नाण्याच्या दोन बाजू....

अरे ऐक ना, आज मी शाळेत गेलेले आपल्या चिनुच्या शिक्षकांना भेटायला. भरपुर कौतुक करत होत्या तिचं की ती खूप छान नृत्य करते आणि खूप छान प्रकारे सगळ्यांमध्ये रमते. पण...त्या हेही म्हणाल्या की तिला काऊंसेलींग (समुपदेशनाची) ची गरज आहे. शिक्षकांचं म्हणणं की ती डिस्टर्ब असते, ती सतत कुठल्यातरी विचारात असते आणि त्यामुळे तिला पटकन राग येतो. आत्ताच हे आपण नियंत्रणात आणलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या. 
अरे बोल ना काहीतरी, तुला काय वाटतं?
बाबा : बघू वेळ आली की आत्ता काहीच गरज नाहीये. चल यार जेवायला बसुया..

ही परिस्थिती हल्ली बऱ्याच घरांमध्ये असते मात्र ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. काहींना पटतं तर काहींना पटत नाही. मुलं जेंव्हा आईच्या पोटात असतं अगदी तेंव्हापासून ते शिकत असतं. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे ते पण एक भाग असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संस्कार त्या बाळावर होतं असतात. असं वाटतं की त्यांना काहीच कळत नाहीये पण खरंतर अगदी पहिल्या दिवसापासून ते शिकत असतात. नऊ महिने मुलं पोटात असतं, तेंव्हा ते मुलं एकदातरी आपल्याला आतून विचारतं का हो की आज मी किती वाढू? आज हात वाढवू का पाय? नाही विचारत, तर ते त्याच काम बरोबर करत असतं. मात्र बाहेरच्या जगात सगळचं नवीन असतं, वेगवेगळ्या संघर्षाना त्यांना सामोरं जावं लागतं. बरं अगदी जन्मल्यापासून त्यांचा हा संघर्ष सुरू होतो. म्हणजे अगदी डायपर बदलण्यापासून ते तुमच्यावर अवलंबून असतात. 
मगं जेंव्हा त्यांनाच कळत नसेल की आपल्याला एवढा राग का येतोय? किंव्हा आपण एवढे डिस्टर्ब का असतो? तेंव्हा त्यांना समजून घेणं , मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? Counselor कडे जाण हे काही वाईट नाहीये आणि काऊंसेलिंग साठी गेलात म्हणजे तुमच्या बाळाला काही प्रॉब्लेम आहे असंह  नाही.... जेंव्हा आपण त्यांना सांगतो की कोणालाही नावं नाही ठेवायची तेंव्हा नकळत पणे आपणच त्यांना लेबल लावतोय असं होतं. काऊंसेलिंग ही काळाची गरज आहे. आपण आयुष्यातल्या कुठल्याही समस्यांसाठी एका तिसऱ्या व्यक्तीचा (बऱ्याचदा मित्रमैत्रिणींचा) सल्ला घेतो अगदी तसचं आहे हे. बऱ्याचवेळा आपण नाण्याच्या एका बाजूला असतो आणि आपली मुलं ही दुसऱ्या बाजूला. आपल्याला जर त्यांना समजून घेता येत असेल आणि त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवु शकत असू तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. पण जर आपण ह्यात कमी पडत असू तर मात्र counselor कडे जायला काय हरकत आहे नाही का? 

कारण आपल्याला आणि त्यांना नाण्याची ती दुसरी बाजू कळलीच पाहिजे ना... 

#NehaP
*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही.😊🙏😊

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials