मैत्रिणींनो तुमच्यासाठी..,


पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हटलं जातं की, नावं ठेवणं फार सोप्पं आहे पण कौतक करणं तेवढंच कठीण. 

आज मात्र मला खरंच माझ्या सगळ्या मैत्रिणींच कौतुक करावस वाटतं. आम्ही सगळ्या आधुनिक पिढीतल्या म्हणजे चूल मुलं ह्या संकल्पनेतल्या तर आम्ही नक्कीच नाही. आधीच्या पिढीतल्या नक्कीच काही कारणास्तव त्या संकल्पनेत अडकलेल्या त्यामुळे त्यांचा आदर तेवढाच आहे.🙏🙏.  आमची पिढी बिनधास्त, बेधडक बोलणारी म्हणून तर नक्कीच  प्रसिद्ध आहे. काहीजण आमच्या संस्कारांचा उद्धार सुध्दा करतात. पण तो त्यांच्याकडे🙏🙏. 

असं म्हणतात की आपण काळानुरूप बदललं पाहिजे. येईल त्या प्रसंगाना सामोरं जाता आलं पाहिजे. कदाचित ह्याचाच परिणाम आमच्यावर झाला. सध्याच्या lockdown च्या काळात खूप वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जातोय. त्यातून माझ्या सगळ्याच मैत्रिणींना साधारण ३-७/८ वर्षातली मुलं आहेत. 

सकाळपासून थेट रात्री झोपे पर्यंत त्यांची कामं सुरूच असतात. त्यात काहीजणींचं work from home चालू आहे. ते सांभाळून घरची कामं आणि मुलांच्या शाळा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेच त्या कमी नाही पडत. मुलांना बाहेर जाता येत नाही म्हणून त्यांना नवीन खेळ शिकवा.  त्यांच्या आवडीचे नवीन नवीन , आहे त्या साहित्यातून पदार्थ बनवा. आमच्या WhatsApp group मध्ये रोज नियमित पणे नवीन नवीन पदार्थांची रेलचेल असते. 

हे सगळं करताना त्यांच्या मनात एक गोष्ट सारखी असते की मी माझ्या कुटुंबाचं संरक्षण कसं करू. काहीजणींच्या सोसायटी मध्ये पेशंट सापडले तर त्याकाळात सुध्दा आपल्या मुलाला टेन्शन न दर्शवता कसं सांभाळायचं हे सुद्धा आव्हानच आहे. तर एकीचा नवरा बँक मध्ये नोकरीला म्हणजे रोज तिच्या मनात विचार की, ह्याची प्रतिकारशक्ती अजून कशी चांगली करू.  तर काहींनी रोज नवीन नवीन खेळ , गोष्टी शोधत मुलांना काही कमी नाही पडू दिलं. अश्या अनेक गोष्टी आहेत. 

बरं आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा करायला कुणाला नाही आवडतं. त्यातून तो lockdown मध्ये आला तर? तरी सुद्धा घरी अश्याकाही प्रकारे सजावट केली, केक बनवला जणू काही १०-१२ जण येणार होती साजरा करायला. खरंच किती कौतुकास्पद आहे हे सगळ. 

आणि हो सगळ्यांच्या मनात एकच विचार की lockdown उठल्यावर आपला परत रोजचा दिनक्रम सुरू झाला की मी एवढा वेळ देऊ शकेन की नाही? आणि रोजच्या धावपळीत त्याच्या किंवा तिच्या आवडीच रोज खायला बनवू शकेन की नाही. खरंच काळानुरूप बदलणं किती सोप्पं आहे. 

एवढ्यावर थांबतील असं वाटलं होतं, पण नाही रोज नवीन paintings, cooking , sketching चालूच आहे. आज काय पापड बनवले, उद्या काय नवीन नवीन challenges
खेळून स्वतः ला आनंदी ठेवतायात. कमाल... हा एकच शब्द मला त्यांच्यासाठी वाटतो. 
 
तुम्ही म्हणाल ह्यात काय कौतुक, सगळेच करत आहेत.
मान्य की सगळेच करत आहेत. पण new normal स्वीकारणं आणि काळानुरूप बदलणं तेवढंच कठीण आहे. 

कारण आधी कोरोना पण नव्हता आणि असा काळ पण नव्हता... आणि हो एक कौतुकाची थाप द्यायला काय हरकत आहे,  नाही का? 

नक्कीच त्यांच्या life partner ( नवरे हो ) नी पण नक्कीच मदत केली.  सप्तपदी लग्नात जी चालतो ती हीचं ना? 

#NehaP

* माझ्या मैत्रिणींना संबोधून म्हणायचे आहे. 

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials