आई बाबा आणि मी - पहिली गोष्ट

गोष्टीचं नाव -  मी केलेली मदत.
 
Hi, मी कोण आहे ते ओळखलं का? बरोबर, तुमचा मित्र शिवम. आजपासून मी रोज तुम्हाला गोष्ट सांगायला येणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनातली गोष्ट... 

आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती आहे माझ्या मित्राची, "रियांश" ची. 

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. रियांश आपल्या आई बरोबर शाळेतून घरी परत येत होता. नेहमीप्रमाणे आई ने रियांश ला विचारलं,
"अरे रियांश, आज तू तुझ्या मित्रमैत्रिणींना मदत केलीस का? आज टीचर ने काय शिकवलं? " 
"रियांश, एकदम गप्प. तो काहीच बोलत नव्हता. "
"आई ने परत विचारलं, बाळा काय झाल, तू गप्प का आहेस?"
त्यावर रियांश म्हणाला, "आई माझ्या शाळेतली ती परी आहे ना, ती कधीच माझ्याबरोबर नीट नाही बोलतं." 
"बरं, आई म्हणाली. 
"तू , परी ला मदत करतोस का रे?" आई ने विचारलं. 
रियांश म्हणाला, "ती नाही करत मग मी का करू?" 
मगं रियांशच्या आईच्या लक्षात आलं आणि तिने त्याला नीट समजवून सांगितलं. 
"रियांश, आपल्याला शक्य आहे तेवढी मदत आपण करायची. आता तू मला सांग तुला काही हवं असलं की मी किंवा बाबा तुला मदत करतो की नाही. 
तुला आठवतंय, एकदा तुझ्या शाळेतून एक प्रोजेक्ट करायला सांगितलेला आणि तू खेळण्यात विसरून गेलास. पण जसं लक्षात आलं, तुला बाबाने मदत केलेली आणि तो प्रोजेक्ट पूर्ण केलेला. आपण नेहमी आपल्या फ्रेंड्स ना किंवा घरातल्यांना मदत करायची. 
तुला बरं नसलं किंवा तू खेळताना पडलास तर तुझे फ्रेंड्स तुला पटकन मदत करतात की नाही? 
"अरे यार, आई हो आठवलं, मला बाबा ने मदत केली आणि मला A+मिळालेला. अजुन एक सांगू, जेव्हा परी च्या वाढदिवसाच्या पार्टी ला गेलेलो तेव्हा तिनेच मला तिची खुर्ची आणून बसायला मदत केलेली."
"मगं आठवलं की नाही, आई म्हणाली.
"आणि आई खर सांगू बाबा मला म्हणाला सुध्दा की, मला तुझी मदत करताना आनंद मिळतो. 
"आई मला कळलं, मी नक्की परी ला मदत करेन. "
"आई ने त्याला शाबासकी दिली आणि रियांश गाढ झोपून गेला." 

तात्पर्य : आपल्या माणसांना मदत करण्यात सगळ्यात मोठा आनंद दडला आहे. 

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials