चाळिशीतला - दुसरा अंक...
चाळीशीतला - दुसरा अंक... सध्या मराठी नाटकांना खूप मोठ्या संख्येने गर्दी होतं आहे. बरं आजकाल नाटकं सुद्धा दोन अंकी असतात. फार क्वचित तीन अंकी नाटक होतं असेल. हाऊसफुल चा बोर्ड बऱ्याच नाट्यगृहात पाहायला मिळतो कारण हल्लीच्या नाटकांचे विषय हे प्रामुख्याने सध्याच्या काळाला अनुसरून असतात. काही महिन्यांपूर्वी अतुल सुभाष ह्यांच्या आत्महत्येने पूर्ण देशाला हलवून सोडलं होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला सुद्धा १९७०-१९८८ मधले कितीतरी जणं आहेत जे स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही जणं यशस्वी झाली आहेत, मग ते त्यांच्या करीअर मध्ये असेल किंवा खाजगी आयुष्यात असेल पण असे बरेच जण आहेत ज्यांना अजूनही झुंज द्यावी लागत आहे. स्वतः पेक्षा कमी वयाच्या मुलांना आपला बॉस म्हणून बघणं आणि राजकारण सहन करणे तेही त्यांच्यापेक्षा कमी पगारात, हे कठीण आहे. GenZ ना मिळणारा पगार आणि त्या तुलनेत ह्यांना मिळणारा पगार ह्यामध्ये खूप तफावत आढळते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे १९७०-१९८८ मधल्या मुलांना नेहमीच तुलनेला सामोरं जावं लागतं. ओळखीतल्या लोकांना हे बोलणं खूप सोपं आहे, की चाळ...