मोठ्ठा शून्य

मोठ्ठा शून्य.... 
 "अरे hi, तुला एक सांगायचं होतं माझ्या बहिणीला काल मुलगी झाली. खूप खुश आहेत सगळे... काय धमाल यार. मी तर ठरवलं सुध्दा की तिला कुठल्या शाळेत घालायचं. मी ताई ला सांगणार आहे की तिला आयुष्यात जे बनायचंय ते बनुदे. अगं आणि माझ्या ताई ने पण ठरवलंय की तिला तिच्या प्रमाणे आयुष्य जगू देणारं मी....

मी माझ्या मैत्रिणीच हे सगळं ऐकून घेतलं, तिच आणि तिच्या बहिणींचं अभिनंदन केलं.अग मात्र बराच वेळ विचार करत बसले की खरंच आपल्याला नक्की कोण घडवत? आपले विचार की समाजाचे विचार... 

हा खुपचं खोल विषय आहे. म्हणजे साधारण पणे एखाद्या मनुष्याच आयुष्य जगण्याचा साचा हा ठरलेला असतो... हा थोडा फरक असतो पण सर्व सामान्य माणूस त्या ठरलेल्या साच्यातूनच जातो. म्हणजे बघा ना, लहानपणी आपण मुलांना सांगतो की अरे तुला फक्त दहावी पर्यंत अभ्यास करायचंय मग काय तू मोकळाच.... नंतर कॉलेज मध्ये आपण म्हणतो की अरे फक्त बारावी आणि फायनल इअर बस मग तू मोकळाच..... 

हे सगळं सांगताना आपण एक गोष्ट विसरतो किंव्हा त्याकडे नकळत दुर्लक्ष होतं ते म्हणजे की तुला घडत असताना मानसिक दृष्ट्या स्वतः ला सांभाळता आलं पाहिजे. किंव्हा वेळप्रसंगी जवळच्या व्यक्ती कडे मोकळं व्हायला पाहिजे... अहो, शाळा कॉलेज ऑफिस ह्या सगळ्यातून जाताना माणूस म्हणून मानसिक दृष्ट्या सक्षम राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. एखादा विद्यार्थी शाळा कॉलेज मध्ये चांगले यश कदाचित मिळवेल सुध्दा... पण ते यश टिकवताना मानसिक संयम टिकवण फार महत्वाचं आहे. आपल्यातला अहंकारला , स्वाभिमानाला नकारात्मक वळण तर मिळत नाहीये ना हे बघणं पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण तुमच्या यशामुळे तुमचा पगार कदाचित खूप वाढेल सुध्दा आणि ती चांगली गोष्ट आहे. पण त्याचं वेळी आपल्या आजूबाजूचा समाज हा सकारात्मक विचारांचा आहे की नकारात्मक विचारांचा हे बघणं पण खूप आवश्यक आहे. कारण त्या समाजाचे संस्कार पुढच्या पिढीवर होतं असतात. आपली पिढी किंव्हा आपल्या पुढची पिढी ही वेगवेगळ्या बदलांना सामोरं जाणारं आहे. 
 सगळ्यात मोठ उदाहरण म्हणजे आत्ताच कोरोनाच घ्या ना. 

खूप वाटतं की जसं शालेय शिक्षण महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि येईल त्या प्रसंगांना सामोरं कसं जायचं ह्याच शिक्षण देणं पण आवश्यक आहे. जर गहन विचार करून बघितला तर हल्ली बऱ्याच घरांमध्ये भांडणांच मूळ कारण हे आपण मानसिक दृष्ट्या सक्षम नसणे हे आहे.  कारण नकळत पणे आपल्या मनावर बाहेरच्या समाजाच्या विचारांचा इतका परिणाम होतं असतो की ते विचार हळूहळू आपले संस्कार बनायला लागतात. 
आणि आपल्या समोर उभं राहतं ते " मोठ्ठं शून्य ".

शून्याच्या नंतर जर कुठला अंक असेल ( ०१२३) तर आपण म्हणतो की शून्याला किंमत नसते.... पण जर कुठलाही अंक शून्याच्या आधी असेल (१२०) तर त्या शुन्याला भरपूर किंमत येते... हे नियम आपण लहानपणाासूनच शिकत आलोय मात्र त्यांना नुसतं गणितात न वापरता आपल्या आयुष्यात पण वापरता आलं पाहिजे.. 

सकारात्मक विचारांचा आणि नकारात्मक विचारांचा समाज कधी ना कधी आपल्या सहवासात येणार... मात्र आपल्याला ठरवायचं की, 
" शून्याच्या आधीच स्थान आणि शून्याच्या नंतरच स्थान हे कुठल्या विचारांच्या समाजला द्यायचं. " 

अहो तसं बघितलं तर आपण " आर्यभट्ट " ह्यांचेच पुढचे वंशज नाही का... त्यामुळे स्थानांची किंमत आपल्याला पहिल्याासून माहितेय..... फक्त स्थानांची मांडणी आपल्याला नीट जमली पाहिजे..

कारण ते स्थानच तुम्हाला त्या विचारांच्या समाजाची किंमत दाखवून देईल.. आणि तो समोर असलेला " मोठ्ठा शून्य ",  पाण्याच्या फुग्या सारखा हवेत उडून जाईल....


#NehaP

* कुणालाही संबोधून म्हणायचं नाही...



Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

The Millennials