सेम पेज

" हम तुम " हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. कारण त्यामधला एक लोकप्रिय संवाद की, "हर किसी की कोई ना कोई कहानी होती हैं" | हा सगळ्यात जास्त मला मनाला आवडला..काही नाती आयुष्यभरासाठी टिकतात तर काही एका दिवसात संपतात... 

ह्याचाच अर्थ त्या नात्यांमधल पुस्तकं हे छोटं किंवा मोठं असू शकतं. " वाचाल तर वाचाल " ही म्हण आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत आलोय. मगं ते वाचन पुस्तकांचं असेल किंवा आयुष्यात येणाऱ्या नात्यांचं. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सेम पेजवर असण. कारण जसं आपण म्हणतो की पुस्तकांचं वाचन करताना तुम्ही जर ते टप्प्यात केलं तर दुसऱ्यादिवशी तुम्हाला संदर्भ लागला पाहिजे. अगदी तसचं नात्यात पण आपण काल ज्या पानावर होतो तिथूनच पुढे दोघांनी सेम पेजवर असण महत्वाचं आहे.

कितीही झाल तरी पुस्तकात आपण एखादी निर्जीव वस्तू खूण म्हणून ठेवु शकतो, जी आपल्याला दुसऱ्या दिवशी काल शेवट कुठे केला ते दाखवते. पण नात्यांचं तसं नाहीये कारण काल शेवट कुठे केला हे आपलच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तिथून पुढे सुरवात करताना त्या दोन व्यक्ती सेम पेजवर असण
 गरजेचं आहे. 

मगं ते नातं नवरा बायकोच असेल किंवा पालक आणि मुलांचं असेल नाहीतर मित्रमैत्रिणींच असेल. एकजण पुढच्या पानावर आणि दुसरा अजुन मागच्याच पानावर किंवा दुसऱ्याने अजुन सुरवातच केली नसेल त्या नात्याच्या पुस्तकात व्याकरणाच्या खूपच चुका मिळतील. काही नाती पुस्तकं बंद करतात आणि पुढे निघून जातात पण काही तेच तेच पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करत असतात. नवरा बायकोच्या नात्याच पुस्तकं तरी सहज हाताळता येणार असतं पण आई बाबा झाल्यावर शब्दांच वजन, महत्त्व लगेच वाढते. आई ने एखाद्या गोष्टीस नाही म्हटलं तर बाबांनी पण त्या मताला ठाम राहिले पाहिजे तरच बाळाला शिस्त लागते. 

आत्ताच्या काळात स्पर्धात्मक जीवन इतकं आहे की प्रत्येक जण घाई घाई ने आयुष्याचं पुस्तकं हाताळताय. सगळ्यांची घाई आणि भीती ही आहे की बाकीचे सगळे माझ्या पुढे तर जाणार नाही ना? किंवा दुसऱ्यांसरखा आनंद माझ्या हातून निसटणार तर नाही ना? खरी नाती कधीच पुढे निघून जात नाहीत. तेच पान परत परत उलगडतिल पण तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाहीत. अशी माणसं , नाती मिळायला नशीब लागते. 

आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक गोष्टीची तुलना होते. आनंदाची सुद्धा, तुलना होणे हे खूप घातक आहे. क्षणिक समाधानासाठी आपण खरा आनंद घ्यायला विसरतो. विसरून जातो की हे सगळं काही सेकंदाचा खेळ आहे. सगळी नाती, वस्तू, इथेच राहणार आहेत. फक्त आठवणी सोबत राहतात मग तुलना काय कामाची, क्षणिक समाधानचा अर्थ काय? 

आनंद अनुभवण्यासाठी सेम पेजवर सगळे जण असणं अत्यावश्यक आहे. कारण पुस्तकं किती पानांचं आहे हे आपल्याला माहीत नाहीये पण शेवट मात्र ," and they lived happily ever after" असाच झाला पाहिजे..... 

 

Comments

Popular posts from this blog

गुरु - सगुण रुपात

भोलानाथ का रे वागलास असं?

दार उघडं बये दार उघडं....