किंवा आधुनिक पिढीचा पूर्वीच्या पिढीशी....  आता म्हणाल हे काय नवीनच आहे बुआ... आम्ही नाही हो कधी असा संवाद केला आमच्या पूर्वजांबरोबर .... बरोबर आहे तुम्ही तो संवाद केला नाहीत म्हणून आमच्या (आधुनिक) पिढीला करायला लागतोय.... अहो कारणच तसं आहे. बरं एक कारण असेल तर ठीक , इथे भरपूर कारणं आहेत. तुम्हाला आधुनिक पिढीचे विचार आवडतं नाहीत, त्यातून आधुनिक काळातल्या मुलींचे विचार तर नक्कीच खटकतात. आत्ताच्या मुलींचे राहणीमान, त्यांचं बेधडक मनाला येईल ते बोलणं, जिथे चूक आहे तिथे स्पष्ट बोलणं ह्या सगळ्या गोष्टी तर फारच खटकतात..  आता मला सांगा तुमची पिढी (पूर्वीची) जुन्या रुढी परंपरा पाळणारी.  त्यातून तुमच्या पिढीमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव जास्त होता. तुमची पिढी ते सगळं सहन पण करायची. आणि त्याचा आदर आमच्या पिढीला (आधुनिक) नक्कीच आहे. आपण जसं म्हणतो की मनावर हात ठेवून खर सांग, अगदी तसं तुम्ही खरंच मनावर हात ठेऊन सांगा की त्या काळी कधीच तुम्ही मनातल्या मनात तुम्हाला त्रास करून नाही घेतलात का? कधीच तुम्हाला असं नाही का वाटलं की माझ्या मुलांना मला पाहिजे तसं वाढव

संस्कारांच ओझं - चांगले की वाईट ?

Image
काल संध्याकाळी अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन मला आला.. म्हणाली की "अगं मला माझ्या मुलांवराती चांगले संस्कार करायचेत. तुझ्या ओळखीत कुठे आहेत का ग संस्कार वर्ग? म्हणजे कसं त्याला योग्य वळणं मिळालंच पाहिजे." " माझ्या ओळखीत असतील तर मी सांगते तुला ", असं म्हणून मी फोन ठेवून दिला... मला एक क्षण सुचेनास झालं. एक मोठं ब्रम्हांड त्यामध्ये आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर राहणारी आपण माणसं. पण माणसाला कोण घडवत तर त्याच्यावर होणारे संस्कार आणि आजूबाजूचा समाज...  आपल्याकडे दोन भिन्न स्वभावाची माणसं आहेत... काहीजण समाज काय म्हणेल हा  विचार करून मुलांवरती संस्कार करतात तर काहीजण संस्कार करताना आवर्जून सांगतात की समाजाचा विचार करतं बसू नकोस... बरं म्हणजे दोनही  स्वभावांची माणसं चुकीची होतात का? तर नाही... कारण त्या भिन्न स्वभावांच्या माणसांवर तसे संस्कार झालेले असतात.. निष्कर्ष काढायचा झाला तर, समाज सुध्दा संस्कारांमुळे बनतो.. संस्कार कधीच जबरदस्तीने होतं नाहीत. नीट विचार केला तर आपल्याला कळेल की पूर्वीच्या पिढी मध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये काय फरक आहे ते. पूर्वीच्या पिढी

आई, बाबा आणि भांडण

Image
 " काय रे आदि , काय झालं? तू इतका disturb का झालास? भांडण झालंय का कोणाबरोबर?  "  अरे बोल बाळा ."  (नंतर जे आदि ने मला सांगितलं , ते ऐकल्यावर मला आदि चं खुपचं वाईट वाटलं. )  आदि च्या घरी त्याच्या आई बाबांचं भांडण झालं होतं आणि त्यामुळे आदि प्रचंड मानसिक दृष्ट्या त्रासलेला होता.  काही जणांना वाटतं की, ह्यात नवीन काहीच नाही हे तर घरोघरी घडतं असतं. आपण मोठी माणसं काही वेळाने भांडण विसरून जातो आणि वेगळ्या कामात व्यस्त होऊन जातो. वयानुसार आणि अनुभवामुळे आपल्याला हे बदल स्वीकारणे सोप्पे होते. पण लहान मुलांचं तसं नसतं... त्यांचं वय लहान असतं आणि अनुभवाने सुध्दा ते लहान असतात त्यामुळे त्यांना हे बदल स्वीकारणं कठीण होतं.. अहो लहान मुलं ती , आपण जसे अनुभवातून शिकत मोठे झालो अगदी तसचं त्यांचं आहे. पण आपण हे विसरतो की त्या भांडणाचा त्या लहान मुलांच्या मनावर किती परिणाम होतो ते...   भांडण सुरू झालं तर आपला राग आपण मुलांवर काढतो. त्यांची चूक नसताना त्यांच्यावर आपण ओरडतो, फटके देतो. बरं ह्या सगळ्यात मुलांची चूक काय?   नीट विचार करा, एका आई च्या पोटी जन्माला येणारी जुळी मुलं

नात्यातल्या प्रश्नाचं वळण...

Image
आई, सांग ना मला की मी कुठून आले. मला Santa Claus ने सोडलं का? सांग ना यार...  हा एक प्रश्न असा आहे ज्याच उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एकवेळ बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देण्यात सुट मिळेल. पण ह्या प्रश्नापासून कधीच नाही.  बरं त्यातून जर का तुम्हाला मोठी मुलगी किंव्हा मुलगा असेल तर दुसरं मुलं नक्कीच अजून विचित्र प्रश्न विचारणार. साधारण बोलायचं झाल तर, आई मला अनाथाश्रमातून आणलाय का? की मला रस्त्यावरून आणलाय? सांग ना.... ताई/दादा म्हणत होता/होती की मला कोणीच घेऊन जायला तयार नव्हतं म्हणून आई बाबा नी तुला उचलून आणलं. 😂😂🙈 हे विचारताना मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा बघण्यासारखा असतो... एवढं सहायला येतं त्यांच्याकडे बघितल्यावर....हे तर एक उदाहरणं झालं.... पण असे असंख्य प्रश्न मुलांच्या मनात असतात..  खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे..  बऱ्याच पालकांना वाटतं की त्यांचं हे वय नाही ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं... बरं आपण नाही सांगितलं म्हणून त्यांना कळणार नाही असं आहे का? त्यापेक्षा आपणच योग्य प्रकारे माहिती दिली तर काय वाईट आहे? उलट त्यांच्या वयाल

मोठ्ठा शून्य

Image
मोठ्ठा शून्य....   "अरे hi, तुला एक सांगायचं होतं माझ्या बहिणीला काल मुलगी झाली. खूप खुश आहेत सगळे... काय धमाल यार. मी तर ठरवलं सुध्दा की तिला कुठल्या शाळेत घालायचं. मी ताई ला सांगणार आहे की तिला आयुष्यात जे बनायचंय ते बनुदे. अगं आणि माझ्या ताई ने पण ठरवलंय की तिला तिच्या प्रमाणे आयुष्य जगू देणारं मी.... मी माझ्या मैत्रिणीच हे सगळं ऐकून घेतलं, तिच आणि तिच्या बहिणींचं अभिनंदन केलं.अग मात्र बराच वेळ विचार करत बसले की खरंच आपल्याला नक्की कोण घडवत? आपले विचार की समाजाचे विचार...  हा खुपचं खोल विषय आहे. म्हणजे साधारण पणे एखाद्या मनुष्याच आयुष्य जगण्याचा साचा हा ठरलेला असतो... हा थोडा फरक असतो पण सर्व सामान्य माणूस त्या ठरलेल्या साच्यातूनच जातो. म्हणजे बघा ना, लहानपणी आपण मुलांना सांगतो की अरे तुला फक्त दहावी पर्यंत अभ्यास करायचंय मग काय तू मोकळाच.... नंतर कॉलेज मध्ये आपण म्हणतो की अरे फक्त बारावी आणि फायनल इअर बस मग तू मोकळाच.....  हे सगळं सांगताना आपण एक गोष्ट विसरतो किंव्हा त्याकडे नकळत दुर्लक्ष होतं ते म्हणजे की तुला घडत असताना मानसिक दृष्ट्या स्वतः ला सांभाळता आलं पाहिज

मुलं म्हणजे देवाघरची फुलं

Image
मुलं म्हणजे देवाघरची फुलं  मुलं म्हणजे देवाघरची फुलं हि म्हणं आपण खूप पूर्वी पासून ऐकत आलोय. बऱ्याच पालकांचं असं  म्हणणं असतं कि , मुलं लहान असताना हि म्हणं योग्य आहे पण मोठी झाल्यावर अजिबात नाही. पूर्वी हि म्हणं साधारण मुलं १०-१२ वर्षांची होई पर्यंत स्वीकारली जायची. पण हल्लीच्या काळात मुलं ३-४ वर्षाचं झालं कि, हि म्हणं स्वीकारणं कठीण होतं . जेवढ्या प्रमाणात आपण नवीन टेकनॉलॉजिला सहजरित्या स्वीकारतो तेवढ्याच सहजरित्या मुलानंमध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना पण स्वीकारता आलं पाहिजे. बरं साधारण पणे १० वर्षांच्या पुढच्या मुलांना त्यांच्या मध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना स्वीकारणं थोडं सोप्पं होतं. कारण त्या मुलांना कमीतकमी एवढं तरी कळतं कि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होतं आहेत. मात्र ०-८/९ ह्या वयोगटातली जी मुलं असतात त्यांना स्वतःला त्यांच्यात बदल होत आहे हे समजायला वेळ लागतो. विशेष म्हणजे ०-५ ह्या वयोगटात मुलं पूर्णपणे आई बाबा वर अवलंबून असतात.  बरं  हा बदल नुसता मुलांमध्ये दिसतो का तर नाही. जेंव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा आपला सुद्धा आई बाबा म्हणून जन्म होतो. खरतर हा बदल एक परिवार

लग्नाच्या वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
ती : उद्या काय आहे माहितेय ना?😊🤔😊 तो : असं कसं विसरेन. १ मे २०१३ ला कामगार दिन साजरा केला तो शेवटचा... २ मे २०१३ पासून तर मला कामगार दिनाची पण सुट्टी नाही मिळाली..... ती : म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी तुला कामाला लावते? बोल ना ... आता का गप्प?? मी काहीच कामं करत नाही असं वाटतं तुला? हे बरं आहे म्हणजे सगळी घराची कामं पण करा आणि तुझं बोलणं पण ऐका...  तो : थांब जरा.... किती बोलतेस... मी काय बोलतोय , तू काय बोलतेय.... अगं मला असं म्हणायचं होतं की .... ती : तू तर काही बोलूच नकोस... कळलं ना... तुला जशी कामगार दिनाची सुट्टी मिळाली नाही ना तशीच मला पण नाही मिळाली.... आई कडे असताना किती आरामात असायचे मी.... तो : असो.... चला विषय बदला.... " हळूच पुटपुटला "  ( ह्या मुली कुठलाही विषय कुठेही नेऊ शकतात... कठीण आहे )  ती : काय म्हणालास? कठीण आहे?  तो : lockdown चं कठीण आहे असं मी म्हणालो.... तुला असं बोलेन का कधी.... माझी काय बिशाद तुला काही बोलायची...... मला रहायचंय...  ती : मला रहायचंय म्हणजे? तू प्लीज नीट बोल माझ्याशी कळलं ना....  तो : 🙏🙏 ओके , तू जिंकलीस आणि मी.... त

" पासवर्ड "

Image
(आदी ची आई ) आदी ची आई : काय फालतुगिरी आहे यार... कळतंच नाही की कसं वागायचं आदि बरोबर. असं वाटतं की आपण केलेले संस्कार गेले कुठे? लहानपणी तर असा नव्हता हा. माझ्याशी सगळं बोलायचा, शेअर करायचा आणि आता काहीच शेअर नाही करत तो माझ्याबरोबर. असा तर नव्हता अगं आदी. कळतंच नाही की कसं वागायचं आम्ही , म्हणजे हा नीट वागेल आमच्याशी.  हे संवाद बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतात. मुलं लहान असतात तेंव्हा ते आई बाबा बरोबर सगळं शेअर करतात. असं म्हणतात की जनरेशन गॅप मुळे हे वादविवाद होतात. मला असं वाटतं की हे वादविवाद होतात कारण आपण आपल्या मुलांमधल्या बदलला ला स्वीकारू शकत नाही. लहान असताना आपल्या मुलाने कुठलीही मस्ती केली तरी आपण त्यांना स्वीकारायचो कारण ते निरागस होते. आपल्यामध्ये संवाद असायचा, कारण त्यांना आपण मुक्त पणे  स्वीकारायचो. मुलांनाही वाटायचं की कधी एकदा शाळा सुटते आणि घरी जाऊन मी आज काय काय घडलं ते आई बाबा बरोबर शेअर करतोय. छोट्यातली छोटी गोष्ट सुध्दा ते आपल्याला येऊन सांगायचे. जनरेशन गॅप तेंव्हा होतीच की, मगं मोठे झाल्यावर असे काय घडलं की आपल्यापासून गोष्टी लपवायला त्यांना " पासवर्ड

टोपण नाव

बाळ जन्मल की आपण त्याच बारस करतो. जन्माला आल्याबरोबर त्याला चिनू, सोनू , मनु, पिल्लू अशी बरीच नावं ठेवतो. आयुष्यात सगळ्यात जास्त ओळख निर्माण होते ते आपल्या टोपण नावाने. काही जण व्यक्तीच्या स्वभावावरून टोपण नावे ठेवतात तर काही आडनावावरून. बरं सगळ्या टोपण नावांना अर्थ असतोच असं नाही, काहींना असतो तर काहींना नसतो.  एखाद्याच टोपण नाव इतकं प्रसिध्द असतं की तो व्यक्ती कितीही मोठा झाला तरी चारचौघात त्याला त्याच्या टोपण नावानेच हाक मारतात. अहो लग्नं मंडप पण सोडत नाहीत. तिथे तर नवरदेवाला टोपण नावाने त्याचा फोटोग्राफर हाक मारत होता. कमालच ना म्हणजे ... बरं मुलीकडच्यांना पत्रिका परत बघावी लागली की हा बालविवाह तर नाही ना😂🤣? कारण मुलाचं नाव वेगळच आणि लग्नमंडपात नवरदेव म्हणून कोणीतरी भलताच बबल्या उभा राहिला की काय🤔🤔😂 अहो अशी पण लोक आहेत जी फोन वरती दुसऱ्याचं व्यक्तीशी अर्धा तास गप्पा मारतात कारण त्यांचं टोपण नाव same असतं म्हणून. हा प्रसंग नेमका माझ्या बाबतीतच घडला. माझं आडनाव पटवर्धन त्यामुळे आमच्या घराण्याची टोपण नाव पटू , पट्या, पटी अशी. आता एकाच घरात जर ५ पटू किंव्हा पट्या एकत्र राहत असतील

" दत्तक "

Image
आदी ची आई : अरे तुला माहितेय का, आपल्या आदीच्या वर्गात ती परी आहे ना तिला म्हणे दत्तक घेतलाय. आदी चे बाबा : ओके, तुला कसं कळलं?  आदी ची आई: तिच्या शेजारीच माझ्या मैत्रिणीची बहीण राहते. तिच्याकडून कळलं.  .....तेवढ्यात आदी आत येतो... आई दत्तक म्हणजे काय?  काही नाही रे आदी दत्तक म्हणजे जी मुलं अनाथ आश्रमात असतात ना त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात त्यांना दत्तक म्हणतात. बरं तू जाऊन झोप आता, उद्या शाळा आहे ना.. ओके म्हणत आदी झोपायला जातो.  दुसऱ्यादिवशी शाळेत जायची तयारी सुरू असते, पण आदी च्या मनातून " दत्तक " हे काही गेलेलं नसतं आणि तो लगेच ठरवतो की शाळेत जाऊन पहिल्यांदा परी ला विचारायचं. तो शाळेत जातो आणि लगेच परी ला विचारतो की तुला दत्तक घेतलाय का ग? तुला अनाथ आश्रमातून आणलाय का ग? माझी आई म्हणाली की जी मुलं अनाथ आश्रमात असतात त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात.  परी ला काय बोलायचं ते सुचत नाही. ती गप्प बसते आणि फक्त एवढंच म्हणते आईला विचारून सांगते.. पण मनामध्ये खूप जास्त दुखावलेली असते. ती शाळा सुटल्यावर घरी जाते आणि आई ला विचार

नाण्याच्या दोन बाजू....

Image
अरे ऐक ना, आज मी शाळेत गेलेले आपल्या चिनुच्या शिक्षकांना भेटायला. भरपुर कौतुक करत होत्या तिचं की ती खूप छान नृत्य करते आणि खूप छान प्रकारे सगळ्यांमध्ये रमते. पण...त्या हेही म्हणाल्या की तिला काऊंसेलींग (समुपदेशनाची) ची गरज आहे. शिक्षकांचं म्हणणं की ती डिस्टर्ब असते, ती सतत कुठल्यातरी विचारात असते आणि त्यामुळे तिला पटकन राग येतो. आत्ताच हे आपण नियंत्रणात आणलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.  अरे बोल ना काहीतरी, तुला काय वाटतं? बाबा : बघू वेळ आली की आत्ता काहीच गरज नाहीये. चल यार जेवायला बसुया.. ही परिस्थिती हल्ली बऱ्याच घरांमध्ये असते मात्र ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. काहींना पटतं तर काहींना पटत नाही. मुलं जेंव्हा आईच्या पोटात असतं अगदी तेंव्हापासून ते शिकत असतं. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे ते पण एक भाग असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संस्कार त्या बाळावर होतं असतात. असं वाटतं की त्यांना काहीच कळत नाहीये पण खरंतर अगदी पहिल्या दिवसापासून ते शिकत असतात. नऊ महिने मुलं पोटात असतं, तेंव्हा ते मुलं एकदातरी आपल्याला आतून विचारतं का हो की आज मी क

बाबा गोष्ट सांग ना...

Image
बाबा गोष्ट सांग ना... गोष्ट, झोण्यापूर्वी गोष्ट सांगणं ही जणू काही एक परंपरा आहे आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे अजूनही ते चालू आहे. काळाप्रमाणे माणसाला बदलणं गरजेचं आहे अगदी तसचं आजच्या काळातल्या पालकांचं झालंय. आता तो काळ गेला जेंव्हा आपण मुलांना चिऊ काऊ च्या गोष्टी सांगायचो. हल्लीचा काळ हा super heros चा आहे. बरं आज एका सुपर हीरो ची गोष्ट सांगितली तर दुसऱ्यदिवशी नवीन गोष्ट चालतं नाही हा. एका गोष्टीत सुपर हीरो संपत नाही तर त्याच्या सिरीज लागतात. आणि मग तो सुपर हीरो जणू काही आपला घरचा सदस्य असल्यासारखा नांदायला लागतो. म्हणजे बघा ना घरात मुलांच्या खोलीत सुपर हीरो ची थीम पाहिजे. नंतर शाळेचं दप्तरापासून पेन्सिल आणि खोडरबर पण त्याचं तर थीम चं हवे.  खरंतर पालकांनी त्याचं आधार कार्ड आणि pan card काढायला हरकत नाही..😂😂... फारफार तर त्याला स्लीपिंग पार्टनर दाखवा...जो घरात काहीच करत नाही, जो घर खर्च ही करत नाही पण घरात वर्चस्व मात्र त्याचच चालतं. 😂. सुपर हीरो मुळे मुलांची कल्पनाशक्ती नक्कीच वाढते. इतक्या लहान वयात नवीन कल्पना सुचणं आणि त्याच्या आधारावर गोष्टी सांगणे हे मुलांच्या वयाच्य

झोपेतली लंगडी

पाळणाघर, काही जणांसाठी आवडीची जागा असते तर काही जणांसाठी पर्याय नाही म्हणून राहायची जागा. हल्लीच्या काळात त्याला Daycare अस म्हणतात.  मी सुध्दा लहान असताना पाळणाघरात जायचे. खूप मजा असायची. आम्ही जवळपास १२-१३ मुलं होतो पाळणाघरात. बर आमचं पाळणाघर एका सोसायटी मध्ये असल्याने सोसायटी मधली मुलं आणि आम्ही अशी मोठी team असायची खेळायला. जरी सुट्टी असली तरी आई बाबांना सुट्टी नाही म्हणून आम्ही मात्र पाळणाघरात असायचो. मगं काय, संपूर्ण दिवस खेळ खेळायचे आणि नुसती धमाल करायची. सगळ्या मुलांमध्ये मी लहान होते. मला कोणी नाव विचारलं की मी नाही सांगायचे. कारण त्याच वेळी मला कळलं होतं की नावात काय आहे.😂😂..खरी गोष्ट ही होती की माझं आडनाव पटवर्धन आणि त्या वेळी मला र्ध म्हणता यायचा नाही. पण सांगणार कोणाला, तरी मी धीर करून सांगायला लागले की माझ नाव नेहा वसंत पटकनधर.. 😂🤦‍♀️🙈😂.. असा हा एक आणि अनेक किस्से पाळणाघरात घडले. त्यातला नेहमी लक्षात राहणारा किस्सा म्हणजे झोपेतली लंगडी.. मी साधारण पाचवीत किंव्हा सहावीत असेन. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पाळणाघरात सकाळपासून असायचो. आम्ही सगळ्यांनी लंगडी धावकी खेळायचे

मतदान हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी निभवणारच....

इलेक्शन म्हटलं की काही वेगळच वातावरण असतं. प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असते की नक्की कोण जिंकून येणारं? आपण ज्याला मतं देऊ तोच येईल ना? दुसरा कोणी निवडून आला तर?  असे अनेक प्रश्न मनात असतात. तसेच जे पहिल्यांदा मतदान करणारे असतात, त्यांच्या पण मनात बरेचं प्रश्न असतात. मगं ते प्रश्न दोन तीन दिवस आधीच सुरू होतात. तसच काहीसं झालं माझ्या बाबतीत. मी पहिल्यांदा मतदान करणार होते. मी कधीच मतदान केलं नव्हतं. कारण काही कारणास्तव माझा इलेक्शन कार्ड चं आल नव्हतं. असो तर घडल असं की, इलेक्शन ला दोन दिवस बाकी होते. आणि मी माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारत होते. की अरे परवा आपल्याला किती वाजता रांगेत उभे रहायचे आहे? बरं pan card लागेल का? नक्की procedure काय असते? तू थांबशिल ना माझ्याबरोबर? असे अनेक प्रश्न विचारले. हल्ली ह्या YouTube मुळे उत्तर देणं सोप्पं झालंय. त्याने सांगितलं की YouTube वर बघ तुला videos मिळतील. पहिल्यांदा मतदान करताना काय काय करायचं ते. असं सांगून हा जागरूक नागरिक झोपी गेला. मला पण त्याच्याकडूनच उत्तर हवं होतं. म्हणून मी पण videos नं बघता झोपून गेले. इलेक्शन ला एक दिवस बाकी होता. सकाळ

तूच माझी सारथी....

सारथी म्हणजे मार्गदर्शक... सारथी म्हणजे योग्य दिशा दाखवणारा..... सारथी म्हणेच सूत्रधार....  प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते जी कळत नकळत पणे आपला/ आपली सारथी असतो/ असते... आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असते. मगं ते मार्गदर्शन आयुष्यातलं असेल किंव्हा दिशा म्हणजे रस्ता किंव्हा पत्ता  दाखवण्याचे असेल. आपण त्याच्यावर इतके अवलंबून होतो की जो पर्यंत त्यांच्याकडून आपल्याला संकेत येत नाही, तो पर्यंत आपण पुढचं पाऊल उचलत नाही.  अश्याच दोन मैत्रीणी आहेत माझ्या आयुष्यात ज्या मला खरंच आयुष्यात छान मार्गदर्शन करतात. पण दिशा(पत्ता/रस्ते) दाखवताना त्यातली एक खरंच सारथी आहे आणि दुसरी जिला वाटत की ती सारथी आहे आणि योग्य दिशा (पत्ता) दाखवू शकते. म्हणजे जिला स्वतः ला रस्ते पाठ होतं नाहीत म्हणून आम्ही आणायला आणि सोडायला जातो, ति कोणालातरी पत्ता सांगते. बरं आपण सांगितलेला पत्ता बरोबर  आहे की नाही ते तिला माहित नसतं.  म्हणजे झाल काय की आम्ही तिघी जणी आणि तिची बहीण आमच्या गल्ल्यांमध्ये फिरतं होतो. त्या वेळेला एक गृहस्थ आमच्या समोर आले आणि त्यांनी पत्ता विचारला. एवढ्या आम्ही तिघी जणी असताना त्यांनी त

रव्याचा केक

Image
दिवस पहिला - अरे रोज रोज काय नवीन बनवायचं खायला. कमालच आहे तुमची सगळ्यांची. तुम्हाला काय मी MasterChef India    ची विजेती वाटते का?  असं म्हणत माझी मैत्रिण तिच्या रूम मध्ये गेली आणि ताबडतोप WhatsApp वर मीटिंग घेतली. आम्हाला जाहीर आव्हानं केली की मला जो कोणी चांगली आणि वेगळी रेसिपी देईल त्याला lockdown संपल्यावर मी पार्टी देईन. फुकट ते पौष्टिक असा विचार करत आम्ही लगेच आपल्याला येत असलेल्या आणि YouTube वर बघितलेल्या रेसिपी पाठवल्या. स्वतः साठी जेवढ्या रेसिपी शोधल्या नाहीत तेवढ्या तिच्यासाठी शोधल्या. कारण फक्त एकच संचारबंदी नंतर फुकट खायला मिळणार..😂 एवढ्या सगळ्या पाठवलेल्या रेसिपी मधून तिने रवा केक ची रेसिपी निवडली. जिने ही रेसिपी सुचविलेली तिने तर लगेच देवांना पाण्यात ठेवलं. हो बरोबर कारण कळलच असेल... फुकट ते पौष्टिक... बरोबर... आता मात्र संचारबंदी लवकर जाणार याची खात्री आम्हाला झाली. अहो देव जे पाण्यात आहेत. आणि तिने रवा केक बनवायला सुरवात केली पहिल्या दिवशी तिने प्रयत्न केला पण काही कारणास्तव त्या केक मध्ये खड्डा पडला. बरं तिला chocolava केक करता आला असता, आम्ही सुचवल सुध्

आठवणीतलं फ्रॅक्चर

सुट्टी म्हणजे नुसती मजा मस्ती आणि धमाल हे जणू आमचं ब्रीद वाक्य होतं. बरं परीक्षेचं किंव्हा अभ्यासाचं वेळापत्रक जेवढं सिरीयसली आम्ही घेतलं नाही तेवढंच आम्ही सुट्टीमध्ये काय काय खेळायचं ह्याच वेळापत्रक सिरीयसली घेतलं..  मगं ते लंगडी धावकी असेल, डबाईसपाईस असेल , भेंड्या असतील किंव्हा भाड्याने सायकल आणून सायकलिंग असेल.. आम्ही कधीच हे वेळापत्रक मोडलं नाही. म्हणजे त्यावेळी ब्रम्हदेव जरी आला असता ना तरीआम्ही आमचं वेळापत्रक मोडल नसतं.  त्या दिवशी ही तसंच झाल. आम्ही सगळ्या थोडं लवकरच जमलो खेळायला. पण आम्ही आमचे नियम मोडले नाहीत. आणि आमच्या बिल्डिंगच्या मागच्या टाकीवर जाऊन बसलो. तेंव्हा का कोण जाणे पण आम्हाला खत्रों के खीलाडी मध्ये भाग घेतल्यासारखे वाटले आणि त्या टाकीला लागून असलेल्या दुसऱ्या टाकीवर आम्ही शिडीच्या आधाराने चढलो. आणि मग काय नवीन खेळ आमचा सुरू झाला. एका मागोमाग एक आम्ही उड्या मारायला लागलो. आणि जी धमाल सुरू झाली की practice makes a man perfect हि म्हण जणू आम्ही खरी करायचीच ठरवली होती. मात्र आमची एक मैत्रिण उड्या मारायला तयार नव्हती. पण आम्ही सुध्दा जिद्दी होतो. Friend in need is a

आठवणीतला थिबा पॅलेस

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मामाच्या घराशिवाय दुसरं काहीच आठवायचं नाही... आणि त्यातून माझ्या मामाचं घर रत्नागिरीत. आणि ते ही थिबा पॅलेस च्या बाजूला😎.. म्हणजे खूपच धमाल... बरं मामा कडे पूर्ण टोळीच जमायची, म्हणजे मी, आई ,दादा, मावशी, मावस बहिणी, दुसरा मामा मामी , मामे भाऊ असे सगळे मे महिन्यात रत्नागिरीतल्या मामा कडे जायचो.... आणि त्यातून आम्ही ठरलेले खेळ खेळायचो. ही जणू काही आमची परंपराच होती...  बरं रत्नागिरीत आहोत म्हंटल्यावर आमचा दिनक्रम ठरलेला असायचा. मग तो अगदी काळया आणि पांढऱ्या समुद्रावर जायचा असू दे किंवा टिळक आळी मध्ये जायचा असु दे.. दिनक्रम पूर्ण करणं हा आमचा जन्मसिध्द अधिकारचं असल्यासारखे आम्ही वागायचो... एवढ्या मोठ्या टोळीला फिरायला न्यायचं म्हणजे शिस्त तर हवीच. आणि हि महत्वाची कामगिरी आमचे मामासाहेब बजावायचे.. सगळ्यांच्या अटी पूर्ण करत एकदाची बाहेर पडायची वेळ व्हायची. आणि मग six seaters ना पण आम्ही मागे पाडू अश्या ३seater रिक्षा मध्ये आई, मावशी मामी, दादा, २ मावस बहिणी, मामे भाऊ आणि बहीण , मी आणि मामा... Huuusshh असे सगळे बसायचो... बरं हा माझा तिसरा मामा ज्याची रिक्षा होती

मी, माझ्या मैत्रीणी आणि बकुळीची फुलं

Image
अगं ऊठ लवकर सकाळचे ५:३० वाजलेत जायचयं ना शाळेला. आईचे नेहमीचे संवाद सुरू झाले आणि ते मी शाळेत जायला निघे पर्यंत चालू होते. मगं अगदी ते मी घरात किती कामं करते आणि एक मुलगी म्हणून किती केली पाहिजेत इथपर्यंत.... म्हणजे सूर्योदयाच्या आधीच आमच्या घरात माझा उजेड पडलेला असतो. बरं ह्याच्यात मी मुलगी असल्याचा काय  सबंध?असं मला नेहमीच वाटायचं. असो तर एवढं सगळं करत मी शाळेत जायच्या दुसऱ्या टप्प्यात पोहचायचे. आणि दुसरा टप्पा म्हणजे मैत्रिणींना बोलावणे. ती तर खरंच एक मजा असायची. कोकिळेच्या आधी आम्ही सगळ्या कोकिळा एकमेकांना हाक मारयचो.  फक्त एवढंच असायचा की आमच्या आणि खऱ्या कोकिळेच्या आवाजात फरक असायचा..😂😂.. आणि इथे दुसरा टप्पा संपायचा. मगं तिसरा टप्पा की आमची एक मैत्रीण जी आमच्या सोसायटीच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहायची तीला बोलावणं. तिला मात्र आम्ही घरी जाऊन बोलवायचो. कारण तिची एक खासियत म्हणजे ती तयार होऊन झोपायची. आणि आम्ही हाका मारल्या  की मग ती उठायची. बरं हे सगळं आम्ही पंधरा मिनिटात करायचो.  जर का आमच्या वेळी hurdle race असती ना तर कदाचित आम्हीच जिंकलो असतो.  एवढं सगळं झाल्यावर आमच्या मै