मतदान हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी निभवणारच....

इलेक्शन म्हटलं की काही वेगळच वातावरण असतं. प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असते की नक्की कोण जिंकून येणारं? आपण ज्याला मतं देऊ तोच येईल ना? दुसरा कोणी निवडून आला तर? 
असे अनेक प्रश्न मनात असतात. तसेच जे पहिल्यांदा मतदान करणारे असतात, त्यांच्या पण मनात बरेचं प्रश्न असतात. मगं ते प्रश्न दोन तीन दिवस आधीच सुरू होतात. तसच काहीसं झालं माझ्या बाबतीत.
मी पहिल्यांदा मतदान करणार होते. मी कधीच मतदान केलं नव्हतं. कारण काही कारणास्तव माझा इलेक्शन कार्ड चं आल नव्हतं. असो तर घडल असं की,

इलेक्शन ला दोन दिवस बाकी होते. आणि मी माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारत होते. की अरे परवा आपल्याला किती वाजता रांगेत उभे रहायचे आहे? बरं pan card लागेल का? नक्की procedure काय असते? तू थांबशिल ना माझ्याबरोबर? असे अनेक प्रश्न विचारले. हल्ली ह्या YouTube मुळे उत्तर देणं सोप्पं झालंय. त्याने सांगितलं की YouTube वर बघ तुला videos मिळतील. पहिल्यांदा मतदान करताना काय काय करायचं ते. असं सांगून हा जागरूक नागरिक झोपी गेला. मला पण त्याच्याकडूनच उत्तर हवं होतं. म्हणून मी पण videos नं बघता झोपून गेले.

इलेक्शन ला एक दिवस बाकी होता. सकाळी चहा  पिताना त्याने मला विचारले काय मग videos बघितले ना? माझं मिश्किल हास्य बघून लगेच त्याने सांगितलं की ब्रेकफास्ट झाल्यावर मी सांगतो काय procedure आहे ते. तेंव्हा लग्नानंतर त्याला जे ट्रेनिंग दिलं ते फुकट गेलं नाही हे बघून बरं वाटलं..😂😂.. ब्रेकफास्ट झाल्यावर त्याने सगळी procedure मला समजावली. आपण काही तरी वेगळं (म्हणजे मतदान) करणार आहोत ही गोष्टच मला मस्त वाटत होती. लहान मुलं जेव्हां पहिल्यांदा चालायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव असतात अगदी तसेच माझ्या चेहऱ्यावर होते. एवढंच कशाला आपण जणू काही एक जागरूक नागरिक तयार केलाय असे भाव माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर होते. त्याने तर पुढची स्वप्नं पण बघितली होती. यूपीएससी चे क्लासेस मी घेऊ शकतो अश्या स्वप्नात तो रमलेला. त्याच्याकडे बघितल्यावर मला ही वाटलं की त्याच्या क्लास च्या जाहिरातीत माझा फोटो येणार आणि पहिली विद्यार्थिनी म्हणून माझा सत्कार होताना फोटो काढणार..😂😂😆😆... तर स्वप्नं मोडू नये म्हणून आम्ही पुढे काहीच चर्चा नं करता दिवस घालवला. 

आणि तो दिवस आला. मी सकाळी ५ वाजल्यापासून जागी होते. पोटात खूप गोळे येत होते. मी मतदान करणार हा विचार माझ्या अंगावर शहारे आणणारा होता. तो ही उठला आणि मला म्हणाला नीट कळलाय ना मतदान कसं करायचं ते? मी नुसतं हो म्हणून मान डोलावली. दोघंही तयार झालो. कृष्ण भगवान् जसे अर्जुनाचे सारथी होते ,अगदी तसा माझा नवरा माझा सारथी होता. बाईक वर बसल्यावर जणू काही रथात बसलोय असं मनात भाव येत होते. आणि त्याने रथ चालवायला सुरुवात केली 😂😂 म्हणजे बाईक. 
आम्हाला जे सेंटर आलेलं तिकडे आम्ही रांगेत उभे राहिलो. भरपूर जण ओळखीचे होते. वातावरण खूपच मस्त होतं. आणि ती वेळ आली जेव्हां माझ्या नवऱ्याची यूपीएससी क्लासेस ची स्वप्नं पूर्ण मोडीत निघाली. आणि त्याने मला इलेक्शन कार्ड अजून पर्यंत का नव्हतं मिळालं ते सुध्दा सांगितलं. 
तर झाल असं की माझा नंबर येण्याच्या आधी मी सगळी procedure त्याला नीट समजावून सांगितलं. आणि तो ही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत मागे उभा राहिला. आणि जसं लहान मुलं आपल्या आई वडीलांचा उद्धार करतात अगदी तसाच मी माझ्या नवऱ्याचा केला. सगळ्यांसमोर बिंधास्त विचारलं,
की काय रे ज्या बोटाला शाई लावतात त्यानेच बटण प्रेस करायचं का दुसऱ्या बोटाने पण केलं तरी चालतं. 😆😂😆😆😂 हिरोशिमा नागासाकी वर जसे बॉम्ब पडले तसे त्याच्यावर बॉम्ब पडल्यासारखे भाव होते. आणि आयुष्यात सकाळी, दुपारी किंव्हा संध्याकाळी स्वप्न बघायची नाहीत असं त्याने ठरवलं. 

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials