Posts

Showing posts from March, 2020

एक salute house hasband ना.🙏

कालच मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलत होते, की आजकाल Instagram वर सगळेच सेलिब्रिटी घरात कामं करत असल्याचे फोटोज् आणि व्हिडिओज टाकत असतात.    कारण त्यांनापण Rapunzel झाल्यासारखं वाटयाला लागलंय.. म्हणजे कसं सगळंच पहिल्यांदा 🙊😂.... नंतर घरातल्या बाईला मात्र सुट्टी नाही. तिला सगळचं करायचंय. ती मात्र कायमच काम करत असते. अश्या बऱ्याच प्सोट यायला लागल्या. आणि नक्कीच त्यांना सलाम.🙏.  कारण कितीही झाल तरी तिची मात्र सुटका नसते घराच्या कामातून. आणि हो ह्या lockdown मुळे खाण्याच्या  फरमैश भरपुरच वाढल्यात. आणि त्यातून घरात लहान मुलं असली तर पूर्ण दिवस स्वयंपाक घरात जातो...  आणि काही पोस्ट lockdown मुळे घरी बसलेल्या पूरषांचे येतात, की ते किती मदत करतायत घरकामात... कारण त्यांनापण Rapunzel झाल्यासारखं वाटयाला लागलंय.😂🙊😂 .. सगळचं पहिल्यांदा.  म्हणजे आत्ता जर आदेश बांदेकर त्यांच्याकडे होमेमिनिस्टर खेळायला आले तर नक्कीच पुरुष जिंकतील. कारण त्यांना घरात सगळ्या वस्तू कुठे ठेवल्यात ते माहीत झालंय... असो, पण ह्या सगळ्यात मात्र आपण विसलरो ते house husband ना.. हो अगदी बरोबर वाचलत. ऐकायला वेगळं वाटलं ना. पण

दार उघडं बये दार उघडं....

दार उघड बये दार उघड.... नाही नाही, मी काही होम मिनिस्टर मध्ये भाग नाही घेतला... पण सध्या हे गाणं म्हणायची वेळ त्या लोकांवर आलीय, ज्यांना आपण घरकोंबडी / घरकोंबडा म्हणायचो..😂😂.. म्हणजे खरं तर ज्यांना घरी बसायची सवय नसते त्यांना तर हे quarantine खूपच कठीण जातंय. पण सगळ्यात जास्त कठीण परिस्थिती घरकोंबडी / घरकोंबडा ज्यांना म्हणायचो त्यांच्यावर आलीये.😂😂😆😷😷 म्हणजे बघा ना, गर्दी आवडत नाही म्हणून किंव्हा लोकांशी बोलायला आवडत नाही म्हणून आणि मुख्य म्हणजे आपली comfort zone शक्यतो तोडायला आवडत नाही म्हणून ही लोकं घराच्या बाहेर पडत नाहीत किंव्हा जास्त मिक्स होतं नाहीत. पण ह्या कोरोनाने तर ह्यांना पण भांबावून सोडलाय. म्हणजे घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा माणसंच माणसं.. 😵😵 बरं ही माणसं त्यांना शांत पण बसू देत नाहीयेत. म्हणजे अगदी बोलायचं झालं तर quarantine ची सुरवताच त्यांच्या मुलाखतीने झाली..  तर प्रश्न असे होते की, सकाळी उठून तुम्ही काय करता?  तुमचा वेळ तुम्ही कसा घालवता? तुम्हाला कंटाळा कसा येत नाही? बरं तुम्ही असे किती दिवस राहू शकता? तुमचे छंद काय काय आहेत? तुमचं उत्पन्न कसं होतं? वगैरे

भोलानाथ का रे वागलास असं?

ह्या कोरोनाने सगळ्यांचं आयुष्य हलवून टाकलंय....म्हणजे बघा ना किती ते विनोद वर्क फ्रॉम होम वरती... नंतर बायकोशी नीट वागा, कारण हॉटेल्स बंद आहेत... आणि नंतर हल्लीची मुलं किती नशीबवान आहेत, का तर परीक्षा नाही, शाळेला सुट्ट्या.. म्हणजे cherry on top म्हणतात ना अगदी तसं.... पण सगळ्यात जास्त feel झालाय ते ऐंशितल्या पिढीला... कारण आमचीच पिढी नुसती भोलानाथ ला साकडं घालत बसली, ह्या आशेवराती की कधीतरी भोलानाथ आमचं ऐकेल. पण कसल काय ना कधी शाळेभोवती तळे साचले,  ना कधी पोटात कळ येऊन ढोपर दुखलं आणि नाही कधी गणिताचा पेपर बुडाला...  श्या बाबा...😏😒😒...  पण आज ह्या कोरोनामुळे मुलांना शाळेला नाही तर परीक्षेला पण सुट्ट्या मिळाल्या... काय ना..  बरं नुसत्या सुट्ट्या नाहीत ह तर परिक्षेशिवाय पुढच्या वर्गात पण गेली ही मुलं....  आणि म्हणून आम्ही भोलानाथ ला बोलावलंय. जाब विचारायला, की काय रे बाबा आमचं गाणं आवडलं नाही? का आमचा सुर आवडला नाही तुला?  नक्की प्रॉब्लेम काय होता तुला भोलानाथ? आणि प्लीज नुसतं बुगुबुगुबुगु करू नकोस....  भोलानाथ : अरे खूप वाटायचं तुमच्या गाण्यातला प्रत्येक शब्द खरा करावासा.. पण जेव्हा

अरे तू counselor ना?

तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच न्हवती यार.... म्हणजे तू असं वागशील असं वाटलं न्हवत. तू counselor आहेस यार.... हो हेच मला बोलायचं की ते counselors आहेत, देव नाहीत. ती पण माणसचं आहेत ना. Counselor होण सोप्पं नाहीये. म्हणजे शांतपणे सगळ्या clients ना ऐका. त्यांना सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये बाहेर पडायला मदत करा. आणि हो जेव्हां clients ना वाटेल  तेव्हां त्यांच्याशी बोला.  बरं एवढा बिझी दिवस असला तरी आपले प्रॉब्लेम्स त्यांना बाजूला ठेवावे लागतात.  Psychology शिक्षण घेतलं, म्हणजे त्यांनी कायम समजूतदारपणेच वागावं, हे किती योग्य आहे? असं म्हणतात की आपण आपल्या माणसांसमोर राग, आनंद, चिडण व्यक्त करू शकतो. मग at least घरच्यांसमोर तरी त्यांना counselor बनून नाही तर घरातलं सदस्य बनून राहूदे.. आणि त्यांना पण पाहिजे तस व्यक्त होऊ दे. Hats off to you all.... 😃🙏😃... * कुणालाही संबोधून म्हणायचं नाही.

कोरोनाची शाळा

अरे तू जरा नीट वागशील का?  कधी तुझी शाळा सुरू होणार 😵😵.... एकदा का शाळा सुरू झाली ना की जरा शांतता मिळेल मला... सध्या घरोघरी हेच सवांद चालू असतील.  म्हणजे आज कोरोनामुळे का होईना ,पण शिक्षकांची आठवण  आणि त्यांच्या बद्दलचा मान खूपच वाढला असेल.  सध्याच्या काळात इतके रुल्स आहेत शिक्षकांना, की त्यांचं शिकवणं पण formality झालीये. कारण हल्लीची मुलं शिक्षकांना हे बोलायला पण कमी करत नाहीत, की तुम्ही मला ओरडलात तर माझ्या पालकांना नाव सांगेन. मला आई ने सांगितलंय की teacher शिक्षा नाही देऊ शकत.  तेव्हा खरंच आपल्या पालकांबद्दल आदर वाढतो, कारण अजूनही आपले शिक्षक जर समोर आले तर एक आदर आणि भीती वाटते आणि एकदम बाई नमस्ते असं तोंडून येतच.. असो, पण ह्या कोरोनाचा एक फायदा नक्कीच झाला, मुलांना त्यांचा हवा असणारा आई बाबा चा वेळ मिळाला.  कोरोनामुळे मुलांची mother's day आणि  father's day  ची व्याख्या बदलेल....  नाहीतर हल्लीच्या मुलांना mother's day का सेलिब्रेट करतात असं विचारलं तर मुलं म्हणतात की मम्मा आम्हाला मॉल ला घेऊन जाते, मोबाईल देते म्हणून...  आज खऱ्या अर्थाने कुटुंबातील materialistic प्