Posts

Showing posts from 2023

ROI

माणूस शेवटपर्यंत हा विद्यार्थीच असतो हे वाक्य रोज अनुभवायला मिळतं. खरंच सोमवारचा दिवस काही तसाच होता. मी आणि माझे सहकर्माचारी ROI म्हणजेच returns on investment म्हणजेच गुंतवणुकीवर परतावा ह्या बद्दल बोलत होतो, की कंपनी नवीन लोकांना नियुक्त करताना त्या व्यक्तीचा ROI विचारात घेऊन मग निर्णय घेते.  खरंतर हा विषय दुपारच्या जेवणाच्या टेबलवरच संपला होता. पण माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला,की return on investment चा विचार आपण आपल्या खाजगी आयुष्यात कधीच करत नाही. पूर्वी म्हण ऐकली आहे जसं पेरता तसं उगवतं पण कदाचित मनुष्याचा अहंकार कधीकधी इतका वाढतो की आपण नक्की काय पेरातोय ह्याकडे दुर्लक्ष होतं.  आपण ऐकतो सकारात्मक विचार करा, ध्यान करा, अहंकार बाजूला ठेवा, ऐकण सोपं आहे पण अमलात आणताना रोज कष्ट घ्यावे लागतात, कारण investment नक्की कश्यात करायची आणि किती करायची ह्याचं गणितंच उलगडत नाही.  काही नात्यांनमध्ये आपण कितीही invest केलं तरी त्याचे returns तेवढे मिळतं नाहीत कारण ते नात तेवढच असतं पण काही नाती आपोआप इतके सुंदर returns देतात की आपल्याला ५% investment पण १००टक्के गोड फळं देऊन जातात. अगदी तस