झोपेतली लंगडी

पाळणाघर, काही जणांसाठी आवडीची जागा असते तर काही जणांसाठी पर्याय नाही म्हणून राहायची जागा. हल्लीच्या काळात त्याला Daycare अस म्हणतात. 
मी सुध्दा लहान असताना पाळणाघरात जायचे. खूप मजा असायची. आम्ही जवळपास १२-१३ मुलं होतो पाळणाघरात. बर आमचं पाळणाघर एका सोसायटी मध्ये असल्याने सोसायटी मधली मुलं आणि आम्ही अशी मोठी team असायची खेळायला. जरी सुट्टी असली तरी आई बाबांना सुट्टी नाही म्हणून आम्ही मात्र पाळणाघरात असायचो. मगं काय, संपूर्ण दिवस खेळ खेळायचे आणि नुसती धमाल करायची. सगळ्या मुलांमध्ये मी लहान होते. मला कोणी नाव विचारलं की मी नाही सांगायचे. कारण त्याच वेळी मला कळलं होतं की नावात काय आहे.😂😂..खरी गोष्ट ही होती की माझं आडनाव पटवर्धन आणि त्या वेळी मला र्ध म्हणता यायचा नाही. पण सांगणार कोणाला, तरी मी धीर करून सांगायला लागले की माझ नाव नेहा वसंत पटकनधर.. 😂🤦‍♀️🙈😂..
असा हा एक आणि अनेक किस्से पाळणाघरात घडले. त्यातला नेहमी लक्षात राहणारा किस्सा म्हणजे झोपेतली लंगडी..

मी साधारण पाचवीत किंव्हा सहावीत असेन. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पाळणाघरात सकाळपासून असायचो. आम्ही सगळ्यांनी लंगडी धावकी खेळायचे ठरवले. क्रिकेट मध्ये जशी टेस्ट मॅच ५-६ दिवस चालते अगदी मी सुध्दा कुठलाही खेळ असो माझ्यावर राज्य (डॅन) आले की मी १०-१२ दिवस चालवायचे. 😂😆😂. तशी मी दानविर आहे पण राज्य  (डॅन) देण्याबाबतीत नाही.. 🙄🤣🙄.
असो, तर लंगडी खेळत असताना नेमकी जेवायची वेळ झाली म्हणून आम्ही सगळे घरी गेलो. छान पैकी जेवलो, गप्पा मारल्या आणि संध्याकाळी उरलेला खेळ खेळायचा असं ठरवून आम्ही दुपारी झोपून गेलो. 
खेळ विभागात जेवढेकाही पुरस्कार आहेत तेवढे मला त्या दिवशी मिळाले असते. अर्जुन पुरस्कार तर नक्कीच मिळाला असता. कारण झाल काय की आम्ही सगळे गालिचा टाकून त्यावर एका रांगेत झोपलेलो. मी एकदम कडेला झोपलेले. सगळी कडे शांतता होती. मी झोपेत उठले, ३ वेळा जमिनीला नमस्कार केला ( मी किती एकनिष्ठ होते ) ३वेळा म्हणजे ३ वेळेलाच जास्त नाही आणि कमी पण नाही. आणि माझ्या बाजूला झोपलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींच्या अंगावरून लंगडी घालत दुसऱ्या बाजूला गेले आणि झोपून गेले.😂😆😂😆🙈🤦‍♀️🙈.. हे सगळं झोपेतच बरं का. सगळ्यांना जागं आली, मला उठवायचा प्रयत्न पण केला ,मात्र मी गाढ झोपेत होते. सगळे जोरजोरात हसत होते साधारण ४वाजता मला त्यांच्या हसण्याने जागं आली. मला मात्र कळेना माझ्याकडे बघून एवढे का हसायला येतात. नंतर जेंव्हा मला कळलं की मी झोपेत काय केलं तेंव्हा मात्र मला ही हसू आवरत नव्हतं. त्या दिवसापासून जेवण्याच्या वेळेच्या आधी जर आम्ही खेळत असु तर माझ्यावर राज्य (डॅन) आल तरी कोणी द्यायची हिम्मत केली नाही...😆😆😂🙄🙄

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials