करिअर घडवताना

प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. प्रयत्नांती परमेश्वर... अश्या अनेक म्हणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्येक म्हणीचा मतितार्थ हाच की, प्रयत्न आणि कष्ट केले तरच यश प्राप्ती होते. 

एक सामान्य व्यक्ती प्रचंड मेहनत घेत असते, पण तरीही त्या व्यक्तीला पाहिजे तसं मेहनतीचं फळं मिळत नाही आणि मग आपण ताण, नैराश्य, औदासिन्य ह्याला सामोरे जातो. कधीकधी नशिबाला दोष देतो. 

खूप पैसा असला तरीही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की, चार पैसे कमी चालतील पण ही नोकरी नको. मस्करी मध्ये आपण एवढंही म्हणतो की वडापाव विकून पैसे कमवू पण नोकरी, त्याची वेळ, त्यातलं राजकारण नको...पण तेच काही लोकांना आपण त्यांच्या करिअर मध्ये खूप समाधानी बघतो. 
नक्की असं काय आहे की ते खुश आहेत पण आपण नाही? 

खूप पैसा आला म्हणजे करिअर घडलं असं होतं नाही. 
सगळ्यात मह्त्वाचं आहे की ह्या करिअर मधल्या नैराश्याच्या मुळाशी जाणं. जसं भारतीय आयुर्वेदात आपल्या ऋषीमुनींनी सगळ्या त्रासाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी औषध शोधली अगदी तसचं आपल्याला पण करिअर मधल्या नैराश्याला मुळापासून उखडून टाकायचं आहे. 

करिअर घडवताना जसं शिक्षण महत्वाचं आहे अगदी तसचं इतर मुद्दे लक्षात घेणे पण गरजेचे आहे.

• आपल्या मित्रमैत्रिणींच्या दबावाखाली येऊन करिअर निवडतोय का?

• पालकांच्या मनाचा विचार करून करिअर निवडतोय का?

• जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी मनाविरुद्ध करिअर निवडतोय का?

• सगळ्यात मह्त्वाचं, निवडलेलं करिअर तुमच्या व्यक्तिमत्वाला ( personality ) योग्य आहे का? 

हे सगळेच मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. कदाचित दुसरा मुद्दा बऱ्याच जणांना पटणार नाही पण हे खरं आहे. पालकांची काळजी ही जेवढी महत्वाची आहे तेवढंच मुलांचं मत जाणून घेणं पण महत्वाचं आहे. 

व्यक्तिमत्वाचा (personality) विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. छंद निवडताना जर आपण व्यक्तिमत्वाला महत्व देतो तर करिअर निवडताना का नाही?

अंतर्मुख ( introvert personality ) व्यक्तिमत्वाच्या माणसाला जर मार्केटिंगची नोकरी मिळाली तर कदाचित ती व्यक्ती ३-४ वर्षानंतर नोकरी सोडून देईल किंवा जवाबदारी असल्यामुळे मनाविरुद्ध हे करिअर निवडेल.
 पण तेच जर अंतर्मुख व्यक्तिमत्वाला (introvert personality) योग्य अशी नोकरी मिळाली तर ती व्यक्ती आपल्या करिअर मध्ये नक्कीच समाधानी असेल. 

आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की आजकालच्या मुलांना कष्ट घ्यायला नकोत, सारखे नोकरी बदलतात पण त्यामागचं मूळ काय आहे ते लक्षात येत नाही. खरं कारण करिअर निवडताना आपण कुठल्या गोष्टींना महत्त्व देतो ते आहे.

व्यक्तिमत्व आणि आवड ह्या दोन्हींचा विचार करून करिअर निवडलं तर आपण आपल्या आयुष्यात खूप खुश आणि समाधानी असू... 

पुढील ब्लॉग मध्ये व्यक्तिमत्वाचे प्रकार आणि त्यांचा स्वभाव कसा ओळखायचा आणि आपण कुठल्या व्यक्तिमत्वाचे (personality) आहोत ते जाणून घेऊया.... 

#NehaP
16/09/2020

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials