आठवणीतलं फ्रॅक्चर

सुट्टी म्हणजे नुसती मजा मस्ती आणि धमाल हे जणू आमचं ब्रीद वाक्य होतं. बरं परीक्षेचं किंव्हा अभ्यासाचं वेळापत्रक जेवढं सिरीयसली आम्ही घेतलं नाही तेवढंच आम्ही सुट्टीमध्ये काय काय खेळायचं ह्याच वेळापत्रक सिरीयसली घेतलं.. 
मगं ते लंगडी धावकी असेल, डबाईसपाईस असेल , भेंड्या असतील किंव्हा भाड्याने सायकल आणून सायकलिंग असेल.. आम्ही कधीच हे वेळापत्रक मोडलं नाही. म्हणजे त्यावेळी ब्रम्हदेव जरी आला असता ना तरीआम्ही आमचं वेळापत्रक मोडल नसतं. 
त्या दिवशी ही तसंच झाल. आम्ही सगळ्या थोडं लवकरच जमलो खेळायला. पण आम्ही आमचे नियम मोडले नाहीत. आणि आमच्या बिल्डिंगच्या मागच्या टाकीवर जाऊन बसलो. तेंव्हा का कोण जाणे पण आम्हाला खत्रों के खीलाडी मध्ये भाग घेतल्यासारखे वाटले आणि त्या टाकीला लागून असलेल्या दुसऱ्या टाकीवर आम्ही शिडीच्या आधाराने चढलो.
आणि मग काय नवीन खेळ आमचा सुरू झाला. एका मागोमाग एक आम्ही उड्या मारायला लागलो. आणि जी धमाल सुरू झाली की practice makes a man perfect हि म्हण जणू आम्ही खरी करायचीच ठरवली होती. मात्र आमची एक मैत्रिण उड्या मारायला तयार नव्हती. पण आम्ही सुध्दा जिद्दी होतो. Friend in need is a friend indeed 
हि म्हण सुध्दा आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. आणि तिला मदत करायची आम्ही ठरवली. Beginner level पासून advance level पर्यंत पूर्ण प्रशिक्षण तिला दिलं. तिच्यातला आत्मविश्वास वाढवला. तिला किती पुण्य केल्यानंतर आमच्यासारख्या मैत्रीणी मिळाल्यात असे जणू तिच्या डोळ्यांत भावं होते. आणि एकलव्याला पण लाजवेल अशी गुरूदक्षिणा तिने आम्हाला दिली.😆😂 फरक एवढाच की त्याने हाताचा अंगठा दिला आणि हिने अख्खा उजवा पाय. एका सेकंदात फ्रॅक्चर 😆😂😆😂... 
मग काय आम्ही लगेच एका जागरूक शिक्षका प्रमाणे पालक मीटिंग तिच्याच घरी बोलावली. आणि नंतर मात्र हसायचं की रडायचं हे मात्र कळत नव्हतं. 
त्या दिवशी मात्र आमचं वेळापत्रक मोडल. आणि इलेक्शन जिंकल्यावर जसे पुष्पगुच्छ देतात ,अगदी तसंच आम्ही सगळ्या तिच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन गेलो. 
इतके वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलं पण अशी गुरुदक्षिणा कोणीच दिली नाही. 
हे आठवणीतलं फ्रॅक्चर नेहमीच लक्षात राहील....

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials