लग्नाच्या वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ती : उद्या काय आहे माहितेय ना?😊🤔😊

तो : असं कसं विसरेन. १ मे २०१३ ला कामगार दिन साजरा केला तो शेवटचा... २ मे २०१३ पासून तर मला कामगार दिनाची पण सुट्टी नाही मिळाली.....

ती : म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी तुला कामाला लावते? बोल ना ... आता का गप्प?? मी काहीच कामं करत नाही असं वाटतं तुला? हे बरं आहे म्हणजे सगळी घराची कामं पण करा आणि तुझं बोलणं पण ऐका... 

तो : थांब जरा.... किती बोलतेस... मी काय बोलतोय , तू काय बोलतेय.... अगं मला असं म्हणायचं होतं की ....

ती : तू तर काही बोलूच नकोस... कळलं ना... तुला जशी कामगार दिनाची सुट्टी मिळाली नाही ना तशीच मला पण नाही मिळाली.... आई कडे असताना किती आरामात असायचे मी....

तो : असो.... चला विषय बदला.... " हळूच पुटपुटला " 
( ह्या मुली कुठलाही विषय कुठेही नेऊ शकतात... कठीण आहे ) 

ती : काय म्हणालास? कठीण आहे? 

तो : lockdown चं कठीण आहे असं मी म्हणालो.... तुला असं बोलेन का कधी.... माझी काय बिशाद तुला काही बोलायची...... मला रहायचंय... 

ती : मला रहायचंय म्हणजे? तू प्लीज नीट बोल माझ्याशी कळलं ना.... 

तो : 🙏🙏 ओके , तू जिंकलीस आणि मी....

ती : मी जिंकले म्हणजे? मला उगाच बोलू नकोस कळलं ना... 

तो : मगं काय तू हरलीस म्हणू का? ( मनातल्या मनात 😂🤣🤣😂🤣)

ती : मी नेहमी to the point बोलते कळलं त्यामुळे मीच नेहमी बरोबर असते...

तो :  हे म्हणजे पेपर पण तूच सेट करणार आणि उत्तरं पण तूच देणार अस झाल...

ती : जाऊदे मी काहीच बोलत नाही. नेहमीच गप्प असते... आता पण गप्प बसते...

तो : 🤔🤔🙄🙄🤨🤨🤔🙄🧐🧐🧐 गप्प...

ती :  हुश्श , बरं वाटलं... आपण किती समजून घेतो ना एकमेकांना... we are really made for eachother...

तो : हो तर...🙄🧐🤔🤨🤐🤐🤐🤐

ती :  अरे एवढं सगळं बोललो पण आपण शुभेच्छा चं नाही दिल्या.... Happy 7th anniversary....

तो : हो, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
हळूच पुटपुटला " अरे हो ७ वर्ष म्हणजे अर्धा वनवास झाला नाही का, तरीच म्हटलं एवढ्या लवकर तू भांडण कसं थांबवलस."

ती : काय म्हणालास??
.
.
.
.

तो : 😴😴😴😴😴😴😴😴😴 गूड नाईट.....

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials