Posts

Showing posts from July, 2020

शाळेत बाई आणि घरात आई

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे." ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? "  अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात..  आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो...   " नावात काय आहे "  असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी  "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे... २०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क

गोरी गोरी पान फुलासारखी छान......

Image
" काय झालं का गाणं म्हणून?"  अहो मी तुम्हालाच विचारत आहे. शिर्षकच असं आहे की गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.. हे गाणं आपोआप आपण गुणगुणारच.  आपल्या घरातली अशी एक व्यक्ती जिच्या बद्दल आपल्याला लहानपणापासून ओढ निर्माण होते. मगं ती सख्खी वहिनी असेल किंवा चुलत मामे वहिनी , आपल्याला तिची चाहूल हवीहवीशी असते. कारण कुठेतरी आपण तिला मनातूनच बहीण मानलेल असतं.  आपल्याकडे लग्नं ठरल्या दिवसापासून मुलींकडून अपेक्षांना सुरवात होते. ती कुणाचीतरी मामी होते, कुणाचीतरी काकू होते, कुणाचीतरी वहिनी, जाऊ होते.. अशी अनेक नाती तिला सांभाळायची असतात. खूप पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. बरं बाकीची नाती निभावताना तिला तिचं लग्नाआधीच्या आयुष्याची उणीव भासते.. तिला परत ते आयुष्य जगावस वाटतं.. कारण लग्नाआधी तिच्या आयुष्यात एक मोकळीक असते.  पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर नणंद भावजया (वहिनी) ह्यांच्यावर भरपूर किस्से लिहिले जातात. आमची पिढी तर सरळ तिला तिच्या नावाने हाक मारते. मला वाटतं आपण आपल्या घरातल्या सगळ्याच व्यक्तींना बरोबर ओळखत असतो. पण वहिनीने जर का आपल्या घरातल्यांविरुद्ध काह

हक्क - महत्वाचा की नाही?🤔🤔

Image
हक्क ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच बजावयची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत पहिल्यापासूनच हक्क ह्या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. सगळ्यात जास्त महत्व तर खुर्चीवरच्या हक्काला आहे. मग ती खुर्ची राजकारणातली असुदे किंवा बस आणि ट्रेन मधली, ती ज्याला मिळाली ते नशीबवान असतात. बरं त्याच्यामुळे आजूबाजूच्या नात्यांवर काय परिणाम होतील त्याची शाश्वती नाही..  मात्र तोच हक्क तुम्ही एकमेकांवर बजावला तर त्याचे परिणाम खूपच वेगळे असू शकतात. प्रत्येक गोष्टीला जश्या सीमा असतात अगदी तश्याच प्रत्येक नात्यात सुध्दा असतात. मग ते नात बहीण भावांच असेल, मित्र मैत्रिणीच असेल, आई मुलांमधले असेल, बाबा - मुलांमधले असेल, सासू- जावई मधले असेल, सासू - सूनेतल असेल.   आपल्याला वाटतं की असं काही नसतं आणि घरातल्यांशी वागताना कुठल्याच सीमा नाही ठेऊ शकत. सत्य पचवणं आणि मानणं कठीण असतं ते हेच. एरवी आपण पूर्वजन्मी च्या गोष्टी करतो. प्रारब्धाच्या गोष्टी करतो ते मान्य असतं कारण आपल्याला सोयीस्कर वागण्याची सवय झालेली असते.  जर का घराबाहेरच्या व्यक्ती बरोबर तुमचं खूप चांगलं पटतं असेल तर लगेच आपण म्हणतो, की गे