Posts

Showing posts from June, 2020

आलोय तुमचा निरोप घ्यायला..

Image
अथिती देवो भव.. ही म्हण तुमच्या जगात आहे. निश्चितच मला अशी वागणूक मिळणारच नव्हती. कारण बीनबुलाये मेहमानाच तुम्ही माणसं किती मनापासून स्वागत करता याबद्दल पण ऐकलंय.... मी तर सगळ्यात नावडता पाहुणा.  तुम्ही सगळ्यांनी माझा शोध घेतला. माझ्या विषयी जाणून घेतलं. मी तुमच्या जवळपास पण येऊ नये म्हणून तुम्ही खूप काळजी घेतलीत. माझ्याबद्दल अपशब्द पण उच्चारले.  " काळजी करू नका, मला त्याचा राग नाही आला. मी मान्य करतो की मी चुकलो.  खरंतर तुम्हाला जवळून बघितल्यावर असं जाणवलं की तुम्ही इतकेही वाईट नाही. काहीजणांनी माझ्यासाठी  कविता रचल्या, गाणी गायली. माझ्यासाठी अगदी मंत्र , आरत्या पण रचल्या. तर काहीजणांनी माझ्यावर विनोद केले, माझी चेष्टा केली.  माझ्या जाण्यासाठी जेवढे जमतील तेवढे उपाय केलेत. तुम्हाला मी दिसत नाही याचाही राग आला, पण काय करणार मला रूपच असे दिले. म्हणूनच आता निरोप घ्यायला आलोय कारण मला माहिती आहे, एक दिवस तुम्ही मला नष्ट करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही मान्य करा किंवा नका करू माझ्या येण्याने तुमच्या जीवनशैलीत भरपूर फरक पडला. अहो लहान मुलं तर किती खुश झालेत कारण त्यांना तुमचा सहवास म

कोरोना आणि ‍ बदलते नातेसंबंध

Image
नातं, एक असा शब्द जो एकमेकांना एकमेकांशी जोडतो. मगं त्या प्रत्येक नात्याला नावं असेलच असं नाही. काही नाती ही निःस्वार्थी उद्देशाने केलेली असतात, तर काही नाती कुठल्यातरी योजनेसाठी केलेली असतात.  नातं, घरातल्यांशी असुदे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनबरोबर असुदे. नातं, निसर्गाशी असुदे किंवा देशाशी असुदे. नातं, जुन्या काळातल्या (पुरातन) गोष्टींशी असुदे किंवा नवीन तंत्रज्ञानाशी असुदे. सगळ्यात महत्वाचं आहे, ते नातं जोपासणं. मगं ते जोपासताना तुम्हाला कधीकधी योग्य वेळेची वाट बघावी लागते.  कारण नातं जोडणं कठीण आहे पण तोडण खूप सोप्पं आहे.  जशी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहे अगदी तशीच नात्याला सुद्धा आहे. मोबाईल बंद झाला तर आपण (restart) परत चालू करतो. पण (restart) परत चालू करताना थोडा वेळ थांबतो.  कारण वेळ हेच औषध आहे. पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हणतात,  योग्य वेळ आली की सगळं नीट होईल.  बरं मग ती वेळ नक्की येणार कधी हे आपल्याला माहीत नसतं पण विश्वास ठेऊन आपण त्या वेळेची वाट बघत असतो. कारण मनात कुठेतरी एक आशेचा किरण लपून बसलेला असतो, ज्याला त्या योग्य वेळेची उत्सुकता असते. जणू क

आई , बाबा आणि मी

आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे पालकत्व स्वीकारणं. आपल्याकडे असं म्हणतात की आयुष्यातला दुसरा टप्पा हा पन्नाशी ओलांडली की मग सुरू होतो. पण मला तर वाटत की दुसरा टप्पा (second inning) हि आपण बाळाचा विचार करायला लागतो तेव्हाच सुरू होतो. कारण नंतरच आयुष्य (अगदी पन्नाशी ओलांडल्यावर सुध्दा) हे मुलांच्या अवतीभोवती असतं.  बाळाचा विचार करण्यापासून ते प्रत्यक्ष आई बाबा झाल्यावर कसं वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जावं लागतं त्यावर माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.  आई बाबा आणि मी हे शीर्षक मुद्दाम ठेवले आहे कारण पालकत्वामध्ये नुसते आई बाबा नाही तर त्यांचं मुलं (एक किंवा दोन) पण तेवढाच महत्वाचा भाग असतो.  आणि म्हणूनच आई बाबा आणि मी ह्यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.  तुमचा अभिप्राय नक्की कळवा. #NehaP

अस्तित्वाची तुलना

Image
कालच मी जब वी मेट बघत होते. त्यामध्ये नायिकेच स्वतः वर खूपच प्रेम असतं. तिचा ठरलेला डायलॉग म्हणजे मैं अपनी favourite हुं | असा आहे. चित्रपट बघताना खूपच भारी वाटत. एकदम जबरी वाटतं. असं वाटायला लागतं की बासच आपणच ती नायिका आहोत आणि आज पासून मी पण म्हणणार, की मैं अपनी favourite हुं |   असं म्हणत नकळत आपण त्या नायिकेच्या भूमिकेत शिरतो आणि उगाच वाटतं की आपण तिच्या पेक्षा नक्कीच चांगला अभिनय केला असता.  पण मग आजुबाजुच्या माणसांकडे बघितलं की असं वाटतं , जणू काही मालिकांमधल्या खलनायिका किंवा खलनायक आपल्याच नशिबात आहेत. तिथेच आपण ठरवतो की साध्या आयुष्यात आपल्या अस्तित्वाची तुलना केली जाते तीच सांभाळताना नाकिनव येतो . तर हे असं दुहेरी आयुष्य सांभाळताना काय होईल आपलं. खरंच हे सगळं सांभाळणं सोप्पं नाहीये.  मात्र एक विचार नेहमी येतो की आपल्याकडे तुलना करणं कधी थांबणार. प्रत्येक गोष्टीत तुलना. लहान मुलं एकत्र खेळत असतील तरी तुलना. अभ्यास करत असतील तरी तुलना करणार. खरंतर त्या मुलांमध्ये हे विचार निर्माण करणारे आपणच आहोत. अहो मुलं निरागस असतात त्यांच्या मनात हे विचार सुध्दा नसतात. मात्र आप

मैत्रिणींनो तुमच्यासाठी..,

Image
पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हटलं जातं की, नावं ठेवणं फार सोप्पं आहे पण कौतक करणं तेवढंच कठीण.  आज मात्र मला खरंच माझ्या सगळ्या मैत्रिणींच कौतुक करावस वाटतं. आम्ही सगळ्या आधुनिक पिढीतल्या म्हणजे चूल मुलं ह्या संकल्पनेतल्या तर आम्ही नक्कीच नाही. आधीच्या पिढीतल्या नक्कीच काही कारणास्तव त्या संकल्पनेत अडकलेल्या त्यामुळे त्यांचा आदर तेवढाच आहे.🙏🙏.  आमची पिढी बिनधास्त, बेधडक बोलणारी म्हणून तर नक्कीच  प्रसिद्ध आहे. काहीजण आमच्या संस्कारांचा उद्धार सुध्दा करतात. पण तो त्यांच्याकडे🙏🙏.  असं म्हणतात की आपण काळानुरूप बदललं पाहिजे. येईल त्या प्रसंगाना सामोरं जाता आलं पाहिजे. कदाचित ह्याचाच परिणाम आमच्यावर झाला. सध्याच्या lockdown च्या काळात खूप वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जातोय. त्यातून माझ्या सगळ्याच मैत्रिणींना साधारण ३-७/८ वर्षातली मुलं आहेत.  सकाळपासून थेट रात्री झोपे पर्यंत त्यांची कामं सुरूच असतात. त्यात काहीजणींचं work from home चालू आहे. ते सांभाळून घरची कामं आणि मुलांच्या शाळा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेच त्या कमी नाही पडत. मुलांना बाहेर जाता येत नाही म्हणून त्यांना नवीन

पालकत्व - हवंय की नकोय?

Image
पालकत्व - हवंय की नकोय?  काल माझ्या मैत्रिणीचा लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. सध्या lockdown असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी तिला फोन वरच शुभेच्छा दिल्या. खरंतर WhatsApp चे आभार आम्ही तिची anniversary Video call करून तरी साजरी करू शकलो.  खूप मजा आली. मात्र जेवढ्या खुश आम्ही होतो तेवढा आनंद जीची anniversary होती तिच्या चेहऱ्यावर नव्हता. वाटलं, कदाचित दमली असेल म्हणून आम्ही कोणीच काही बोललो नाही. पण जवळची मैत्रिण असल्यामुळे मला राहवलं नाही आणि रात्री उशिरा आम्ही दोघी बोललो.  आता लग्नाला ३ वर्ष झाली म्हंटल्यावर विषय साहजिकच मुलं कधी होणार हा होता. तेव्हा तिने सांगितलं की आम्हाला दोघांना IVF treatment आणि कुठलच औषधोपचार घ्यायचे नाही असं ठरलेलं परंतु समाज काय म्हणेल आणि घरातल्यांचे विचार ह्याच्या दबावाखाली येऊन तिच्या नवऱ्याने निर्णय बदलला. हे निम्मित ठरलं तिचा मूड जायला.  ते ऐकल्यावर असं वाटलं की, आपल्या आयुष्याचे निर्णय जर समाज घेणार असेल तर उगाच कर्तृत्वाच्या बाता तरी का करायच्या?. कारण शेवटी समाजात काय मान्य होईल तसेच आपण  वागतो.  सगळ्यात महत्वाचं लग्न ठरल्यापासून आपल्याकडे सगळे उपदेश द्यायला ल

आई बाबा आणि मी - पहिली गोष्ट

गोष्टीचं नाव -  मी केलेली मदत.   Hi, मी कोण आहे ते ओळखलं का? बरोबर, तुमचा मित्र शिवम. आजपासून मी रोज तुम्हाला गोष्ट सांगायला येणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनातली गोष्ट...  आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती आहे माझ्या मित्राची, "रियांश" ची.  खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. रियांश आपल्या आई बरोबर शाळेतून घरी परत येत होता. नेहमीप्रमाणे आई ने रियांश ला विचारलं, "अरे रियांश, आज तू तुझ्या मित्रमैत्रिणींना मदत केलीस का? आज टीचर ने काय शिकवलं? "  "रियांश, एकदम गप्प. तो काहीच बोलत नव्हता. " "आई ने परत विचारलं, बाळा काय झाल, तू गप्प का आहेस?" त्यावर रियांश म्हणाला, "आई माझ्या शाळेतली ती परी आहे ना, ती कधीच माझ्याबरोबर नीट नाही बोलतं."  "बरं, आई म्हणाली.  "तू , परी ला मदत करतोस का रे?" आई ने विचारलं.  रियांश म्हणाला, "ती नाही करत मग मी का करू?"  मगं रियांशच्या आईच्या लक्षात आलं आणि तिने त्याला नीट समजवून सांगितलं.  "रियांश, आपल्याला शक्य आहे तेवढी मदत आपण करायची. आता तू मला सांग तुला काही हवं असलं की मी किंवा बाबा तुला मद

आई बाबा आणि मी - भाग १ - ओळख

आपलं लहानपण हे पंचतंत्र इसापनीती आणि अश्या अनेक कथांच्या संग्रहाचा आनंद घेत गेला. ती जणू काही परंपराच होती. आपल्या काळात स्पर्धा होती पण कमी प्रमाणात ज्यामुळे आपल्याला कथांमध्ये रमायला वेळ मिळाला. पण हल्लीच्या पिढीच तसं नाहीये. अहो छोटा शिशु वर्गापासून ह्यांच्यात स्पर्धा सुरू होते. अशावेळी त्यांच्या वयाला मान्य असणाऱ्या आणि त्यांना यश - अपयशात मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या गोष्टी ह्या संग्रहातून आपण मांडणार आहोत.  आई बाबा आणि मी हा एक संग्रह आहे. रोजच्या जीवनातल्या घटनांच गोष्टी स्वरूपात रूपांतर करून आपण हा संग्रह तयार केला आहे.