अस्तित्वाची तुलना

कालच मी जब वी मेट बघत होते. त्यामध्ये नायिकेच स्वतः वर खूपच प्रेम असतं. तिचा ठरलेला डायलॉग म्हणजे मैं अपनी favourite हुं | असा आहे. चित्रपट बघताना खूपच भारी वाटत. एकदम जबरी वाटतं. असं वाटायला लागतं की बासच आपणच ती नायिका आहोत आणि आज पासून मी पण म्हणणार, की मैं अपनी favourite हुं |  
असं म्हणत नकळत आपण त्या नायिकेच्या भूमिकेत शिरतो आणि उगाच वाटतं की आपण तिच्या पेक्षा नक्कीच चांगला अभिनय केला असता. 
पण मग आजुबाजुच्या माणसांकडे बघितलं की असं वाटतं , जणू काही मालिकांमधल्या खलनायिका किंवा खलनायक आपल्याच नशिबात आहेत. तिथेच आपण ठरवतो की साध्या आयुष्यात आपल्या अस्तित्वाची तुलना केली जाते तीच सांभाळताना नाकिनव येतो . तर हे असं दुहेरी आयुष्य सांभाळताना काय होईल आपलं. खरंच हे सगळं सांभाळणं सोप्पं नाहीये. 

मात्र एक विचार नेहमी येतो की आपल्याकडे तुलना करणं कधी थांबणार. प्रत्येक गोष्टीत तुलना. लहान मुलं एकत्र खेळत असतील तरी तुलना. अभ्यास करत असतील तरी तुलना करणार. खरंतर त्या मुलांमध्ये हे विचार निर्माण करणारे आपणच आहोत. अहो मुलं निरागस असतात त्यांच्या मनात हे विचार सुध्दा नसतात. मात्र आपणच सारखं बोलून की तो बघ कसा अभ्यास करतो किंवा ती बघ किती छान चित्र काढते , नाहीतर तू असं बोलून त्यांच्या मनात एक द्वेष निर्माण करतो. अचानकपणे द्वेष करणं किंवा तुलना करणं त्यांचा स्वभाव बनायला लागतो. 

कधीकधी तर वाटतं की काही मोठी माणसं नुसती वयाने मोठी झाली कारण तुलना करण्याची वृत्ती काही जातं नाही. आमच्यावेळी असं आणि आमच्यावेळी तसं हे चालूच राहत. बरं कितीही त्यांच्यासाठी केलं तरी त्याच्यात सुध्दा चूक कुठे मिळतेय का ते शोधून काढणार. अहो एकवेळ कौतुक नाही केलं तरी चालेल पण ती तुलना नको असं वाटायला लागतं.   

खरंतर आमच्या अस्तित्वाची तुलना करण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला. पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या विचारांचा आणि वेगळ्या स्वभावाचा असतो. आपण त्याचा आदर हा केलाच पाहिजे. जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तरी कृपया त्याची तुलना करू नका. 

प्रत्येक व्यक्तीला स्वतः बद्दल आदर हा असतो. कारण तो प्रत्येकाने मेहनत करून कमावलेला असतो. अहो तुमच्या मुलीबद्दल किंवा मुलाबद्दल कुणी टीका केली तर तुम्हाला आवडेल का? नाही ना. मगं आपल्याला अधिकार नाही दुसऱ्यांवर टीका करायला. 

ऑफिस मध्ये राजकारण असतं त्याची सुरवात घरातूनच होते असं वाटायला लागतं. कारण सगळेचजण आपापल्या परीने उच्च पदाधिकाऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतं असतात. मगं ते घरातले असो वा बाहेरचे. अहो घर आणि नोकरीच ठिकाण ह्याच्यात काय फरक. 

एकवेळ ही तुलना पण सहन केली जाऊ शकते पण तुम्ही मातृत्वाची सुध्दा तुलना करता? एखाद्या आई ने आपल्या बाळाला कसं वाढवावं हे तिच्या शिवाय कोणीच सांगू नाही शकत. तुमच्या मुलाला किंवा मुलीला एखादी गोष्ट योग्य म्हणजे सगळ्यांनाच ते योग्य असं नसतं. खरंतर तुम्हाला अधिकार नाही कुणाच्याही खाजगी आयुष्याबद्दल बोलायचा. अश्यावेळी वाटतं की आमचं फटकळ बोलणं आणि मोठ्यांच्या चुंकांवर बोलणं हे योग्यच आहे. 

नीट विचार करा, आपण म्हणतो की प्रत्येक माणसात देव आहे, ह्याचाच अर्थ तुम्ही एका देवाची दुसऱ्या देवाबरोबर तुलना करताय. अहो आपण यशोदेच्या प्रेमाची आणि जिजाऊंच्या प्रेमाची तुलना नाही करू शकत. हे सुध्दा अगदी तसचं आहे. 

अहो आमची आधुनिक पिढी असून देखील ही तुलना सहन करू शकली, पण आमच्या पुढच्या पिढीतल्या मुलांचं तसं नाहीये. त्यांना इतक्या स्पर्धांमधून जावं लागतं की त्यांना ह्या अस्तित्वाच्या तुलनेची स्पर्धा नाही सहन होऊ शकत. म्हणूनच ही तुलनेची साखळी तोडायची वेळ आली आहे. 

प्रत्येकाच्या अस्तित्वाला ह्या जगात एक स्थान आहे आणि ते तुलनेशिवाय त्यांना मिळालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? 

#NehaP

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही. 
 

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials