कोरोना आणि ‍ बदलते नातेसंबंध

नातं, एक असा शब्द जो एकमेकांना एकमेकांशी जोडतो. मगं त्या प्रत्येक नात्याला नावं असेलच असं नाही. काही नाती ही निःस्वार्थी उद्देशाने केलेली असतात, तर काही नाती कुठल्यातरी योजनेसाठी केलेली असतात. 

नातं, घरातल्यांशी असुदे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनबरोबर असुदे. नातं, निसर्गाशी असुदे किंवा देशाशी असुदे. नातं, जुन्या काळातल्या (पुरातन) गोष्टींशी असुदे किंवा नवीन तंत्रज्ञानाशी असुदे. सगळ्यात महत्वाचं आहे, ते नातं जोपासणं. मगं ते जोपासताना तुम्हाला कधीकधी योग्य वेळेची वाट बघावी लागते. 

कारण नातं जोडणं कठीण आहे पण तोडण खूप सोप्पं आहे. 
जशी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहे अगदी तशीच नात्याला सुद्धा आहे. मोबाईल बंद झाला तर आपण (restart) परत चालू करतो. पण (restart) परत चालू करताना थोडा वेळ थांबतो. 

कारण वेळ हेच औषध आहे. पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हणतात,  योग्य वेळ आली की सगळं नीट होईल.  बरं मग ती वेळ नक्की येणार कधी हे आपल्याला माहीत नसतं पण विश्वास ठेऊन आपण त्या वेळेची वाट बघत असतो. कारण मनात कुठेतरी एक आशेचा किरण लपून बसलेला असतो, ज्याला त्या योग्य वेळेची उत्सुकता असते. जणू काही तो आशेचा किरण आपल्याला योग्य वेळ आली की भौ करणार आहे. 
वेळ हेच औषध जरी असलं तरी ते औषध गोड असेल की कडू हे कुणालाच माहीत नसतं. अहो गोड औषध कुणाला नाही आवडत पण तेच कडू निघाल तरी सुद्धा हिरमुसून जाऊ नका. कारण तेच कडू औषध नंतर चांगले परिणाम दाखवत. 

अहो नात्याच पण तसचं आहे. आपल्या नात्यात मतभेद, द्वेष, राग, दुरावा हे आजाराच्या रुपात आहेत, आणि त्यालाच बरं करायला कदाचित देवाने कोरोना सारख्या कडू औषधाला 
आपल्या आयुष्यात पाठवलाय. आता मात्र आपल्याला त्या कडू औषधाचा नीट उपयोग करून घ्यायचंय.

अहो म्हणजे हीच वेळ आहे आपले नातेसंबंध सुधारण्याची. मगं ते संबंध घरातल्यांशीच असणं गरजेचं आहे का तर नाही. आपलं नातं हे फक्त आई, बाबा , भाऊ, नवरा, ह्यांच्याशीच सीमित नाहीये. आपलं नातं ह्या निसर्गाशी आहे. आपलं नातं ह्या जगाशी आहे. आपलं नातं ह्या देशाशी आहे. 

होय, एक माणूस म्हणून आपली नाळ ह्या सगळ्यांशी जोडली गेली आहे. पण ह्या संधीचा फायदा कसा करून घ्यायचा ते आपल्या हातात आहे. काहीजण खरंच समाजसेवा करून ते नवीन नातं निर्माण करत आहेत. तर काहीजण घरात एकमेकांना मदत करून त्या नात्याला नवीन वळणं देत आहेत. म्हणजे त्यांना गोड औषध मिळालं असा होतो का? तर हे प्रत्येकाच्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांवर अवलंबून आहे. 

बरं आता तुम्ही म्हणाल, की घटस्फोटाचे प्रमाण वाढताना दिसताय. काही लोकं माणूस म्हणून चुकीची वागताना आपण बघतोय. अहो सगळ्यांनाच डॉक्टर एकच औषध देतो का? नाही ना, मग त्या लोकांचं पण तसचं झालंय. त्यांना ही आलेली वेळ योग्य नसेल कदाचित. पण म्हणून आपण त्यांच्या वागण्याला महत्व द्यायचं ? का आपल्याला मिळालेल्या वेळेचा उपभोग करून घ्यायचा? 

सगळ्यांनाच उपभोग करून घेणं जमते का? तर काही कारणास्तव नाही जमत. पण म्हणून ती लोकं वाईट होतं नाहीत. प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या परिस्थितीत एकमेकांना मदत करतोय. संचारबंदी मुळे सध्या सगळेच घरी आहेत. २४/७ ग्राहक सेवा जशी असते, अगदी तसचं घरातल्या सगळ्यांचं झालंय. २४/७ चा उपयोग आपण एक ग्राहक म्हणून नेहमीच घेतो , मगं ह्याचाच उपयोग आपल्या नात्यातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी केला तर काय हरकत आहे?  अहो आजकाल एकमेकांबरोबर २४/७ राहणं सोप्पं नसलं तरी एवढं कठीण नाहीये . मात्र ह्या २४/७ मुळे सगळ्यात खुश घरातली लहान मुलं आहेत. 

असं म्हणतात की, लहान मुलं देवाची सगळ्यात लाडकी असतात. कारण त्यांच्यात निरागसपणा असतो. कदाचित म्हणूनच हे कोरोनाच औषध मुलांना खूपच गुणकारी ठरलाय. त्यांना आई बाबांचा दिवसभर सहवास मिळाल्यामुळे, त्यांच्यातील नातेसंबंध सुधारायला वावं मिळाला. 

आपल्या प्रत्येकालाच माहितेय की, ही संचारबंदी आयुष्यभरासाठी नाहीये. पण आपली नाती ही आयुष्यभरासाठी आहेत. आहे त्या संधीचा फायदा करून बिघडलेल्या नात्यांना परत एकदा restart करूया. जसं लांब उडी खेळात, खेळाडू माग जाऊन धावत येतो आणि उंच उडी मारतो. अगदी तसचं आपल्या नात्याला थोडंसं मागे नेवूया. आयुष्यात पूर्वी घालवलेले चांगले , आनंदी क्षण आठवुया कारण कोरोना नंतरच्या काळात तेच आपल्याला प्रगतीसाठी (व्यवसायातली आणि नात्यातली ) उंच उडी मारायला मदत करणार आहे. 

धन्यवाद 😊🙏😊

# NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials