नात्यातल्या प्रश्नाचं वळण...

आई, सांग ना मला की मी कुठून आले. मला Santa Claus ने सोडलं का? सांग ना यार... 
हा एक प्रश्न असा आहे ज्याच उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एकवेळ बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देण्यात सुट मिळेल. पण ह्या प्रश्नापासून कधीच नाही. 
बरं त्यातून जर का तुम्हाला मोठी मुलगी किंव्हा मुलगा असेल तर दुसरं मुलं नक्कीच अजून विचित्र प्रश्न विचारणार.
साधारण बोलायचं झाल तर, आई मला अनाथाश्रमातून आणलाय का? की मला रस्त्यावरून आणलाय? सांग ना.... ताई/दादा म्हणत होता/होती की मला कोणीच घेऊन जायला तयार नव्हतं म्हणून आई बाबा नी तुला उचलून आणलं. 😂😂🙈

हे विचारताना मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा बघण्यासारखा असतो... एवढं सहायला येतं त्यांच्याकडे बघितल्यावर....हे तर एक उदाहरणं झालं.... पण असे असंख्य प्रश्न मुलांच्या मनात असतात..  खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.. 
बऱ्याच पालकांना वाटतं की त्यांचं हे वय नाही ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं... बरं आपण नाही सांगितलं म्हणून त्यांना कळणार नाही असं आहे का? त्यापेक्षा आपणच योग्य प्रकारे माहिती दिली तर काय वाईट आहे? उलट त्यांच्या वयाला पटणारी उत्तरं द्यायला हवी... ज्या उत्तरांमध्ये खोटं आणि काल्पनिकपणा नसेल.... कारण आपण जी उत्तरं देऊ तसे त्या नात्याला वळण मिळत जाते... म्हणजे तुमच्या नात्याचा पाया त्या उत्तरांवर अवलंबून असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. आपण जर मुलांना म्हणालो की , हे तुझं वय नाही सगळं बोलायचं , परत विचारलं तर फटके देईन... तर कदाचित मुलं त्याचं उत्तरं बाहेरून शोधून काढतील पण त्याचे त्यांच्यावर काय संस्कार होत असतील हे कळणार नाही. सगळ्यात महत्वाचं पालक आणि मुलांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. 

खरंतर सध्याच्या आधुनिक युगात जेवढं स्पष्ट बोलू तेवढंच चांगलं आहे. आधुनिक पिढी ही नक्कीच खूप हुशार आणि विचारांनी practical आहे. कुठल्याही गोष्टीचा अति बाऊ करणारी ही पिढी नाही... त्यांना जे कळणार नाही ते बिनधास्त विचारायची हिम्मत त्यांच्याकडे आहे. त्यांना पडलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तरं ते शोधू शकतात. पण आपले संस्कार असतात म्हणून खरंच पहिल्यांदा मुलं आपल्याला विश्वासाने विचारतात.
पण आपण त्यांना उत्तर द्यायचं सोडून त्यांना हे प्रश्न कुठून पडले ह्याचा विचार करत बसतो. नीट विचार केला तर movies मधे , टीव्ही शोमध्ये ही मुलं जे बघतात ते आपल्याला येऊन विचारतात... पण असे प्रश्न आपल्या मुलांनी विचारणे हे आपल्यासाठी खूप जास्त मानसिक त्रास देणार आहे. 

जसं मी नेहमीच म्हणते की , ह्यात आपली पण चूक नाही कारण आई बाबा म्हणून आपल्याला पण हे सगळं नवीन असतं...त्यातून आपली मुलं एवढ्या लवकर मोठी होतायत आणि त्यांच्यात वयानुसार बदल घडतायत हे स्वीकारणं पण कठीण होतं.... 
पण आता तो काळ गेला जेंव्हा आईबाबा बरोबर आपण मैत्री करायला घाबरायचो.. आताच्या काळात आपल्याला आपल्या मुलांचे फ्रेंड्स बनायलाच पाहिजे... ती ह्या काळाची गरज आहे. अहो कुठला मान- अपमान आपण घेऊन बसतो..आपण जसं मुलांकडून अपेक्षा करतो की त्यांनी कुठल्याही परस्थितीत flexible  असायला हवं तसचं आपण सुध्दा परिस्थिती प्रमाणे flexible असायला हवे... म्हणजे योग्य वेळ आली की त्यांचे पालक कीव्हा त्यांचे फ्रेंड्स बनता आलं पाहिजे.... आपण जर चांगले फ्रेंड्स असु तर सगळ्यांचं प्रश्नांची उत्तरं सोप्पी होतात... कारण त्या मैत्री मध्ये प्रामाणिकपणा, आदर आणि मस्करी ह्या तिन्ही गोष्टींना समान स्थान असते...  

सध्याच्या काळात आई बाबा आणि मुलांमधल्या मैत्रीच्या नात्यात प्रामाणिकपणा, आदर आणि मस्करी ह्या तिन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. तरच त्यांना पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं सोप्पं होईल..आणि त्या नात्याला नवीन वळण मिळेल...

#NehaP
१३/०५/२०२०

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials