Posts

Showing posts from 2022

होळी रे होळी

आज खूप दिवसांनी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. लिहिण्यासाठी विषय काय निवडायचा हा मोठा प्रश्न असायचा.  खरंय तुमचं विषय सहज मिळाला पाहिजे आणि आज तेच झालं.... अहो, सहज विषय मिळून गेला..   आज सकाळपासून माझ्या लहानपणीच्या मैत्रिणींचे व्हॉट्सॲप वर मेसेज, miss those days, काय मज्जा केलीय ना आपण, रंग लावण्यापासून अगदी समोरच्या बिल्डिंग मधल्या काकूंच्या आमटीत आपण टाकलेला फुगा कसा पडला आणि त्याचा बदला त्या बिल्डिंग मधल्या मुलांनी कसा घेतला.. इथ पर्यंत सगळं आठवलं..  आमची सुरवात होळी दहनाच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता बाहेरच्या नळावर पाण्याचे फुगे भरण्यापासून सुरू व्हायची. मग रात्री सोसायटी मधील होळी ची भेळ खाताना दुसऱ्यादिवशीच नियोजनकरून संपायची.... मुंबईमध्ये धुलीवंदन आणि रंगपंचमी एकच, त्यामुळे सकाळी ९ वाजता रंग लावायला सुरवात करायचो ते थेट दुपारी २ वाजता समोसे खाऊन संपवायचो... सकाळी आपल्या सोसायटीमध्ये रंग खेळून आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोसायटी मध्ये खेळायला जायचो... रंगलेल्या हाताने गरम गरम समोसे खायची मजा काही वेगळीच होती... त्याचा फायदा कोरोना मध्ये झाला... एवढी प्रतिकारशक्ती वाढली म्हणून सा