तूच माझी सारथी....

सारथी म्हणजे मार्गदर्शक... सारथी म्हणजे योग्य दिशा दाखवणारा..... सारथी म्हणेच सूत्रधार.... 
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते जी कळत नकळत पणे आपला/ आपली सारथी असतो/ असते... आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असते. मगं ते मार्गदर्शन आयुष्यातलं असेल किंव्हा दिशा म्हणजे रस्ता किंव्हा पत्ता  दाखवण्याचे असेल. आपण त्याच्यावर इतके अवलंबून होतो की जो पर्यंत त्यांच्याकडून आपल्याला संकेत येत नाही, तो पर्यंत आपण पुढचं पाऊल उचलत नाही. 

अश्याच दोन मैत्रीणी आहेत माझ्या आयुष्यात ज्या मला खरंच आयुष्यात छान मार्गदर्शन करतात. पण दिशा(पत्ता/रस्ते) दाखवताना त्यातली एक खरंच सारथी आहे आणि दुसरी जिला वाटत की ती सारथी आहे आणि योग्य दिशा (पत्ता) दाखवू शकते. म्हणजे जिला स्वतः ला रस्ते पाठ होतं नाहीत म्हणून आम्ही आणायला आणि सोडायला जातो, ति कोणालातरी पत्ता सांगते. बरं आपण सांगितलेला पत्ता बरोबर 
आहे की नाही ते तिला माहित नसतं. 
म्हणजे झाल काय की आम्ही तिघी जणी आणि तिची बहीण आमच्या गल्ल्यांमध्ये फिरतं होतो. त्या वेळेला एक गृहस्थ आमच्या समोर आले आणि त्यांनी पत्ता विचारला. एवढ्या आम्ही तिघी जणी असताना त्यांनी तिलाच (चौथिलाच) पत्ता विचारला. आम्ही तिला इशारा करून सांगितलं की आम्ही सांगतो 🙄🙄 पण गूगल कंपनीमध्ये आणि त्यात  गूगल मॅप departmentla जणू काही २० वर्षांचा अनुभव असल्यासारखे expressions देत तिने पत्ता सांगायला सुरावत केली. तर तिने सुरवात अशी केली की,🥺🥺

तुम्ही इथून सरळ जा, आणि पहिला लेफ्ट घ्या. मगं परत सरळ जा आणि परत लेफ्ट घ्या. आणि असं करत तिने पूर्ण पत्ता सांगितला. बरं ते गृहस्थ निघाल्यावर आम्ही तिघी द्विधा मनस्थितीत होतो. कारण आम्हालाच तिने सांगितलेला पत्ता कळला नाही तर त्यांना काय कळला असेल. तिला आम्ही विचारणार तेवढ्यात ते गृहस्थ परत फिरून आमच्या समोर आले आणि तिला म्हणाले की मी तुम्हीं सांगितलेल्या रस्त्यावरून फिरून आलो पण पत्ता काही मिळाला नाही, उलट मी गोल फिरून तुमच्याच समोर आलो. आणि मग तिने जे उत्तर दिलं ते ऐकून तिच्या लग्नात आम्ही होकायंत्र द्यायचं नक्की केलं 😂😂.  अहो तिने उत्तरच असं दिलं. 

तर ती म्हणाली की अहो माझा लेफ्ट म्हणजे तुमचा right नाही का? 😂😂🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
४०० वोल्टचा शॉक लागल्यासारखा तो गृहस्थ घाबरला आणि म्हणाला की ताई तुम्ही आयुष्यात काहीही करा पण कोणाला पत्ता सांगू नका...😂🙏😂😂

 तर अशी ही आमची मैत्रिण जी  खऱ्या आयुष्यात नक्कीच माझी मार्गदर्शक आहे पण पत्ता सांगण्यात नाही हा!😂😂🙄

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials