टोपण नाव

बाळ जन्मल की आपण त्याच बारस करतो. जन्माला आल्याबरोबर त्याला चिनू, सोनू , मनु, पिल्लू अशी बरीच नावं ठेवतो. आयुष्यात सगळ्यात जास्त ओळख निर्माण होते ते आपल्या टोपण नावाने. काही जण व्यक्तीच्या स्वभावावरून
टोपण नावे ठेवतात तर काही आडनावावरून. बरं सगळ्या टोपण नावांना अर्थ असतोच असं नाही, काहींना असतो तर काहींना नसतो. 
एखाद्याच टोपण नाव इतकं प्रसिध्द असतं की तो व्यक्ती कितीही मोठा झाला तरी चारचौघात त्याला त्याच्या टोपण नावानेच हाक मारतात. अहो लग्नं मंडप पण सोडत नाहीत. तिथे तर नवरदेवाला टोपण नावाने त्याचा फोटोग्राफर हाक मारत होता. कमालच ना म्हणजे ... बरं मुलीकडच्यांना पत्रिका परत बघावी लागली की हा बालविवाह तर नाही ना😂🤣? कारण मुलाचं नाव वेगळच आणि लग्नमंडपात नवरदेव म्हणून कोणीतरी भलताच बबल्या उभा राहिला की काय🤔🤔😂

अहो अशी पण लोक आहेत जी फोन वरती दुसऱ्याचं व्यक्तीशी अर्धा तास गप्पा मारतात कारण त्यांचं टोपण नाव same असतं म्हणून. हा प्रसंग नेमका माझ्या बाबतीतच घडला. माझं आडनाव पटवर्धन त्यामुळे आमच्या घराण्याची टोपण नाव
पटू , पट्या, पटी अशी. आता एकाच घरात जर ५ पटू किंव्हा पट्या एकत्र राहत असतील आणि फोन वर नुसतं कोणी विचारलं की पट्या आहे का की ओळखायचं कसं? 🤔😂🤔
बरं ज्यांचा आवाज ओळखीचा आहे त्याचा फोन मात्र बरोबर त्या पट्या ला दिला जायचा. पण ज्यांचा आवाज ओळखीचा नाही त्यांनी पुढे काही बोलायच्या आत आम्ही म्हणायचो तुम्हाला नेमका कुठला पट्या हवंय? 
तसचं काहीसं झाल माझ्या मित्राच्या बाबतीत. शाळेत असताना माझ्या मित्राने घरी फोन लावला कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. तर तो फोन माझ्या आजी ने उचलला, आणि विनायक माझा मित्र त्याने विचारलं की पट्या आहे का? आजी म्हणाली हो आहे, किती सहजपणे उत्तरं दिलं. बरं ह्याने विचारावं ना की नेहा आहे का ते नाही तर त्याने माझ्या
आजीशी मी समजून गप्पा मारायला सुरावत केली. तो तिकडून बोलतोय आणि आजी इकडून अरे पण मी ती नाहीये. तुला कळत कसं नाही. बरं हा मुलगा थांबेल की नाही बोलायचं की कदाचित ही नेहा नाहीये असं समजून. पण ह्याची गाडी मात्र सुरूच होती आणि तो तिकडून माझ्या आजी ला म्हणत होता की बस काय पट्या मस्करी करते काय, काय फालतुगिरी आहे बोल ना पटू. असं जवळजवळ अर्धा तास चालू होतं. जेंव्हा बऱ्याच वेळानंतर माझी आजी म्हणाली की थांब तुझ्या घरातल्यांना फोन करते तेंव्हा त्याची खात्री पटली की ही ती पट्या नाही तर ही दुसरीच पट्या म्हणजे पट्याची आजी आहे. काय म्हणालात एवढावेळ मी काय करत होते? 
तर  एवढा वेळ मी एक पट्या दुसऱ्या पट्याची मजा घेत होते.😂🤣😂🤣 नंतर फटक मिळाले ते वेगळे. तर अशी फजिती होतं same टोपण नाव असलं की, आणि जर तुमचे आई वडील किंव्हा आजी आजोबा शाळेत किंव्हा बँकेत कामाला असतील तर मग धमाल. माझे बाबा बँकेत होते आता सेवानिवृत्त झाले पण मी कधी बँक मध्ये गेले की सुरवातच अशी होते की तू पट्या ची मुलगी ना? आणि मग आजूबाजूचा स्टाफ लगेच aiya ही बघ पट्या ची मुलगी आली आणि मग बाबांना हाक मारतात अरे पट्या तुझी मुलगी आली बघ. बरं ह्यावेळी माझ्या चेहऱ्यावर असे भाव असायचे जणू काही मी भारतरत्न मिळवून आणलाय आणि बाबांच्या चेहऱ्यावर भाव असे असायचे की मुली मी बँक मध्ये काम करतो माझी बँक नाहीये की रोज रोज तुला पैसे देईन.😂🤣😂🤣😂 
आपले बाबा घराजवळच्या बँक मध्ये जेंव्हा कामाला असतात तेंव्हा तर खरंच अख्खा रस्ता आपल्या बापाचा असल्याचं फिलिंग येतं. कारण येणारे जाणारे सगळेच अे तू पट्या ची मुलगी ना? असं विचारतात.. तर असं हे टोपणनाव आपलं आयुष्यभर आवडीच होतं. अजूनही माझे मित्रमैत्रिणी मला जेंव्हा पटू किंव्हा पट्या म्हणून हाक मारतात तेंव्हा बापाचा रस्ता आठवतो आणि मन भरून येतं. ....

पट्या

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials