Posts

Showing posts from 2024

मध्यांतर

मध्यांतर....  आज खूप दिवसांनी नाटक बघण्याचा योग आला. नाटक म्हटलं की त्यातली पात्र, त्यांचे संवाद आणि कथा ही महत्वाची असतात. कलाकार, जे त्या पात्रांना जिवंत करतात, ते त्या नाटकाची उंची एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात.  पहिली घंटा वाजली.... नाट्यगृहात एक वेगळंच वातावरण होतं. सगळे जण आपापल्या जागेवर एका आशेने बसलेले, काही जण त्यांच्यात्यांचात संवाद साधत होते तर काही जण त्यांच्या लहान मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स असं सगळं देऊन शांत करत होते. काही आजी आजोबा त्या इवल्याश्या प्रकाशात मोबाईल चा आवाज बंद करून द्या हो असं शेजारील व्यक्तींना सांगत होते. एकंदरीत तिसरी घंटा वाजण्याच्या आधीची गडबड , उत्साह, उत्सुकता असं वातावरण होतं आणि तेवढ्यात, कलाकारांना बघण्याची संधी सोड्याची नाही म्हणून साधारण २-३ इंच असलेल्या मानेला अजून किती उंच नेऊ शकतो असा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती त्यांचा प्रयत्न करत होत्या. अखेर नाटक सुरू झालं....  वेळ आली ती मध्यांतराची... नाटक, चित्रपट बघण्यामागच एक कारण मध्यंतरात तिथे जाऊन समोसा, वडापाव आणि पॉपकॉर्न खाणं हे पण असतंच. सगळे जण पटापट बाहेर कॅन्टीन जवळ गेले. इतकी लोकं म्ह

मोजमाप आधुनिक विचारांचं

मोजमाप आधुनिक विचारांचं....  आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आणि सगळ्या आकड्यांना किंमत आणली, त्या किंमतीमुळे माणसांना मोजमाप करणं सोप झालं. आयुष्य जगताना मोजमाप हि सगळीकडे करावी लागते. अगदी जेवण बनवताना मीठ घालण्यापासून ते ताटात किती प्रमाणात भाजी असावी , सॅलड किती असावं इथं पर्यंत, घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर डाएट करायचं म्हणजे तो ड्रेस / लेहंगा आपल्याला सुंदर दिसेल हे पण मोजमाप चर्चेत आहे. तसंच आपल्या घरातील कुटुंबियांना काय सांगायचं किती सांगायचं ह्याच पण मोजमाप होतंच.   बरं त्या मोजमापाची सवय इतकी झालीये कि माणसांच्या वागणुकीवरून, कपड्यांवरून ठरवतात कि लोकं आधुनिक आहेत कि जुन्या विचारांची.. कपड्यांवरून , ड्रिंक्स केला म्हणून समोरचा व्यक्ती आधुनिक आहे हि व्याख्याच चुकीची आहे. ड्रिंक्स घेणं, कुठले ब्रँडेड कपडे घालायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे आणि हे प्रमाण नाही माणसंच मोजमाप करायचं.  पालक जेव्हा मुलांना शिकवणी ला पाठवतात, शाळेत पाठवतात तेव्हा मार्क्स वरून मोजमाप केलं जातं. बऱ्याचदा मुलांना concept किती समजली ते मोजमाप गरजेचं वाटत नाही. कारण प्रमाण मार्क्स दाखवत. पण जी मुलं slo

The Millennials

पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत म्हणजे पुढच्या नवीन पिढीला नावं ठेवणं होय. मग ती नावं उद्धार करण्यासाठी असूदे किंवा कौतुक करण्यासाठी असुदे. हल्ली कानावर पडणाऱ्या पिढ्यांची नावं म्हणजे GenZ, Gen Alpha आणि The Millennials.. एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा पिढ्यांना नावं ठेवणं सोप्पं आहे.  बरं ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी Millennials म्हणजे १९८१-१९९६ ह्या वर्षात जन्मलेली मुले. GenZ म्हणजे १९९७-२०१२ ह्या वर्षात जन्मलेली मुले आणि Gen Alpha म्हणजे २०१३-२०२५ ह्या वर्षांत जन्मलेली मुले. असा हा सध्या विषय (Trend) चालू आहे.   प्रत्येक पिढी ही नवीन संस्कार आणि जीवनमूल्ये निर्माण करत असते जी त्या वयाला आणि त्या काळाला अनुरूप असतात. पण सध्या बहुचर्चित असलेली पिढी ही Millennials ची आहे. कारण आमच्या डोक्यावर एक हात जुनं ते सोनं ह्यांचा आहे तर आमच्या हातात हात please stop being an old schooler ह्यांचा आहे.. आणि ह्या दोन्ही पिढ्यांमध्ये जवळपास ६० - ७० वर्षांच अंतर आहे.    बरं, millennials ना त्यांची मत मांडणं कधी कधी इतकं कठीण होतं कारण तो समतोल साधताना त्यांच्यावर बाकीच्या दोन पिढ्यांची जबाबदारी असते