पालकत्व - हवंय की नकोय?

पालकत्व - हवंय की नकोय? 

काल माझ्या मैत्रिणीचा लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. सध्या lockdown असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी तिला फोन वरच शुभेच्छा दिल्या. खरंतर WhatsApp चे आभार आम्ही तिची anniversary Video call करून तरी साजरी करू शकलो. 

खूप मजा आली. मात्र जेवढ्या खुश आम्ही होतो तेवढा आनंद जीची anniversary होती तिच्या चेहऱ्यावर नव्हता. वाटलं, कदाचित दमली असेल म्हणून आम्ही कोणीच काही बोललो नाही. पण जवळची मैत्रिण असल्यामुळे मला राहवलं नाही आणि रात्री उशिरा आम्ही दोघी बोललो. 

आता लग्नाला ३ वर्ष झाली म्हंटल्यावर विषय साहजिकच मुलं कधी होणार हा होता. तेव्हा तिने सांगितलं की आम्हाला दोघांना IVF treatment आणि कुठलच औषधोपचार घ्यायचे नाही असं ठरलेलं परंतु समाज काय म्हणेल आणि घरातल्यांचे विचार ह्याच्या दबावाखाली येऊन तिच्या नवऱ्याने निर्णय बदलला. हे निम्मित ठरलं तिचा मूड जायला. 

ते ऐकल्यावर असं वाटलं की, आपल्या आयुष्याचे निर्णय जर समाज घेणार असेल तर उगाच कर्तृत्वाच्या बाता तरी का करायच्या?. कारण शेवटी समाजात काय मान्य होईल तसेच आपण  वागतो. 

सगळ्यात महत्वाचं लग्न ठरल्यापासून आपल्याकडे सगळे उपदेश द्यायला लागतात. लग्न म्हणजे फक्त दोन जीव नाहीत तर दोघं घरं एकत्र येतात आणि मग त्यात सगळी नाती बदलतात आणि बरंच काही.... 

बरं तो प्रेमविवाह असेल किंवा ठरवून, बघण्याचा कार्यक्रम करून केलेलं असेल. अहो पण दोघांमध्ये मैत्री असणं जास्त महत्वाचं आहे. तरच ते कुठल्याही निर्णयात एकमेकांबरोबर उभे राहतील. अहो लग्नाआधी ३-४तास भेटणं बोलणं वेगळं आणि नंतर आयुष्यभर २४ तास एकत्र राहणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. त्यांच्यातली मैत्रीचं त्यांना ह्या प्रवासात एकमेकांच्या बरोबर खंबीर राहायला मदत करणार आहे आणि त्या मैत्रितला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे त्यांचं आई बाबा होणं. 

बरं त्यांना मुलं हवंय की नकोय हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे आणि हवं असल्यास ते कधी आणि कस हवंय हा पण पूर्णपणे त्या दोघांचा प्रश्न आहे. मला आश्चर्य ह्याचं वाटतं की देशातल्या अर्थव्यवस्थेचा आलेख पण त्यांना पाठ नसेल पण कुठल्या वर्षी कुणाचं लग्न झाल आणि त्यांना किती मुलं झाली हे मात्र तोंडपाठ असतं.  एवढ्यावर थोडीच थांबतात, कोणी कुठली ट्रीटमेंट घेतली आणि कोणी नाही घेतली ह्याची पण माहिती त्यांच्याकडे असते. 

असो, तर एवढं सगळं असून सुध्दा मुलं होणं हा विषय तर फारच चर्चेचा असतो अख्ख्या घराण्यात. . जरी तुमची काळजी तुमचे विचार असले तरी ते एकदा सांगितलेत ठीक आहे. आमच्यावेळी असं आणि आमच्यावेळी तसं , कशाला? त्या दोघांना ठरवुदे की कोणाला काय सांगायचं ते. 

आणि अहो सगळ्यात महत्वाचं आहे ते आई होणं एन्जॉय करणं किंवा बाबा होणं एन्जॉय करणं. मगं त्या पालकत्वाच्या सुखाचा त्यांना कसा उपभोग घ्यायचंय हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. कारण ते त्यांचं मुलं असणार आहे. पण आपल्याकडे पूर्वीपासूनच जबरदस्ती नात्यावर हक्क गाजवण्याची प्रथा आहे. काहींना ती आवडते तर काहींना नाही. 

खरंतर पालकत्वाच्या सुखाचा  उपभोग कसा घ्यायचा हे जर त्यांना त्यांचं ठरवायला दिलं तर त्यांच्या मैत्रीतला हा मोठा टप्पा पण सहज पार होईल. 

#NehaP 

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही.

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials