Posts

Showing posts from April, 2020

" पासवर्ड "

Image
(आदी ची आई ) आदी ची आई : काय फालतुगिरी आहे यार... कळतंच नाही की कसं वागायचं आदि बरोबर. असं वाटतं की आपण केलेले संस्कार गेले कुठे? लहानपणी तर असा नव्हता हा. माझ्याशी सगळं बोलायचा, शेअर करायचा आणि आता काहीच शेअर नाही करत तो माझ्याबरोबर. असा तर नव्हता अगं आदी. कळतंच नाही की कसं वागायचं आम्ही , म्हणजे हा नीट वागेल आमच्याशी.  हे संवाद बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतात. मुलं लहान असतात तेंव्हा ते आई बाबा बरोबर सगळं शेअर करतात. असं म्हणतात की जनरेशन गॅप मुळे हे वादविवाद होतात. मला असं वाटतं की हे वादविवाद होतात कारण आपण आपल्या मुलांमधल्या बदलला ला स्वीकारू शकत नाही. लहान असताना आपल्या मुलाने कुठलीही मस्ती केली तरी आपण त्यांना स्वीकारायचो कारण ते निरागस होते. आपल्यामध्ये संवाद असायचा, कारण त्यांना आपण मुक्त पणे  स्वीकारायचो. मुलांनाही वाटायचं की कधी एकदा शाळा सुटते आणि घरी जाऊन मी आज काय काय घडलं ते आई बाबा बरोबर शेअर करतोय. छोट्यातली छोटी गोष्ट सुध्दा ते आपल्याला येऊन सांगायचे. जनरेशन गॅप तेंव्हा होतीच की, मगं मोठे झाल्यावर असे काय घडलं की आपल्यापासून गोष्टी लपवायला त्यांना " पासवर्ड

टोपण नाव

बाळ जन्मल की आपण त्याच बारस करतो. जन्माला आल्याबरोबर त्याला चिनू, सोनू , मनु, पिल्लू अशी बरीच नावं ठेवतो. आयुष्यात सगळ्यात जास्त ओळख निर्माण होते ते आपल्या टोपण नावाने. काही जण व्यक्तीच्या स्वभावावरून टोपण नावे ठेवतात तर काही आडनावावरून. बरं सगळ्या टोपण नावांना अर्थ असतोच असं नाही, काहींना असतो तर काहींना नसतो.  एखाद्याच टोपण नाव इतकं प्रसिध्द असतं की तो व्यक्ती कितीही मोठा झाला तरी चारचौघात त्याला त्याच्या टोपण नावानेच हाक मारतात. अहो लग्नं मंडप पण सोडत नाहीत. तिथे तर नवरदेवाला टोपण नावाने त्याचा फोटोग्राफर हाक मारत होता. कमालच ना म्हणजे ... बरं मुलीकडच्यांना पत्रिका परत बघावी लागली की हा बालविवाह तर नाही ना😂🤣? कारण मुलाचं नाव वेगळच आणि लग्नमंडपात नवरदेव म्हणून कोणीतरी भलताच बबल्या उभा राहिला की काय🤔🤔😂 अहो अशी पण लोक आहेत जी फोन वरती दुसऱ्याचं व्यक्तीशी अर्धा तास गप्पा मारतात कारण त्यांचं टोपण नाव same असतं म्हणून. हा प्रसंग नेमका माझ्या बाबतीतच घडला. माझं आडनाव पटवर्धन त्यामुळे आमच्या घराण्याची टोपण नाव पटू , पट्या, पटी अशी. आता एकाच घरात जर ५ पटू किंव्हा पट्या एकत्र राहत असतील

" दत्तक "

Image
आदी ची आई : अरे तुला माहितेय का, आपल्या आदीच्या वर्गात ती परी आहे ना तिला म्हणे दत्तक घेतलाय. आदी चे बाबा : ओके, तुला कसं कळलं?  आदी ची आई: तिच्या शेजारीच माझ्या मैत्रिणीची बहीण राहते. तिच्याकडून कळलं.  .....तेवढ्यात आदी आत येतो... आई दत्तक म्हणजे काय?  काही नाही रे आदी दत्तक म्हणजे जी मुलं अनाथ आश्रमात असतात ना त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात त्यांना दत्तक म्हणतात. बरं तू जाऊन झोप आता, उद्या शाळा आहे ना.. ओके म्हणत आदी झोपायला जातो.  दुसऱ्यादिवशी शाळेत जायची तयारी सुरू असते, पण आदी च्या मनातून " दत्तक " हे काही गेलेलं नसतं आणि तो लगेच ठरवतो की शाळेत जाऊन पहिल्यांदा परी ला विचारायचं. तो शाळेत जातो आणि लगेच परी ला विचारतो की तुला दत्तक घेतलाय का ग? तुला अनाथ आश्रमातून आणलाय का ग? माझी आई म्हणाली की जी मुलं अनाथ आश्रमात असतात त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात.  परी ला काय बोलायचं ते सुचत नाही. ती गप्प बसते आणि फक्त एवढंच म्हणते आईला विचारून सांगते.. पण मनामध्ये खूप जास्त दुखावलेली असते. ती शाळा सुटल्यावर घरी जाते आणि आई ला विचार

नाण्याच्या दोन बाजू....

Image
अरे ऐक ना, आज मी शाळेत गेलेले आपल्या चिनुच्या शिक्षकांना भेटायला. भरपुर कौतुक करत होत्या तिचं की ती खूप छान नृत्य करते आणि खूप छान प्रकारे सगळ्यांमध्ये रमते. पण...त्या हेही म्हणाल्या की तिला काऊंसेलींग (समुपदेशनाची) ची गरज आहे. शिक्षकांचं म्हणणं की ती डिस्टर्ब असते, ती सतत कुठल्यातरी विचारात असते आणि त्यामुळे तिला पटकन राग येतो. आत्ताच हे आपण नियंत्रणात आणलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.  अरे बोल ना काहीतरी, तुला काय वाटतं? बाबा : बघू वेळ आली की आत्ता काहीच गरज नाहीये. चल यार जेवायला बसुया.. ही परिस्थिती हल्ली बऱ्याच घरांमध्ये असते मात्र ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. काहींना पटतं तर काहींना पटत नाही. मुलं जेंव्हा आईच्या पोटात असतं अगदी तेंव्हापासून ते शिकत असतं. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे ते पण एक भाग असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संस्कार त्या बाळावर होतं असतात. असं वाटतं की त्यांना काहीच कळत नाहीये पण खरंतर अगदी पहिल्या दिवसापासून ते शिकत असतात. नऊ महिने मुलं पोटात असतं, तेंव्हा ते मुलं एकदातरी आपल्याला आतून विचारतं का हो की आज मी क

बाबा गोष्ट सांग ना...

Image
बाबा गोष्ट सांग ना... गोष्ट, झोण्यापूर्वी गोष्ट सांगणं ही जणू काही एक परंपरा आहे आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे अजूनही ते चालू आहे. काळाप्रमाणे माणसाला बदलणं गरजेचं आहे अगदी तसचं आजच्या काळातल्या पालकांचं झालंय. आता तो काळ गेला जेंव्हा आपण मुलांना चिऊ काऊ च्या गोष्टी सांगायचो. हल्लीचा काळ हा super heros चा आहे. बरं आज एका सुपर हीरो ची गोष्ट सांगितली तर दुसऱ्यदिवशी नवीन गोष्ट चालतं नाही हा. एका गोष्टीत सुपर हीरो संपत नाही तर त्याच्या सिरीज लागतात. आणि मग तो सुपर हीरो जणू काही आपला घरचा सदस्य असल्यासारखा नांदायला लागतो. म्हणजे बघा ना घरात मुलांच्या खोलीत सुपर हीरो ची थीम पाहिजे. नंतर शाळेचं दप्तरापासून पेन्सिल आणि खोडरबर पण त्याचं तर थीम चं हवे.  खरंतर पालकांनी त्याचं आधार कार्ड आणि pan card काढायला हरकत नाही..😂😂... फारफार तर त्याला स्लीपिंग पार्टनर दाखवा...जो घरात काहीच करत नाही, जो घर खर्च ही करत नाही पण घरात वर्चस्व मात्र त्याचच चालतं. 😂. सुपर हीरो मुळे मुलांची कल्पनाशक्ती नक्कीच वाढते. इतक्या लहान वयात नवीन कल्पना सुचणं आणि त्याच्या आधारावर गोष्टी सांगणे हे मुलांच्या वयाच्य

झोपेतली लंगडी

पाळणाघर, काही जणांसाठी आवडीची जागा असते तर काही जणांसाठी पर्याय नाही म्हणून राहायची जागा. हल्लीच्या काळात त्याला Daycare अस म्हणतात.  मी सुध्दा लहान असताना पाळणाघरात जायचे. खूप मजा असायची. आम्ही जवळपास १२-१३ मुलं होतो पाळणाघरात. बर आमचं पाळणाघर एका सोसायटी मध्ये असल्याने सोसायटी मधली मुलं आणि आम्ही अशी मोठी team असायची खेळायला. जरी सुट्टी असली तरी आई बाबांना सुट्टी नाही म्हणून आम्ही मात्र पाळणाघरात असायचो. मगं काय, संपूर्ण दिवस खेळ खेळायचे आणि नुसती धमाल करायची. सगळ्या मुलांमध्ये मी लहान होते. मला कोणी नाव विचारलं की मी नाही सांगायचे. कारण त्याच वेळी मला कळलं होतं की नावात काय आहे.😂😂..खरी गोष्ट ही होती की माझं आडनाव पटवर्धन आणि त्या वेळी मला र्ध म्हणता यायचा नाही. पण सांगणार कोणाला, तरी मी धीर करून सांगायला लागले की माझ नाव नेहा वसंत पटकनधर.. 😂🤦‍♀️🙈😂.. असा हा एक आणि अनेक किस्से पाळणाघरात घडले. त्यातला नेहमी लक्षात राहणारा किस्सा म्हणजे झोपेतली लंगडी.. मी साधारण पाचवीत किंव्हा सहावीत असेन. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पाळणाघरात सकाळपासून असायचो. आम्ही सगळ्यांनी लंगडी धावकी खेळायचे

मतदान हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी निभवणारच....

इलेक्शन म्हटलं की काही वेगळच वातावरण असतं. प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असते की नक्की कोण जिंकून येणारं? आपण ज्याला मतं देऊ तोच येईल ना? दुसरा कोणी निवडून आला तर?  असे अनेक प्रश्न मनात असतात. तसेच जे पहिल्यांदा मतदान करणारे असतात, त्यांच्या पण मनात बरेचं प्रश्न असतात. मगं ते प्रश्न दोन तीन दिवस आधीच सुरू होतात. तसच काहीसं झालं माझ्या बाबतीत. मी पहिल्यांदा मतदान करणार होते. मी कधीच मतदान केलं नव्हतं. कारण काही कारणास्तव माझा इलेक्शन कार्ड चं आल नव्हतं. असो तर घडल असं की, इलेक्शन ला दोन दिवस बाकी होते. आणि मी माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारत होते. की अरे परवा आपल्याला किती वाजता रांगेत उभे रहायचे आहे? बरं pan card लागेल का? नक्की procedure काय असते? तू थांबशिल ना माझ्याबरोबर? असे अनेक प्रश्न विचारले. हल्ली ह्या YouTube मुळे उत्तर देणं सोप्पं झालंय. त्याने सांगितलं की YouTube वर बघ तुला videos मिळतील. पहिल्यांदा मतदान करताना काय काय करायचं ते. असं सांगून हा जागरूक नागरिक झोपी गेला. मला पण त्याच्याकडूनच उत्तर हवं होतं. म्हणून मी पण videos नं बघता झोपून गेले. इलेक्शन ला एक दिवस बाकी होता. सकाळ

तूच माझी सारथी....

सारथी म्हणजे मार्गदर्शक... सारथी म्हणजे योग्य दिशा दाखवणारा..... सारथी म्हणेच सूत्रधार....  प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते जी कळत नकळत पणे आपला/ आपली सारथी असतो/ असते... आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असते. मगं ते मार्गदर्शन आयुष्यातलं असेल किंव्हा दिशा म्हणजे रस्ता किंव्हा पत्ता  दाखवण्याचे असेल. आपण त्याच्यावर इतके अवलंबून होतो की जो पर्यंत त्यांच्याकडून आपल्याला संकेत येत नाही, तो पर्यंत आपण पुढचं पाऊल उचलत नाही.  अश्याच दोन मैत्रीणी आहेत माझ्या आयुष्यात ज्या मला खरंच आयुष्यात छान मार्गदर्शन करतात. पण दिशा(पत्ता/रस्ते) दाखवताना त्यातली एक खरंच सारथी आहे आणि दुसरी जिला वाटत की ती सारथी आहे आणि योग्य दिशा (पत्ता) दाखवू शकते. म्हणजे जिला स्वतः ला रस्ते पाठ होतं नाहीत म्हणून आम्ही आणायला आणि सोडायला जातो, ति कोणालातरी पत्ता सांगते. बरं आपण सांगितलेला पत्ता बरोबर  आहे की नाही ते तिला माहित नसतं.  म्हणजे झाल काय की आम्ही तिघी जणी आणि तिची बहीण आमच्या गल्ल्यांमध्ये फिरतं होतो. त्या वेळेला एक गृहस्थ आमच्या समोर आले आणि त्यांनी पत्ता विचारला. एवढ्या आम्ही तिघी जणी असताना त्यांनी त

रव्याचा केक

Image
दिवस पहिला - अरे रोज रोज काय नवीन बनवायचं खायला. कमालच आहे तुमची सगळ्यांची. तुम्हाला काय मी MasterChef India    ची विजेती वाटते का?  असं म्हणत माझी मैत्रिण तिच्या रूम मध्ये गेली आणि ताबडतोप WhatsApp वर मीटिंग घेतली. आम्हाला जाहीर आव्हानं केली की मला जो कोणी चांगली आणि वेगळी रेसिपी देईल त्याला lockdown संपल्यावर मी पार्टी देईन. फुकट ते पौष्टिक असा विचार करत आम्ही लगेच आपल्याला येत असलेल्या आणि YouTube वर बघितलेल्या रेसिपी पाठवल्या. स्वतः साठी जेवढ्या रेसिपी शोधल्या नाहीत तेवढ्या तिच्यासाठी शोधल्या. कारण फक्त एकच संचारबंदी नंतर फुकट खायला मिळणार..😂 एवढ्या सगळ्या पाठवलेल्या रेसिपी मधून तिने रवा केक ची रेसिपी निवडली. जिने ही रेसिपी सुचविलेली तिने तर लगेच देवांना पाण्यात ठेवलं. हो बरोबर कारण कळलच असेल... फुकट ते पौष्टिक... बरोबर... आता मात्र संचारबंदी लवकर जाणार याची खात्री आम्हाला झाली. अहो देव जे पाण्यात आहेत. आणि तिने रवा केक बनवायला सुरवात केली पहिल्या दिवशी तिने प्रयत्न केला पण काही कारणास्तव त्या केक मध्ये खड्डा पडला. बरं तिला chocolava केक करता आला असता, आम्ही सुचवल सुध्

आठवणीतलं फ्रॅक्चर

सुट्टी म्हणजे नुसती मजा मस्ती आणि धमाल हे जणू आमचं ब्रीद वाक्य होतं. बरं परीक्षेचं किंव्हा अभ्यासाचं वेळापत्रक जेवढं सिरीयसली आम्ही घेतलं नाही तेवढंच आम्ही सुट्टीमध्ये काय काय खेळायचं ह्याच वेळापत्रक सिरीयसली घेतलं..  मगं ते लंगडी धावकी असेल, डबाईसपाईस असेल , भेंड्या असतील किंव्हा भाड्याने सायकल आणून सायकलिंग असेल.. आम्ही कधीच हे वेळापत्रक मोडलं नाही. म्हणजे त्यावेळी ब्रम्हदेव जरी आला असता ना तरीआम्ही आमचं वेळापत्रक मोडल नसतं.  त्या दिवशी ही तसंच झाल. आम्ही सगळ्या थोडं लवकरच जमलो खेळायला. पण आम्ही आमचे नियम मोडले नाहीत. आणि आमच्या बिल्डिंगच्या मागच्या टाकीवर जाऊन बसलो. तेंव्हा का कोण जाणे पण आम्हाला खत्रों के खीलाडी मध्ये भाग घेतल्यासारखे वाटले आणि त्या टाकीला लागून असलेल्या दुसऱ्या टाकीवर आम्ही शिडीच्या आधाराने चढलो. आणि मग काय नवीन खेळ आमचा सुरू झाला. एका मागोमाग एक आम्ही उड्या मारायला लागलो. आणि जी धमाल सुरू झाली की practice makes a man perfect हि म्हण जणू आम्ही खरी करायचीच ठरवली होती. मात्र आमची एक मैत्रिण उड्या मारायला तयार नव्हती. पण आम्ही सुध्दा जिद्दी होतो. Friend in need is a

आठवणीतला थिबा पॅलेस

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मामाच्या घराशिवाय दुसरं काहीच आठवायचं नाही... आणि त्यातून माझ्या मामाचं घर रत्नागिरीत. आणि ते ही थिबा पॅलेस च्या बाजूला😎.. म्हणजे खूपच धमाल... बरं मामा कडे पूर्ण टोळीच जमायची, म्हणजे मी, आई ,दादा, मावशी, मावस बहिणी, दुसरा मामा मामी , मामे भाऊ असे सगळे मे महिन्यात रत्नागिरीतल्या मामा कडे जायचो.... आणि त्यातून आम्ही ठरलेले खेळ खेळायचो. ही जणू काही आमची परंपराच होती...  बरं रत्नागिरीत आहोत म्हंटल्यावर आमचा दिनक्रम ठरलेला असायचा. मग तो अगदी काळया आणि पांढऱ्या समुद्रावर जायचा असू दे किंवा टिळक आळी मध्ये जायचा असु दे.. दिनक्रम पूर्ण करणं हा आमचा जन्मसिध्द अधिकारचं असल्यासारखे आम्ही वागायचो... एवढ्या मोठ्या टोळीला फिरायला न्यायचं म्हणजे शिस्त तर हवीच. आणि हि महत्वाची कामगिरी आमचे मामासाहेब बजावायचे.. सगळ्यांच्या अटी पूर्ण करत एकदाची बाहेर पडायची वेळ व्हायची. आणि मग six seaters ना पण आम्ही मागे पाडू अश्या ३seater रिक्षा मध्ये आई, मावशी मामी, दादा, २ मावस बहिणी, मामे भाऊ आणि बहीण , मी आणि मामा... Huuusshh असे सगळे बसायचो... बरं हा माझा तिसरा मामा ज्याची रिक्षा होती

मी, माझ्या मैत्रीणी आणि बकुळीची फुलं

Image
अगं ऊठ लवकर सकाळचे ५:३० वाजलेत जायचयं ना शाळेला. आईचे नेहमीचे संवाद सुरू झाले आणि ते मी शाळेत जायला निघे पर्यंत चालू होते. मगं अगदी ते मी घरात किती कामं करते आणि एक मुलगी म्हणून किती केली पाहिजेत इथपर्यंत.... म्हणजे सूर्योदयाच्या आधीच आमच्या घरात माझा उजेड पडलेला असतो. बरं ह्याच्यात मी मुलगी असल्याचा काय  सबंध?असं मला नेहमीच वाटायचं. असो तर एवढं सगळं करत मी शाळेत जायच्या दुसऱ्या टप्प्यात पोहचायचे. आणि दुसरा टप्पा म्हणजे मैत्रिणींना बोलावणे. ती तर खरंच एक मजा असायची. कोकिळेच्या आधी आम्ही सगळ्या कोकिळा एकमेकांना हाक मारयचो.  फक्त एवढंच असायचा की आमच्या आणि खऱ्या कोकिळेच्या आवाजात फरक असायचा..😂😂.. आणि इथे दुसरा टप्पा संपायचा. मगं तिसरा टप्पा की आमची एक मैत्रीण जी आमच्या सोसायटीच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहायची तीला बोलावणं. तिला मात्र आम्ही घरी जाऊन बोलवायचो. कारण तिची एक खासियत म्हणजे ती तयार होऊन झोपायची. आणि आम्ही हाका मारल्या  की मग ती उठायची. बरं हे सगळं आम्ही पंधरा मिनिटात करायचो.  जर का आमच्या वेळी hurdle race असती ना तर कदाचित आम्हीच जिंकलो असतो.  एवढं सगळं झाल्यावर आमच्या मै