मुलं म्हणजे देवाघरची फुलं

मुलं म्हणजे देवाघरची फुलं 

मुलं म्हणजे देवाघरची फुलं हि म्हणं आपण खूप पूर्वी पासून ऐकत आलोय. बऱ्याच पालकांचं असं  म्हणणं असतं कि , मुलं लहान असताना हि म्हणं योग्य आहे पण मोठी झाल्यावर अजिबात नाही. पूर्वी हि म्हणं साधारण मुलं १०-१२ वर्षांची होई पर्यंत स्वीकारली जायची. पण हल्लीच्या काळात मुलं ३-४ वर्षाचं झालं कि, हि म्हणं स्वीकारणं कठीण होतं . जेवढ्या प्रमाणात आपण नवीन टेकनॉलॉजिला सहजरित्या स्वीकारतो तेवढ्याच सहजरित्या मुलानंमध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना पण स्वीकारता आलं पाहिजे. बरं साधारण पणे १० वर्षांच्या पुढच्या मुलांना त्यांच्या मध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना स्वीकारणं थोडं सोप्पं होतं. कारण त्या मुलांना कमीतकमी एवढं तरी कळतं कि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होतं आहेत. मात्र ०-८/९ ह्या वयोगटातली जी मुलं असतात त्यांना स्वतःला त्यांच्यात बदल होत आहे हे समजायला वेळ लागतो. विशेष म्हणजे ०-५ ह्या वयोगटात मुलं पूर्णपणे आई बाबा वर अवलंबून असतात. 

बरं  हा बदल नुसता मुलांमध्ये दिसतो का तर नाही. जेंव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा आपला सुद्धा आई बाबा म्हणून जन्म होतो. खरतर हा बदल एक परिवार म्हणून तुम्हां तिघांमध्ये / चौघांमध्ये होतं असतो. जसं मुलांना हा बदल स्वीकारणं कठीण असतं अगदी तसंच आई बाबा ला सुद्धा हे स्वीकारणं कठीण असतं आणि आपली चिडचिड होते. मात्र आपण रोजच्या दिनक्रमामध्ये इतके गोंधळलेले असतो कि आपण त्याचा राग मुलांवरती काढतो. उदाहरण दयायच झालं तर ऑफिस मध्ये काही समस्या असतील आणि तेच डोक्यात ठेवून आपण घरी आलो आणि नेमक तेंव्हाच जर मुलांनी काही हट्ट केला किंव्हा थोडी मस्ती केली तर आपण मुलांना कारणीभूत धरतो आपला दिवस खराब केल्या बद्दल . अहो ह्यात आपली तशी चूक नाही. एकदा कळलं ना कि आपल्या चिडचिडेपणाचं कारण काय कि खूप सहज होईल होणारे बदल स्वीकारायला. 

जेंव्हा एखादी मुलगी गरोदर असते आणि तेव्हा जे तिच्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत असतात  त्याचा (चांगला/वाईट) परिणाम हा त्या पोटातल्या बाळावरती पण होतो. जरी आपल्याला त्यावेळी कळलं नाही तरी आपण ते आता सुधारू शकतो आणि ते सुधारण्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचारचं 
(positive thoughts ) मदत करणार आहेत. एखादी मुलगी गरोदर असताना जर तिच्या अवतीभोवती जर काही दुःखद घटना घडली तर भावनिक 
( emotionally ) दृष्ट्या तो परिणाम आई वर तर होतोच पण त्या बाळावर पण होतं असतो. कारण त्या बाळांना सगळं समजतं असतं. मात्र एक परिवार (टीम) म्हणून जर आई बाबा आणि मुलं  ह्यांनी ठरवलं तर आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही बदलाला सहजरित्या स्वीकारता येईल. 

ह्या सगळ्यावर मात करताना मात्र आपल्याला हा बदल घडवून आणायचं ह्या विचाराचा आधी स्वीकार सहजरित्या झाला पाहिजे. आणि जर तस ना तर तुमच्या घरातील आनंदाची बाग कधीच कोमेजून जाणार नाही... 

आणि ...... हि मुलं कायमच देवाघरच्या फुलांप्रमाणे प्रेमाचा सुवास आपल्या आयुष्यात बहरतील ...... 🌺🌻🌼🌸🌹

# NehaP 


* कुणालाही संबोधून म्हणायचं नाही.

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials