आठवणीतला थिबा पॅलेस

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मामाच्या घराशिवाय दुसरं काहीच आठवायचं नाही... आणि त्यातून माझ्या मामाचं घर रत्नागिरीत. आणि ते ही थिबा पॅलेस च्या बाजूला😎.. म्हणजे खूपच धमाल... बरं मामा कडे पूर्ण टोळीच जमायची, म्हणजे मी, आई ,दादा, मावशी, मावस बहिणी, दुसरा मामा मामी , मामे भाऊ असे सगळे मे महिन्यात रत्नागिरीतल्या मामा कडे जायचो.... आणि त्यातून आम्ही ठरलेले खेळ खेळायचो. ही जणू काही आमची परंपराच होती... 
बरं रत्नागिरीत आहोत म्हंटल्यावर आमचा दिनक्रम ठरलेला असायचा. मग तो अगदी काळया आणि पांढऱ्या समुद्रावर जायचा असू दे किंवा टिळक आळी मध्ये जायचा असु दे.. दिनक्रम पूर्ण करणं हा आमचा जन्मसिध्द अधिकारचं असल्यासारखे आम्ही वागायचो...
एवढ्या मोठ्या टोळीला फिरायला न्यायचं म्हणजे शिस्त तर हवीच. आणि हि महत्वाची कामगिरी आमचे मामासाहेब बजावायचे.. सगळ्यांच्या अटी पूर्ण करत एकदाची बाहेर पडायची वेळ व्हायची. आणि मग six seaters ना पण आम्ही मागे पाडू अश्या ३seater रिक्षा मध्ये आई, मावशी मामी, दादा, २ मावस बहिणी, मामे भाऊ आणि बहीण , मी आणि मामा... Huuusshh असे सगळे बसायचो... बरं हा माझा तिसरा मामा ज्याची रिक्षा होती...ती रिक्षा म्हणजे आमच्यासाठी मर्सिडीज पेक्षा आवडीची होती. कारण त्यामध्ये जी मजा होती ती गाडीत नाही यायची. आणि त्यावेळी मला खरतर उलगडा झाला की रिक्षाची बॅग ठेवायची मागची जागा किती जास्त आहे ते... मला प्रश्न पडतो की आमचा उत्साह बघून तर टाटा ने नॅनो न्हवती ना काढली?🙄🤔🤔
तर बाहेर कुठेही जायचं असुदे आमचा हा program ठरलेला असायचा....
तर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी थिबा पॅलेस ला जायचं होतं. सगळं आवरून आम्ही निघालो सुध्दा. थिबा पॅलेस बाजूलाच असल्यामुळे आम्ही चालतच जायचो.. बरं त्या दिवशी माझी आई आणि आम्ही मुलं एवढेच गेलेलो. आणि तेही मॉर्निंग वॉक करायला.. बर तो पॅलेस इतका मोठा आहे की एक फेरी पण पुरेशी होते. 
आणि त्यावेळी तो मला तिथे दिसला. त्याने मला बघितलं,मी ही त्याला बघितलं. आणि नंतर मात्र ४०० जन्मांच वैर असल्यासारखं तो माझ्या मागे पळायला लागला. आहो कुत्रा... तुम्हाला काय वाटलं..😂😂
बरं जिथे एक फेरी पुरेशी होते तिथे हा कुत्रा आज मला P.T.Usha बनवूनच सोडणार असा वाटत होतं. म्हणजे मी पुढे तो मागे.. चालूच होतं. आणि त्याचं वेळी माझ्या बहीण भावांनी माझ्यातला त्यांच्याबद्दलचा आदर कमी करायचाच ठरवला होता. सगळे हसत होते. आणि आई तर इतकी व्दिधा मनस्थितीत होती की हसू की रडू तिला सुचत नव्हतं. म्हणजे तिच्याकडे बघितल्यावर मला तर असं वाटलं की आज ही माझ्याकडून नीट वागण्याचं प्रॉमिस घेऊनच राहणार आणि मगच ह्या कुत्र्याला थांबवणार... मी पण ठरवलेलं की काही झाल तरी हार नाही मानायची ,आणि डायरेक्ट एका समोरच्यांच्या घरात कुंपणावर जाऊन पडले. मगं त्या घरातून सगळे बाहेर आले.आणि त्या कुत्र्याला पळवले. तेंव्हा कुठे बरं वाटलं. पण माझ्या भावंडांच हसणं काही थांबलं नाही... 
असो तर असा हा आठवणीतला थिबा पॅलेस.. बरं मला P.T.Usha सारखं मेडल तर नाही मिळालं पण आयुष्यभरासाठी एक किस्सा मिळाला जो आठवला की अजूनही हसायला येत आणि P.T.Usha झाल्याचं फिलिंग सुध्दा....

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials