टाईम प्लीज
टाईम प्लीज...
खेळ असुदे किंवा भांडण, वाद विवाद आपला मुद्दा मांडण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे "टाईम प्लीज" म्हणायचं.. नुसतं म्हणायचं नाही तर हाताची मूठ करून ती आपल्या ओठांना लावायची आणि मगच म्हणायचं. इतका दृढ विश्वास होता त्या एका शब्दावर की जणू खरंच वाटायचं साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्यासाठी तो क्षण धरून ठेवतोय...
लहानपणीचं "टाईम प्लीज" आपल्या आयुष्यात इतक्या आठवणी देऊन जातात, की कधीकधी वाटतं मोठं झाल्यावर हा उपाय रोजच्या आयुष्यात इतक्या सहज वापरायला मिळाला तर जगणं किती सोप्पं होईल.
खरंच असा संवाद साधता आला तर.....
भक्त - आहे का वेळ? जरा बोलायचं..
देव - वेळच वेळ आहे ..ये भेटायला....
भक्त - ( मित्र मैत्रिणींनबरोबर गप्पा चालू होत्या.) तेवढ्यात देवाचं बोलावणं आलं आणि पटकन मुखातून आलं, ए " टाईम प्लीज" हा,.आलोच जरा....
असं म्हणून देवासमोर चर्चा सुरू होणार तेवढ्यात,
देवं म्हणाले कि तू जर सगळ्यांच्या तक्रार करणार असशील तर मी त्या रोज ऐकतो... परत तेच नको..
भक्त - अरे यार, ह्याला काय अर्थ आहे..म्हणजे खाली कोणाशी बोलू शकत नाही... आणि एवढं " टाईम प्लीज" घेतलं तुझ्याशी बोलायचं म्हणून तर आता तू नाही म्हणतोस....
देवं - (मनातल्या मनात हसले). आणि म्हणाले, मी पण आता तुमच्या सारखे " Crash Course" सुरू करणार आहे. आणि लिहिणार तिथे की "write this sentence 10 times". कारण तुम्हाला तीच पद्धत कळते.
भक्त - तुझं सगळं बरोबर आहे...पण तुला काय माहित माणूस म्हणून जगणं किती कठीण आहे ते. .. तुझ्या जवळ जे शिकलं ते सगळं विसरायला होतं.
देवं - तुम्ही विसरता, कारण जसं अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थाला, टीव्ही चा आवाज विचलित करतो. तसेच माझ्या नामा पासून आजूबाजूच्या गोष्टी तुमचं मन विचलित करतात.. त्याला मी काय करू? तुम्ही का हे विसरता की मोक्ष प्राप्ती साठी तुम्हाला सारखा मनुष्याचा जन्म दिला जातो, जो पर्यंत तुमच्या सगळ्या चुका सुधारत नाही तो पर्यंत.
अरे साधं उदाहरण घेऊ तुम्ही लोकांनी मुलांना दहावी पर्यंत पास करायचा निर्णय घेतला, मुलं पुढच्या वर्गात तर गेली पण चुका सुधारल्या का वाढतच गेल्या?
त्यामुळे मला तू काही सांगू नकोस....
भक्त - तूच जर असे हात वर केलेस तर मी कुठे बघू?
देव - हा नेहमीचा Dialogue नको आता please.
भक्त - तुला बरे पाठ आहेत....
देव - तुम्ही मूर्ती समोर उभे राहून म्हणा, कुठल्याही उर्जेसमोर म्हणा किंवा कुठल्याही मंदिरात उभे राहून म्हणा, शेवटी आवाज माझ्या जवळच येतो.
सेकंदाला १०० पेक्षा जास्त लोकं हीच प्रार्थना करतात.
लहानपापासूनच आम्हाला एक म्हण शिकवली आहे, ऐकावं जनाचे करावं मनाचे...
आता तूच सांग, सामान्य माणूस गोंधळात पडणारच ना...
तुझ्याशी बोलायचं ह्या आशेने देवळात(प्रार्थना स्थळी) प्रत्येकजण जातो/ जाते पण नेहमीच कुठला न कुठला उपाय सांगितला जातो...
अरे तुला काय सांगू , प्रारब्ध ह्या जन्माच आहे की मागच्या जन्माच हेच कळत नाही... म्हणजे हसण्यात बोलायचं ठरवलं तर अशी किती माती खाल्ली आहे हेच कळत नाही...
देव - (हसून) तुम्ही सगळे प्रयत्न करता, वेगवेगळे उपाय करता पण असा एक दिवस सांगा तुमच्या आयुष्यातला की निस्वार्थीपणे तुम्ही माझ्या समोर उभे राहिला आहात... देवळात सुद्धा जास्त वेळ उभे राहायला नको म्हणून काही लोक पैसे भरून VIP दर्शन घेतात. पण हे विसरून जातात की खाली कितीही पैसे भरले, ओळख काढली तरी वरती तुमची प्रार्थना तुमच्या सत्तकर्मानुसार आणि वेळ आली की मगच ऐकली जाते आणि पूर्ण होते.
पण तेवढा संयम कुठे आहे? आणि कंटाळून, त्रास करून घेऊन परत चुका करायला सुरवात होते.
कुठेही पाणी साचलं तर जो पर्यंत तिथला कचरा दूर होता नाही तो पर्यंत सगळंच तुंबून राहत. दुर्गंधी पसरते. थोडा कचरा साफ केला की थोडे पाणी निघून जाते पण तेच परत कचरा टाकला तर परत पाणी जायला वेळ लागतो पण तोच आजूबाजूचा कचारा साफ करताना शेवटला एकत्र येतो आणि थोडा जोर लावला की कचरा निघून जातो आणि सगळं पुन्हा सुरळीत होतं.. अगदी तसच तुमच्या आयुष्यातली पाप, दुर्गुण साफ करायला वेळ तर लागणारच... तुम्ही जसं पुण्य करायला सूरवात करता हळू हळू आनंदाचे काही क्षण तर मिळतातच... पण सगळ्यातून प्रत्येकाला बाहेर काढताना मला किती यातना होतं असतील ह्याचा विचार केला कधी? अगदी सगळं सुरळीत होणारच असतं पण ते शेवटचे चटके सहन होत नाहीत आणि परत त्याच चक्रात अडकून जातो. पण जी तरतो तो जिंकतो.
आणि त्याच तरण्यासाठी नाम घ्या, पुण्य करा, जितकी जमेल तेवढी मदत करा... वर्तमान काळात जगायला शिका... भविष्य तुमच्या वर्तमानावर अवलंबून आहे.
आणि हो, तुमच्या "टाईम प्लीज" चा वापर परत परत करत रहा... म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल....
#NehaP
* माझ्या आई वडिलांकडून आणि शिक्षकांकडून जितकं ऐकलं ते लिहिण्याचा प्रयत्न... मी खूप लहान आहे हे सांगायला. 🙏.
बरच आहे लिहायला पण आत्ता एवढेच....
धन्य ते गुरू🙏🙏
Comments
Post a Comment