Posts

चाळिशीतला - दुसरा अंक...

चाळीशीतला - दुसरा अंक...  सध्या मराठी नाटकांना खूप मोठ्या संख्येने गर्दी होतं आहे. बरं आजकाल नाटकं सुद्धा दोन अंकी असतात. फार क्वचित तीन अंकी नाटक होतं असेल. हाऊसफुल चा बोर्ड बऱ्याच नाट्यगृहात पाहायला मिळतो कारण हल्लीच्या नाटकांचे विषय हे प्रामुख्याने सध्याच्या काळाला अनुसरून असतात.  काही महिन्यांपूर्वी अतुल सुभाष ह्यांच्या आत्महत्येने पूर्ण देशाला हलवून सोडलं होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला सुद्धा १९७०-१९८८ मधले कितीतरी जणं आहेत जे स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही जणं यशस्वी झाली आहेत, मग ते त्यांच्या करीअर मध्ये असेल किंवा खाजगी आयुष्यात असेल पण असे बरेच जण आहेत ज्यांना अजूनही झुंज द्यावी लागत आहे. स्वतः पेक्षा कमी वयाच्या मुलांना आपला बॉस म्हणून बघणं आणि राजकारण सहन करणे तेही त्यांच्यापेक्षा कमी पगारात, हे कठीण आहे.  GenZ ना मिळणारा पगार आणि त्या तुलनेत ह्यांना मिळणारा पगार ह्यामध्ये खूप तफावत आढळते.  दुर्दैवाची गोष्ट म्हणजे १९७०-१९८८ मधल्या मुलांना नेहमीच तुलनेला सामोरं जावं लागतं. ओळखीतल्या लोकांना हे बोलणं खूप सोपं आहे, की चाळ...

गुरु - सगुण रुपात

गुरु - सगुण रुपात की निर्गुण रुपात?  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला उणीव भासते ती एका अश्या व्यक्तीची जी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत धीर देईल. एक अशी व्यक्ती जिच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि निश्चिंत होतो.. एक अशी व्यक्ती जी आपल्याला मार्गदर्शन करेल... बरं ही उणीव अगदी लहान असल्यापासून आपल्याला भासते. उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी आपल्याला आई बाबांच्या ओरडण्यापासून वाचविणारे काका काकू असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा ताई दादा असेल. आपल्याला ती व्यक्ती जणू काही एक आधारस्तंभ वाटायला लागतो.  शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी आपले आधारस्तंभ होतात. तसं बघितलं तर प्रत्येक टप्प्यात आपल्याला आधाराची गरज असते. मगं अश्या एक किंवा अनेक व्यक्ती असतील. जसजसं आपण मोठे होतं जातो तसतसं आपण अनुभव घेत, व्यक्तींचे अनुभवांच्या अनुषंगाने द्विभाजन करत जातो.   मनुष्याचे संपूर्ण आयुष्य नेमका खरा गुरू कोण हे ओळखण्यात जातो. गुरू ची परिभाषा, त्यांचं वर्णन म्हणजे केशरी रंगाचा पोशाख, रुद्राक्षाच्या माळा, मस्तकी भस्म किंवा अंगारा आणि नेहमीच सकारात्मकतेने मार्गदर्शन करणारे अशी व्य...

सेम पेज

" हम तुम " हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. कारण त्यामधला एक लोकप्रिय संवाद की, "हर किसी की कोई ना कोई कहानी होती हैं" | हा सगळ्यात जास्त मला मनाला आवडला..काही नाती आयुष्यभरासाठी टिकतात तर काही एका दिवसात संपतात...  ह्याचाच अर्थ त्या नात्यांमधल पुस्तकं हे छोटं किंवा मोठं असू शकतं. " वाचाल तर वाचाल " ही म्हण आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत आलोय. मगं ते वाचन पुस्तकांचं असेल किंवा आयुष्यात येणाऱ्या नात्यांचं. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सेम पेजवर असण. कारण जसं आपण म्हणतो की पुस्तकांचं वाचन करताना तुम्ही जर ते टप्प्यात केलं तर दुसऱ्यादिवशी तुम्हाला संदर्भ लागला पाहिजे. अगदी तसचं नात्यात पण आपण काल ज्या पानावर होतो तिथूनच पुढे दोघांनी सेम पेजवर असण महत्वाचं आहे. कितीही झाल तरी पुस्तकात आपण एखादी निर्जीव वस्तू खूण म्हणून ठेवु शकतो, जी आपल्याला दुसऱ्या दिवशी काल शेवट कुठे केला ते दाखवते. पण नात्यांचं तसं नाहीये कारण काल शेवट कुठे केला हे आपलच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तिथून पुढे सुरवात करताना त्या दोन व्यक्ती सेम पेजवर असण  गरजेचं आहे.  मगं ते नातं नवरा बायकोच अस...

अ. वि. उ. वि.

 अ. वि. उ. वि  कितीही सरळ जायचं ठरवलं तरी "विचार" ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला द्विधा मनस्थितीत टाकते. सरळ जाणाऱ्याला वाकडी तिकडी वाट घ्यायला भाग पाडते.  "विचार" येताना एकटेच येतात. आपण त्याला विशेषण देतो, "अति विचार आणि"उगाच" विचार आणि सगळं बदलून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात की एक छोटीशी गोष्ट असते पण आपण त्याला खूप मोठ् रूप देतो.  सगळेच विचार हे शुल्लक नसतात. काही विचार इतिहास घडवून गेले आहेत.  विचारांवर विजय मिळवणे हे प्रत्येकाला शक्य असते पण तो विजय मिळवताना वेळ किती लागेल हे स्वतः ला निश्चित करावे लागतो. लहान मुलं असुदे किंवा मोठी व्यक्ती असुदे, नेहमीच आपण ऐकत आलोय की उगाच विचार करत बसू नकोस. अति विचार करत बसू नकोस. बऱ्याच वेळेला आपली तंद्री लागलेली असते आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्याला विचलित करते.   असं म्हणतात की माणसाचा मेंदू एका मिनिटात ३८-४५ विचार निर्माण करते म्हणजे दिवसभरात सुमारे ५००००-७०००० विचार. ( Google वर मिळालेला नंबर ) एवढं नक्की की आकडा खूप मोठा आहे. पण सगळ्याच विचारांकडे आपण लक्ष देत नाही. कधीकधी विचारांमध्य...

अशी आई नको ग बाई !!

अशी आई नको ग बाई !! "आई" हा एक शब्द खूप काही सांगून जातो. बाळाला जन्म देण्यासाठी सोसलेल्या कळांपासून ते मुलाला / मुलीला स्वतःच्या पायावर उभे करे पर्यंत घेतलेले कष्ट, आनंद,त्याग सगळंच....  लहानपणी आईशिवाय पान हलत नाही.. मुलांसाठी चांगलं जेवण बनवणं, खेळवण, चांगले संस्कार करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे.. जसं जसं मुलं मोठी होतं जातात तसं तसं शाळेचा अभ्यास, पालकसभेला हाजिर राहणं.. आणि एवढं सगळं करून सुध्दा शाळेतून येणाऱ्या सूचना की मुलांकडे लक्ष द्या आणि बरच काही... अश्या अनेक गोष्टी आई सांभाळत असते.  एकीकडे मुलांना शिस्त लावताना स्वतः वाईटपणा घेणं आणि दुसरीकडे घरातल्यांचे विचार मुलांना पटवून द्यायची तडजोड करणं.. घरात कोणाचीही भांडण झाली , अबोला धरला तर "आई" त्यांच्यातल्या संभाषणाचा दुवा असते.  मुलं मोठी होत असताना ती तीच जगणं विसरून जाते... सगळं असून सुध्दा काहीच नसल्याच्या भावना तिला येतात.. पिढ्यांमधलं अंतर आणि विचार खूप जवळून अनुभवणारी, पण काही ठिकाणी हतबल असणारी व्यक्ती म्हणजे "आई".  एक दिवस असा येतो, की जेव्हा आजूबाजूची लोकं म्हणायला लागतात," सोळा...

टाईम प्लीज

टाईम प्लीज... खेळ असुदे किंवा भांडण, वाद विवाद आपला मुद्दा मांडण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे "टाईम प्लीज" म्हणायचं.. नुसतं म्हणायचं नाही तर हाताची मूठ करून ती आपल्या ओठांना लावायची आणि मगच म्हणायचं. इतका दृढ विश्वास होता त्या एका शब्दावर की जणू खरंच वाटायचं साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्यासाठी तो क्षण धरून ठेवतोय...  लहानपणीचं "टाईम प्लीज" आपल्या आयुष्यात इतक्या आठवणी देऊन जातात, की कधीकधी वाटतं मोठं झाल्यावर हा उपाय रोजच्या आयुष्यात इतक्या सहज वापरायला मिळाला तर जगणं किती सोप्पं होईल.  खरंच असा संवाद साधता आला तर..... भक्त - आहे का वेळ? जरा बोलायचं..  देव - वेळच वेळ आहे ..ये भेटायला....  भक्त -  ( मित्र मैत्रिणींनबरोबर गप्पा चालू होत्या.) तेवढ्यात देवाचं बोलावणं आलं आणि पटकन मुखातून आलं, ए " टाईम प्लीज" हा,.आलोच जरा....  असं म्हणून देवासमोर चर्चा सुरू होणार तेवढ्यात,  देवं म्हणाले कि तू जर सगळ्यांच्या तक्रार करणार असशील तर मी त्या रोज ऐकतो... परत तेच नको..  भक्त -  अरे यार, ह्याला काय अर्थ आहे..म्हणजे खाली कोणाशी बोलू शकत नाही... आणि एवढं " टाईम ...

मध्यांतर

मध्यांतर....  आज खूप दिवसांनी नाटक बघण्याचा योग आला. नाटक म्हटलं की त्यातली पात्र, त्यांचे संवाद आणि कथा ही महत्वाची असतात. कलाकार, जे त्या पात्रांना जिवंत करतात, ते त्या नाटकाची उंची एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात.  पहिली घंटा वाजली.... नाट्यगृहात एक वेगळंच वातावरण होतं. सगळे जण आपापल्या जागेवर एका आशेने बसलेले, काही जण त्यांच्यात्यांचात संवाद साधत होते तर काही जण त्यांच्या लहान मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स असं सगळं देऊन शांत करत होते. काही आजी आजोबा त्या इवल्याश्या प्रकाशात मोबाईल चा आवाज बंद करून द्या हो असं शेजारील व्यक्तींना सांगत होते. एकंदरीत तिसरी घंटा वाजण्याच्या आधीची गडबड , उत्साह, उत्सुकता असं वातावरण होतं आणि तेवढ्यात, कलाकारांना बघण्याची संधी सोड्याची नाही म्हणून साधारण २-३ इंच असलेल्या मानेला अजून किती उंच नेऊ शकतो असा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती त्यांचा प्रयत्न करत होत्या. अखेर नाटक सुरू झालं....  वेळ आली ती मध्यांतराची... नाटक, चित्रपट बघण्यामागच एक कारण मध्यंतरात तिथे जाऊन समोसा, वडापाव आणि पॉपकॉर्न खाणं हे पण असतंच. सगळे जण पटापट बाहेर कॅन्टीन जवळ गेले....

मोजमाप आधुनिक विचारांचं

मोजमाप आधुनिक विचारांचं....  आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आणि सगळ्या आकड्यांना किंमत आणली, त्या किंमतीमुळे माणसांना मोजमाप करणं सोप झालं. आयुष्य जगताना मोजमाप हि सगळीकडे करावी लागते. अगदी जेवण बनवताना मीठ घालण्यापासून ते ताटात किती प्रमाणात भाजी असावी , सॅलड किती असावं इथं पर्यंत, घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर डाएट करायचं म्हणजे तो ड्रेस / लेहंगा आपल्याला सुंदर दिसेल हे पण मोजमाप चर्चेत आहे. तसंच आपल्या घरातील कुटुंबियांना काय सांगायचं किती सांगायचं ह्याच पण मोजमाप होतंच.   बरं त्या मोजमापाची सवय इतकी झालीये कि माणसांच्या वागणुकीवरून, कपड्यांवरून ठरवतात कि लोकं आधुनिक आहेत कि जुन्या विचारांची.. कपड्यांवरून , ड्रिंक्स केला म्हणून समोरचा व्यक्ती आधुनिक आहे हि व्याख्याच चुकीची आहे. ड्रिंक्स घेणं, कुठले ब्रँडेड कपडे घालायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे आणि हे प्रमाण नाही माणसंच मोजमाप करायचं.  पालक जेव्हा मुलांना शिकवणी ला पाठवतात, शाळेत पाठवतात तेव्हा मार्क्स वरून मोजमाप केलं जातं. बऱ्याचदा मुलांना concept किती समजली ते मोजमाप गरजेचं वाटत नाही. कारण प्रमाण मार्क्स दा...

The Millennials

पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत म्हणजे पुढच्या नवीन पिढीला नावं ठेवणं होय. मग ती नावं उद्धार करण्यासाठी असूदे किंवा कौतुक करण्यासाठी असुदे. हल्ली कानावर पडणाऱ्या पिढ्यांची नावं म्हणजे GenZ, Gen Alpha आणि The Millennials.. एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा पिढ्यांना नावं ठेवणं सोप्पं आहे.  बरं ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी Millennials म्हणजे १९८१-१९९६ ह्या वर्षात जन्मलेली मुले. GenZ म्हणजे १९९७-२०१२ ह्या वर्षात जन्मलेली मुले आणि Gen Alpha म्हणजे २०१३-२०२५ ह्या वर्षांत जन्मलेली मुले. असा हा सध्या विषय (Trend) चालू आहे.   प्रत्येक पिढी ही नवीन संस्कार आणि जीवनमूल्ये निर्माण करत असते जी त्या वयाला आणि त्या काळाला अनुरूप असतात. पण सध्या बहुचर्चित असलेली पिढी ही Millennials ची आहे. कारण आमच्या डोक्यावर एक हात जुनं ते सोनं ह्यांचा आहे तर आमच्या हातात हात please stop being an old schooler ह्यांचा आहे.. आणि ह्या दोन्ही पिढ्यांमध्ये जवळपास ६० - ७० वर्षांच अंतर आहे.    बरं, millennials ना त्यांची मत मांडणं कधी कधी इतकं कठीण होतं कारण तो समतोल साधताना त्यांच्यावर बाकीच्या दोन...

ROI

माणूस शेवटपर्यंत हा विद्यार्थीच असतो हे वाक्य रोज अनुभवायला मिळतं. खरंच सोमवारचा दिवस काही तसाच होता. मी आणि माझे सहकर्माचारी ROI म्हणजेच returns on investment म्हणजेच गुंतवणुकीवर परतावा ह्या बद्दल बोलत होतो, की कंपनी नवीन लोकांना नियुक्त करताना त्या व्यक्तीचा ROI विचारात घेऊन मग निर्णय घेते.  खरंतर हा विषय दुपारच्या जेवणाच्या टेबलवरच संपला होता. पण माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला,की return on investment चा विचार आपण आपल्या खाजगी आयुष्यात कधीच करत नाही. पूर्वी म्हण ऐकली आहे जसं पेरता तसं उगवतं पण कदाचित मनुष्याचा अहंकार कधीकधी इतका वाढतो की आपण नक्की काय पेरातोय ह्याकडे दुर्लक्ष होतं.  आपण ऐकतो सकारात्मक विचार करा, ध्यान करा, अहंकार बाजूला ठेवा, ऐकण सोपं आहे पण अमलात आणताना रोज कष्ट घ्यावे लागतात, कारण investment नक्की कश्यात करायची आणि किती करायची ह्याचं गणितंच उलगडत नाही.  काही नात्यांनमध्ये आपण कितीही invest केलं तरी त्याचे returns तेवढे मिळतं नाहीत कारण ते नात तेवढच असतं पण काही नाती आपोआप इतके सुंदर returns देतात की आपल्याला ५% investment पण १००टक्के गोड फळं देऊन ...

होळी रे होळी

आज खूप दिवसांनी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. लिहिण्यासाठी विषय काय निवडायचा हा मोठा प्रश्न असायचा.  खरंय तुमचं विषय सहज मिळाला पाहिजे आणि आज तेच झालं.... अहो, सहज विषय मिळून गेला..   आज सकाळपासून माझ्या लहानपणीच्या मैत्रिणींचे व्हॉट्सॲप वर मेसेज, miss those days, काय मज्जा केलीय ना आपण, रंग लावण्यापासून अगदी समोरच्या बिल्डिंग मधल्या काकूंच्या आमटीत आपण टाकलेला फुगा कसा पडला आणि त्याचा बदला त्या बिल्डिंग मधल्या मुलांनी कसा घेतला.. इथ पर्यंत सगळं आठवलं..  आमची सुरवात होळी दहनाच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता बाहेरच्या नळावर पाण्याचे फुगे भरण्यापासून सुरू व्हायची. मग रात्री सोसायटी मधील होळी ची भेळ खाताना दुसऱ्यादिवशीच नियोजनकरून संपायची.... मुंबईमध्ये धुलीवंदन आणि रंगपंचमी एकच, त्यामुळे सकाळी ९ वाजता रंग लावायला सुरवात करायचो ते थेट दुपारी २ वाजता समोसे खाऊन संपवायचो... सकाळी आपल्या सोसायटीमध्ये रंग खेळून आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोसायटी मध्ये खेळायला जायचो... रंगलेल्या हाताने गरम गरम समोसे खायची मजा काही वेगळीच होती... त्याचा फायदा कोरोना मध्ये झाला... एवढी प्रतिकारशक...

करिअर घडवताना

Image
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. प्रयत्नांती परमेश्वर... अश्या अनेक म्हणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्येक म्हणीचा मतितार्थ हाच की, प्रयत्न आणि कष्ट केले तरच यश प्राप्ती होते.  एक सामान्य व्यक्ती प्रचंड मेहनत घेत असते, पण तरीही त्या व्यक्तीला पाहिजे तसं मेहनतीचं फळं मिळत नाही आणि मग आपण ताण, नैराश्य, औदासिन्य ह्याला सामोरे जातो. कधीकधी नशिबाला दोष देतो.  खूप पैसा असला तरीही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की, चार पैसे कमी चालतील पण ही नोकरी नको. मस्करी मध्ये आपण एवढंही म्हणतो की वडापाव विकून पैसे कमवू पण नोकरी, त्याची वेळ, त्यातलं राजकारण नको...पण तेच काही लोकांना आपण त्यांच्या करिअर मध्ये खूप समाधानी बघतो.  नक्की असं काय आहे की ते खुश आहेत पण आपण नाही?  खूप पैसा आला म्हणजे करिअर घडलं असं होतं नाही.  सगळ्यात मह्त्वाचं आहे की ह्या करिअर मधल्या नैराश्याच्या मुळाशी जाणं. जसं भारतीय आयुर्वेदात आपल्या ऋषीमुनींनी सगळ्या त्रासाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी औषध शोधली अगदी तसचं आपल्याला पण करिअर मधल्या नैराश्याला मुळापासून उखडून टाकायचं आहे.  करिअर घडवत...

शाळेत बाई आणि घरात आई

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे." ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? "  अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात..  आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो...   " नावात काय आहे "  असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी  "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे... २०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क ...

गोरी गोरी पान फुलासारखी छान......

Image
" काय झालं का गाणं म्हणून?"  अहो मी तुम्हालाच विचारत आहे. शिर्षकच असं आहे की गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.. हे गाणं आपोआप आपण गुणगुणारच.  आपल्या घरातली अशी एक व्यक्ती जिच्या बद्दल आपल्याला लहानपणापासून ओढ निर्माण होते. मगं ती सख्खी वहिनी असेल किंवा चुलत मामे वहिनी , आपल्याला तिची चाहूल हवीहवीशी असते. कारण कुठेतरी आपण तिला मनातूनच बहीण मानलेल असतं.  आपल्याकडे लग्नं ठरल्या दिवसापासून मुलींकडून अपेक्षांना सुरवात होते. ती कुणाचीतरी मामी होते, कुणाचीतरी काकू होते, कुणाचीतरी वहिनी, जाऊ होते.. अशी अनेक नाती तिला सांभाळायची असतात. खूप पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. बरं बाकीची नाती निभावताना तिला तिचं लग्नाआधीच्या आयुष्याची उणीव भासते.. तिला परत ते आयुष्य जगावस वाटतं.. कारण लग्नाआधी तिच्या आयुष्यात एक मोकळीक असते.  पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर नणंद भावजया (वहिनी) ह्यांच्यावर भरपूर किस्से लिहिले जातात. आमची पिढी तर सरळ तिला तिच्या नावाने हाक मारते. मला वाटतं आपण आपल्या घरातल्या सगळ्याच व्यक्तींना बरोबर ओळखत असतो. पण वहिनीने जर का आपल्या घरातल्यांवि...

हक्क - महत्वाचा की नाही?🤔🤔

Image
हक्क ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच बजावयची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत पहिल्यापासूनच हक्क ह्या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. सगळ्यात जास्त महत्व तर खुर्चीवरच्या हक्काला आहे. मग ती खुर्ची राजकारणातली असुदे किंवा बस आणि ट्रेन मधली, ती ज्याला मिळाली ते नशीबवान असतात. बरं त्याच्यामुळे आजूबाजूच्या नात्यांवर काय परिणाम होतील त्याची शाश्वती नाही..  मात्र तोच हक्क तुम्ही एकमेकांवर बजावला तर त्याचे परिणाम खूपच वेगळे असू शकतात. प्रत्येक गोष्टीला जश्या सीमा असतात अगदी तश्याच प्रत्येक नात्यात सुध्दा असतात. मग ते नात बहीण भावांच असेल, मित्र मैत्रिणीच असेल, आई मुलांमधले असेल, बाबा - मुलांमधले असेल, सासू- जावई मधले असेल, सासू - सूनेतल असेल.   आपल्याला वाटतं की असं काही नसतं आणि घरातल्यांशी वागताना कुठल्याच सीमा नाही ठेऊ शकत. सत्य पचवणं आणि मानणं कठीण असतं ते हेच. एरवी आपण पूर्वजन्मी च्या गोष्टी करतो. प्रारब्धाच्या गोष्टी करतो ते मान्य असतं कारण आपल्याला सोयीस्कर वागण्याची सवय झालेली असते.  जर का घराबाहेरच्या व्यक्ती बरोबर तुमचं खूप चांगलं पटतं असेल तर लगे...

आलोय तुमचा निरोप घ्यायला..

Image
अथिती देवो भव.. ही म्हण तुमच्या जगात आहे. निश्चितच मला अशी वागणूक मिळणारच नव्हती. कारण बीनबुलाये मेहमानाच तुम्ही माणसं किती मनापासून स्वागत करता याबद्दल पण ऐकलंय.... मी तर सगळ्यात नावडता पाहुणा.  तुम्ही सगळ्यांनी माझा शोध घेतला. माझ्या विषयी जाणून घेतलं. मी तुमच्या जवळपास पण येऊ नये म्हणून तुम्ही खूप काळजी घेतलीत. माझ्याबद्दल अपशब्द पण उच्चारले.  " काळजी करू नका, मला त्याचा राग नाही आला. मी मान्य करतो की मी चुकलो.  खरंतर तुम्हाला जवळून बघितल्यावर असं जाणवलं की तुम्ही इतकेही वाईट नाही. काहीजणांनी माझ्यासाठी  कविता रचल्या, गाणी गायली. माझ्यासाठी अगदी मंत्र , आरत्या पण रचल्या. तर काहीजणांनी माझ्यावर विनोद केले, माझी चेष्टा केली.  माझ्या जाण्यासाठी जेवढे जमतील तेवढे उपाय केलेत. तुम्हाला मी दिसत नाही याचाही राग आला, पण काय करणार मला रूपच असे दिले. म्हणूनच आता निरोप घ्यायला आलोय कारण मला माहिती आहे, एक दिवस तुम्ही मला नष्ट करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही मान्य करा किंवा नका करू माझ्या येण्याने तुमच्या जीवनशैलीत भरपूर फरक पडला. अहो लहान मुलं तर किती खुश झालेत कारण त्...

कोरोना आणि ‍ बदलते नातेसंबंध

Image
नातं, एक असा शब्द जो एकमेकांना एकमेकांशी जोडतो. मगं त्या प्रत्येक नात्याला नावं असेलच असं नाही. काही नाती ही निःस्वार्थी उद्देशाने केलेली असतात, तर काही नाती कुठल्यातरी योजनेसाठी केलेली असतात.  नातं, घरातल्यांशी असुदे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनबरोबर असुदे. नातं, निसर्गाशी असुदे किंवा देशाशी असुदे. नातं, जुन्या काळातल्या (पुरातन) गोष्टींशी असुदे किंवा नवीन तंत्रज्ञानाशी असुदे. सगळ्यात महत्वाचं आहे, ते नातं जोपासणं. मगं ते जोपासताना तुम्हाला कधीकधी योग्य वेळेची वाट बघावी लागते.  कारण नातं जोडणं कठीण आहे पण तोडण खूप सोप्पं आहे.  जशी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहे अगदी तशीच नात्याला सुद्धा आहे. मोबाईल बंद झाला तर आपण (restart) परत चालू करतो. पण (restart) परत चालू करताना थोडा वेळ थांबतो.  कारण वेळ हेच औषध आहे. पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हणतात,  योग्य वेळ आली की सगळं नीट होईल.  बरं मग ती वेळ नक्की येणार कधी हे आपल्याला माहीत नसतं पण विश्वास ठेऊन आपण त्या वेळेची वाट बघत असतो. कारण मनात कुठेतरी एक आशेचा किरण लपून बसलेला असतो, ज्याला त्या योग्...

आई , बाबा आणि मी

आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे पालकत्व स्वीकारणं. आपल्याकडे असं म्हणतात की आयुष्यातला दुसरा टप्पा हा पन्नाशी ओलांडली की मग सुरू होतो. पण मला तर वाटत की दुसरा टप्पा (second inning) हि आपण बाळाचा विचार करायला लागतो तेव्हाच सुरू होतो. कारण नंतरच आयुष्य (अगदी पन्नाशी ओलांडल्यावर सुध्दा) हे मुलांच्या अवतीभोवती असतं.  बाळाचा विचार करण्यापासून ते प्रत्यक्ष आई बाबा झाल्यावर कसं वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जावं लागतं त्यावर माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.  आई बाबा आणि मी हे शीर्षक मुद्दाम ठेवले आहे कारण पालकत्वामध्ये नुसते आई बाबा नाही तर त्यांचं मुलं (एक किंवा दोन) पण तेवढाच महत्वाचा भाग असतो.  आणि म्हणूनच आई बाबा आणि मी ह्यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.  तुमचा अभिप्राय नक्की कळवा. #NehaP

अस्तित्वाची तुलना

Image
कालच मी जब वी मेट बघत होते. त्यामध्ये नायिकेच स्वतः वर खूपच प्रेम असतं. तिचा ठरलेला डायलॉग म्हणजे मैं अपनी favourite हुं | असा आहे. चित्रपट बघताना खूपच भारी वाटत. एकदम जबरी वाटतं. असं वाटायला लागतं की बासच आपणच ती नायिका आहोत आणि आज पासून मी पण म्हणणार, की मैं अपनी favourite हुं |   असं म्हणत नकळत आपण त्या नायिकेच्या भूमिकेत शिरतो आणि उगाच वाटतं की आपण तिच्या पेक्षा नक्कीच चांगला अभिनय केला असता.  पण मग आजुबाजुच्या माणसांकडे बघितलं की असं वाटतं , जणू काही मालिकांमधल्या खलनायिका किंवा खलनायक आपल्याच नशिबात आहेत. तिथेच आपण ठरवतो की साध्या आयुष्यात आपल्या अस्तित्वाची तुलना केली जाते तीच सांभाळताना नाकिनव येतो . तर हे असं दुहेरी आयुष्य सांभाळताना काय होईल आपलं. खरंच हे सगळं सांभाळणं सोप्पं नाहीये.  मात्र एक विचार नेहमी येतो की आपल्याकडे तुलना करणं कधी थांबणार. प्रत्येक गोष्टीत तुलना. लहान मुलं एकत्र खेळत असतील तरी तुलना. अभ्यास करत असतील तरी तुलना करणार. खरंतर त्या मुलांमध्ये हे विचार निर्माण करणारे आपणच आहोत. अहो मुलं निरागस असतात त्यांच्या मनात हे विचा...

मैत्रिणींनो तुमच्यासाठी..,

Image
पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हटलं जातं की, नावं ठेवणं फार सोप्पं आहे पण कौतक करणं तेवढंच कठीण.  आज मात्र मला खरंच माझ्या सगळ्या मैत्रिणींच कौतुक करावस वाटतं. आम्ही सगळ्या आधुनिक पिढीतल्या म्हणजे चूल मुलं ह्या संकल्पनेतल्या तर आम्ही नक्कीच नाही. आधीच्या पिढीतल्या नक्कीच काही कारणास्तव त्या संकल्पनेत अडकलेल्या त्यामुळे त्यांचा आदर तेवढाच आहे.🙏🙏.  आमची पिढी बिनधास्त, बेधडक बोलणारी म्हणून तर नक्कीच  प्रसिद्ध आहे. काहीजण आमच्या संस्कारांचा उद्धार सुध्दा करतात. पण तो त्यांच्याकडे🙏🙏.  असं म्हणतात की आपण काळानुरूप बदललं पाहिजे. येईल त्या प्रसंगाना सामोरं जाता आलं पाहिजे. कदाचित ह्याचाच परिणाम आमच्यावर झाला. सध्याच्या lockdown च्या काळात खूप वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जातोय. त्यातून माझ्या सगळ्याच मैत्रिणींना साधारण ३-७/८ वर्षातली मुलं आहेत.  सकाळपासून थेट रात्री झोपे पर्यंत त्यांची कामं सुरूच असतात. त्यात काहीजणींचं work from home चालू आहे. ते सांभाळून घरची कामं आणि मुलांच्या शाळा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेच त्या कमी नाही पडत. मुलांना बाहेर जाता येत न...