Posts

Showing posts from February, 2020

माझ्यातली मी...🤗🤗

लहान असताना काय धमाल करायचे मी...🥳🥳😄😄.. आता किती बदल्ल्यासारखं वाटतं यार.... काश परत लहान होता आलं असतं तर, किती मज्जा आली असती... असे सगळे सवांद माझे माझ्या मैत्रीणी बरोबर फोन वर चालू होते... थोड्यावेळाने फोन ठेवतांना मी तिला म्हणाले की जाऊदे यार सवय झाली आता... आणि मग फोन ठेवून दिला...  आणि मग काय , जसा फोन ठेवला, तसं प्रश्नाचं जाळं निर्माण झाले...  खरंच हि मी आहे🤔🤔? का मी दुसऱ्याचं आयुष्य जगतेय? का रूटीन ची इतकी सवय झालिये की मी स्वतःला विसरून गेलीये?🙄🙄🧐🧐🧐🤔.... हळूहळू सगळं उलगडायला लागलं, की माझ्यातल्या मी ला ,  मी विसरून  गेलीये.  असं म्हणतात की मुलीचं आयुष्य लग्नानंतर बदलतं... अर्थात् मुलाचं ही बदलत.... पण मुलींचे थोड्या जास्त प्रमाणात बदलतं. अगदी आडनांवापासून सगळं बदलतं... आणि मग उरलेलं सगळं आयुष्य तिचं तीच्या माहेरच्या आडनांवाला सिद्ध करण्यात जातं.  उदाहरण द्यायचं झालं तर आपली आई सुद्धा लग्नाच्या इतक्या वर्षानंतर तिच्या माहेरच्या आडनांवाचा जप करते. चारचौघात जर का तिच्या माहेरच्या आडनांवाचं कोणी असले तर काही वेगळंच तेज येतं चेहऱ्यावर. आणि मग वेगळीच ट्रीटमेंट मिळते त्य

guests = relatives or audience = comfort zone ?

" आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. कळलं ना, घर नीट आवरून ठेव. आणि नीट वाग ते आले की, उगाच मला ओरडायला लावू नकोस...." असे नेहमीचेच सवांद प्रत्येकाच्या घरात होतं असतात. पाहुणे येणार असं म्हटलं की घरातलं वातावरण काही वेगळच असतं.  सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे कोण येणार आहे नक्की?   कारण जसे खाण्याच्या पदार्थांना आपण आपल्या आवडी नुसार devide केलेलं असतं, अगदी तसंच पाहुण्यांना पण devide केलेलं असतं.. म्हणजे काही पाहुणे सारखे यावेत असे वाटते... काही पाहुणे आले तरी ठीक नाही आले तरी ठीक असे वाटते... आणि काही येणार असले की आधीच आपण घरी declare करतो, की मी उद्या बाहेर जातेय 😂😂🤫🤫🤐🤐... कारण आपण आपली comfort zone शक्यतो मोडण्याचा विचार नाही करत.  बरं त्यातून घरी लहान मुले असली की मग ती मुलं फारच द्विधा मनःस्थितीत असतात. कारण तो त्यांचा performance चा दिवस असतो. म्हणजे जेवढं ऑडिशन्स ती मोठी झाल्यावर देत नाहीत, तेवढं ते लहानपणी पाहुण्यांसमोर देतात.😂🤣🤣😬😬🥺🥺🥺😰😰😵😵...  कारण जसे पाहुणे येतात, तसे लगेच आई बाबा सूचना द्यायला लागतात, की अरे/अगं तुला शाळेत शिकवलं ते म्हणून दाखव

आईचं पत्र हरवलं🤔🤔🤫🤫😂😂

आईचं पत्र हरवल ते मला सापडलं..... लहानपणी हा खेळ बऱ्याच वेळेला खेळायचो. पण सध्याच्या जगात असं बऱ्याच वेळेला जाणवतं की मुलींच्या आई पत्र लिहायला विसरल्या बहूतक🤔🤔🤔... कारण हल्ली मुलांच्या आई ची पत्र फारच फिरतं असतात सोशल मीडिया वर.🤐🤐🤐😂..  आणि सुरवात पण एकदम धडाकेबाज असते (मुलाचं लग्न करताय सावधान )... आणि मग त्याच्यात हल्लीच्या मुलींच्या वागुणुकीच वर्णन करतात...😂😂🧐🧐🤦‍♀️🤦‍♀️..... बरं अपेक्षांमध्ये मुलगी modern हवी... आणि लग्न झाल्यावर हाच मॉडर्नपणा नकोसा होतो.... बरं जावयाचा उद्धार करणारी पत्र अजूनतरी दिसली नाहीत 🧐🧐😂😂🧐🧐.... पण सुनेचा उद्धार करणारी भरपूर दिसली... म्हणतात ना आज की नारी सबपे भारी 👩‍🏫👩‍🎓👩‍💻🧗🧘💇👰👩‍✈️👩‍🔬👩‍⚕️👩‍🏭👩‍🎨👩‍🎤🧕😂😂🤫🤫🤣... म्हणजे जसं रोज FB , WhatsApp ओपन केलं की आपल्या मित्र - मैत्रिणींचे लग्न झाल्याचे, डोहाळजेवणाचे, साखरपुड्याचे पोस्ट असतात.... अगदी तसचं मुलांच्या आईंची पत्र असतात... आणि मग त्यावर होणाऱ्या गंभीर चर्चा 😂🤣🤣🤫...  अश्या वेळी खरंच वाटतं की काश मुलींच्या आईंनी पत्र लिहिली असती तर🤔🤔🤔🤔.... हल्लीच्या मुली आपली मतं

मोठी झालेली लहान मुले...🤔🥺🤫🤐😬🙄😂😊

हो... हो... अगदी बरोबर वाचलत. मोठी झालेली लहान मुले. ह्यांच्या बद्दलच बोलायचं आहे मला. तुमच्या मनात विचार येतील सुद्धा की मुलं मोठी झाली तर ती लहान कशी? .... 🤔🤔... शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे बरेचं अनुभव आले. आणि त्यात हा मुद्दा नेहमीच समोर आला, की ५-६ वर्षाच्या मुलांना बऱ्याच वेळेला तू मोठी झालीस किव्हां तू मोठा झालास असं म्हटलं जातं. आता तू असा नाही वागायचं, असं हि म्हटलं जातं. पण खरंच ती एवढी मोठी असतात का की कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं ते त्यांना कळेल? किंबहुना तू आता ताई झालीस किव्हां तू दादा झालायस म्हणून तू मोठा झालास की व्याख्या कितपत बरोबर आहे? आपल्याकडे (मोठी झालेली लहान मुले ) जर मोठ्यांसारख बोलायला लागली तर लगेच त्यांना सांगितलं जातं की बाबारे तू लहान आहेस, लहनांसारख वाग. आम्ही तुझ्या वयाचे असताना आगाऊ पणे बोलत न्हवतो. म्हणजे आपणच जर का क्लिअर नसू आपल्या (मोठ्या झालेल्या लहान मुले ) ह्यांच्या व्याखेवरती तर त्यांच्याकडून समजूतदार पणाची अपेक्षा करणं किती चुकीचे आहे आणि किती बरोबर आहे? (हे आपणच ठरवायला हवे नाही का? )  जेव्हां इतकं confusion असतं

# शिवम

#शिवम .... हे नक्की आहे तरी काय? 🤔? तर ही मनात आलेली एक संकल्पना आहे.  आणि शिवम हेचं नाव का? शिव म्हटलं की आपल्याला नवरस आठवतात. त्याची सगळी रूप आपल्या समोर येतात. आणि नुसती समोर येतं नाहीत तर आपण तसे व्यक्त पण होत असतो.  म्हणजे सोमवार ते रविवार आपण ९ पैकी ८ रस नक्कीचं बऱ्याच वेळेला वापरतो. म्हणजे अगदी खुद्द शंकराने वापरले नसतील तेवढ्या वेळेला आपण वापरतो.😂😂😂..  पण हास्य हा एकच रस असा आहे जो आपण मोजून मापून वापरतो.  लहान असताना आपण कुठल्याही फालतू जोक वर हसायचो, अगदी कावळा चिमणीच्या पण.🤦🤦🤣🤣🤦‍♀️ पण आता जोक पण कसे matured हवेत. नाहीतर तुम्ही जोक बनता🤔🤔🤭😂😂😂. आणि मग नंतर एक डायलॉग मारायचा (आधी कसे होतो ना आपण) आणि मग परत हसायचं. आणि मग शेवटचा डायलॉग (बरं वाटलं यार बऱ्याच दिवसांनी बोलून).🤗🤗..  म्हणजे खरं तर आपण रोजचं जर आधी सारख्या गप्पा मारल्या(त्या कोणाशी पण असुदेत) तर शंकराला पण हास्य रस निर्माण केल्याचं आनंद मिळेल नाही का?  * I was inspired by my student Shivaum. Who is a bundle of joy. And who showed me a different angle to Navrasa.... Thank u Shivam....

नवीन वर्ष नवीन रेसोल्युशन

नवीन वर्ष म्हटलं की नवीन रेसोल्युशन येतं. आणि हो, जसं नवीन नवरी दिसली की काय मग गोड बातमी कधी देणारं असं विचारलं जातं, अगदी तसंच काय मग ह्या वर्षी काय रेसोल्युशन आहे असं विचारलं जातं.  म्हणजे खर तर जे विचारतात त्यांना काहीच करायचं नसतं पण नवीन वर्षात काय विचारायचं म्हणून सहजच विचारलं. असो, तर प्रत्येक वेळेला नवीनच रेसोल्युशन करायला पाहिजे असं नाही हा. जसा ओल्ड फॅशन चा काळ परत आलंय तसंच आपण पण आपली एखादी अपूर्ण राहिलेली गोष्ट पूर्ण करण्याचं रेसोल्युशन करू शकतो. मग ती कुठली पण असेल. अगदी तुमच्या जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचं रेसोल्युशन पण करू शकता. कारण रेसोल्युशन असं असलं पाहिजे की जे करतांना आपल्याला टेन्शन नाही आलं पाहिजे. आणि जुन्या मित्र मैत्रिणींना भेटणं म्हणजे रोजचं नवीन आयुष्य जगण्या सारखं आहे नाही का.....  आणि हे पूर्ण करायला जास्त कष्ट पण लागत नाही. तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि हो नवीन रेसोल्युशन च्या हार्दिक शुभेच्छा...😊😊😊😊