बाबा गोष्ट सांग ना...

बाबा गोष्ट सांग ना...

गोष्ट, झोण्यापूर्वी गोष्ट सांगणं ही जणू काही एक परंपरा आहे आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे अजूनही ते चालू आहे. काळाप्रमाणे माणसाला बदलणं गरजेचं आहे अगदी तसचं आजच्या काळातल्या पालकांचं झालंय. आता तो काळ गेला जेंव्हा आपण मुलांना चिऊ काऊ च्या गोष्टी सांगायचो. हल्लीचा काळ हा super heros चा आहे. बरं आज एका सुपर हीरो ची गोष्ट सांगितली तर दुसऱ्यदिवशी नवीन गोष्ट चालतं नाही हा. एका गोष्टीत सुपर हीरो संपत नाही तर त्याच्या सिरीज लागतात. आणि मग तो सुपर हीरो जणू काही आपला घरचा सदस्य असल्यासारखा नांदायला लागतो. म्हणजे बघा ना घरात मुलांच्या खोलीत सुपर हीरो ची थीम पाहिजे. नंतर शाळेचं दप्तरापासून पेन्सिल आणि खोडरबर पण त्याचं तर थीम चं हवे. 
खरंतर पालकांनी त्याचं आधार कार्ड आणि pan card काढायला हरकत नाही..😂😂... फारफार तर त्याला स्लीपिंग पार्टनर दाखवा...जो घरात काहीच करत नाही, जो घर खर्च ही करत नाही पण घरात वर्चस्व मात्र त्याचच चालतं. 😂.
सुपर हीरो मुळे मुलांची कल्पनाशक्ती नक्कीच वाढते. इतक्या लहान वयात नवीन कल्पना सुचणं आणि त्याच्या आधारावर गोष्टी सांगणे हे मुलांच्या वयाच्या मनाने नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र त्याचं वेळेला मुलांना हळूहळू खऱ्या आयुष्यातल्या आव्हानांची जाणीव करून देणे पण गरजेचे आहे. 

खऱ्या आयुष्यातली आव्हानं सांगणं म्हणजे त्यांना घाबरवण किंव्हा आत्ताच त्यांना स्पर्धेत उतरायला सांगणं असाही नाही, तर त्यांना गोष्टींच्या आधारे तुमचा संघर्ष सांगा. तुम्ही तुमच्यापुढे आलेली आव्हानं त्यांना सांगा आणि तुम्ही ती आव्हानं किती सहजपणे पार पाडलीत ते सांगा. कारण आपण जेवढ्या स्पर्धांना सामोरं गेलो नाही त्याच्यापेक्षा जास्त हल्लीच्या मुलांना सामोरं जावं लागतं आणि त्यावेळीस मात्र खोटे super heros नाहीत तर तुम्ही त्यांचे real super heros त्यांना मदत करू शकतात. कधीकधी तुम्हाला पडलेल्या प्रश्नाांची उत्तरं त्यांना विचारून बघा , परिपक्व उत्तरं नक्कीच नाही मिळणार पण त्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. नक्कीच खूपच मजेशीर उत्तरं मिळतील.

अहो हेच तर आपल्याला त्यांना शिकवायचे आहे. खोटे सुपर हीरो कर त्यांची कल्पनाशक्ती वाढवणार आहे, तर तुम्ही त्यांचे real super heros त्यांना सुंदर आयुष्य जगायला शिकवणार आहात. 

त्यांचे सुपर हीरो व्हायला आवडेल ना?

#NehaP

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही.😊🙏😊

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials