मुलं म्हणजे देवाघरची फुलं
मुलं म्हणजे देवाघरची फुलं मुलं म्हणजे देवाघरची फुलं हि म्हणं आपण खूप पूर्वी पासून ऐकत आलोय. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं कि , मुलं लहान असताना हि म्हणं योग्य आहे पण मोठी झाल्यावर अजिबात नाही. पूर्वी हि म्हणं साधारण मुलं १०-१२ वर्षांची होई पर्यंत स्वीकारली जायची. पण हल्लीच्या काळात मुलं ३-४ वर्षाचं झालं कि, हि म्हणं स्वीकारणं कठीण होतं . जेवढ्या प्रमाणात आपण नवीन टेकनॉलॉजिला सहजरित्या स्वीकारतो तेवढ्याच सहजरित्या मुलानंमध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना पण स्वीकारता आलं पाहिजे. बरं साधारण पणे १० वर्षांच्या पुढच्या मुलांना त्यांच्या मध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना स्वीकारणं थोडं सोप्पं होतं. कारण त्या मुलांना कमीतकमी एवढं तरी कळतं कि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होतं आहेत. मात्र ०-८/९ ह्या वयोगटातली जी मुलं असतात त्यांना स्वतःला त्यांच्यात बदल होत आहे हे समजायला वेळ लागतो. विशेष म्हणजे ०-५ ह्या वयोगटात मुलं पूर्णपणे आई बाबा वर अवलंबून असतात. बरं हा बदल नुसता मुलांमध्ये दिसतो का तर नाही. जेंव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा आपला सुद्धा आई बाबा म्हणून जन्म होतो. खरत...