रव्याचा केक

दिवस पहिला - अरे रोज रोज काय नवीन बनवायचं खायला. कमालच आहे तुमची सगळ्यांची. तुम्हाला काय मी MasterChef India    ची विजेती वाटते का? 
असं म्हणत माझी मैत्रिण तिच्या रूम मध्ये गेली आणि ताबडतोप WhatsApp वर मीटिंग घेतली. आम्हाला जाहीर आव्हानं केली की मला जो कोणी चांगली आणि वेगळी रेसिपी देईल त्याला lockdown संपल्यावर मी पार्टी देईन. फुकट ते पौष्टिक असा विचार करत आम्ही लगेच आपल्याला येत असलेल्या आणि YouTube वर बघितलेल्या रेसिपी पाठवल्या. स्वतः साठी जेवढ्या रेसिपी शोधल्या नाहीत तेवढ्या तिच्यासाठी शोधल्या. कारण फक्त एकच संचारबंदी नंतर फुकट खायला मिळणार..😂
एवढ्या सगळ्या पाठवलेल्या रेसिपी मधून तिने रवा केक ची रेसिपी निवडली. जिने ही रेसिपी सुचविलेली तिने तर लगेच देवांना पाण्यात ठेवलं. हो बरोबर कारण कळलच असेल... फुकट ते पौष्टिक... बरोबर... आता मात्र संचारबंदी लवकर जाणार याची खात्री आम्हाला झाली. अहो देव जे पाण्यात आहेत.
आणि तिने रवा केक बनवायला सुरवात केली
पहिल्या दिवशी तिने प्रयत्न केला पण काही कारणास्तव त्या केक मध्ये खड्डा पडला. बरं तिला chocolava केक करता आला असता, आम्ही सुचवल सुध्दा. पण you know she believes in simplicity.🙄🙄 त्यामुळे आमचे ऑप्शन्स तिने नाकारले आणि उद्या परत बनवणार असं म्हणून ती ऑफलाईन झाली.

दिवस दुसरा -  आमची दुसरी मैत्रिण आमच्या पहिल्या मैत्रिणीला. अगं आज करणार आहेस ना तू केक परत? हे बघ मी काल बनवला. खूपच सोप्पा आहे अग. आणि मग हिने तिला नवीन सूचना दिल्या. पण तरीसुध्दा केक फसला.

दिवस तिसरा - आमची तिसरी मैत्रिण आमच्या पहिल्या मैत्रिणीला. अगं आज होईलच तुझा केक. बघ मी सांगते तसं कर, मी स्वतः काल करून बघितला. पण त्या केक चां काही मुहूर्त लागेना.. परत फसला.

बरं जिने रेसिपी दिली आणि त्या दोन मैत्रीणी ज्यांनी केक केला त्यांचा पचला सुध्दा. पण हीचा मात्र काही केल्या केक होतं नव्हता. जिने रेसिपी दिली तिने परत तिला सुधारित आवृत्ती दिली आणि एवढंही म्हणाली की बाई मी तुला फुकट खायला बोलवेन पण तो केक नीट बनव. 
तर असं करत करत आमच्या ग्रुप मधल्या सगळ्यांनी केक बनवला पण हीचा मात्र काही केल्या केक तयार होईना. 
आणि ह्या तिच्या आगळ्यावेगळ्या रेसिपी ने स्वतःची simplicity सोडून देवून रव्याच्या लाडवांचा आकार धारण केला आणि लगेच स्टेटस वर अपलोड करत म्हणाली... You know I believe in simplicity..😂😂🤦‍♀️🤦‍♀️

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials