The Millennials

पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत म्हणजे पुढच्या नवीन पिढीला नावं ठेवणं होय. मग ती नावं उद्धार करण्यासाठी असूदे किंवा कौतुक करण्यासाठी असुदे. हल्ली कानावर पडणाऱ्या पिढ्यांची नावं म्हणजे GenZ, Gen Alpha आणि The Millennials.. एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा पिढ्यांना नावं ठेवणं सोप्पं आहे. 

बरं ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी Millennials म्हणजे १९८१-१९९६ ह्या वर्षात जन्मलेली मुले. GenZ म्हणजे १९९७-२०१२ ह्या वर्षात जन्मलेली मुले आणि Gen Alpha म्हणजे २०१३-२०२५ ह्या वर्षांत जन्मलेली मुले. असा हा सध्या विषय (Trend) चालू आहे.  

प्रत्येक पिढी ही नवीन संस्कार आणि जीवनमूल्ये निर्माण करत असते जी त्या वयाला आणि त्या काळाला अनुरूप असतात. पण सध्या बहुचर्चित असलेली पिढी ही Millennials ची आहे. कारण आमच्या डोक्यावर एक हात जुनं ते सोनं ह्यांचा आहे तर आमच्या हातात हात please stop being an old schooler ह्यांचा आहे.. आणि ह्या दोन्ही पिढ्यांमध्ये जवळपास ६० - ७० वर्षांच अंतर आहे. 
 
बरं, millennials ना त्यांची मत मांडणं कधी कधी इतकं कठीण होतं कारण तो समतोल साधताना त्यांच्यावर बाकीच्या दोन पिढ्यांची जबाबदारी असते. हल्ली बऱ्याचदा आपण ऐकतो की ४० वर्षाचा होता आणि heart attack ने गेला, डायबिटीस आणि बीपी सुरू झालं, ३२ वर्षांची होती आणि आत्महत्या केली आणि असे बरेच आजार झाल्याचं आपण ऐकलंय. 

पण हे का होतंय? फक्त खाण्याची सवय हे कारण आहे का?
तर त्याला बरीच कारणं आहेत. Millennials एका अश्या चक्रात अडकले आहेत जिथे पैसा असेल तर एक चांगलं जीवन जगता येईल, तर तुम्हाला समाजात मान मिळेल. पूर्वीपेक्षा आत्ताचे ऑफिस जीवन वेगळे आहे. साधारणतः दिवसातले १० तास हे ऑफिस च्या कामात जातात. उरलेले २-३ तास घरची कामं करण्यात जातात.. 

नोकरी सोडून दुसरं काही करायचे झाले तर जबाबदारी मुळे सहज शक्य होतं नाही. आणि सामान्य मध्यम मराठी कुटुंबात हीच शिकवण असते की नोकरी सोडायची नाही, सारखी बदलायची नाही आणि गरज पडल्यास जास्त काम करायचं पण मनाला वाटलं म्हणून सगळं सोडून ब्रेक घेतला असं होत नाही. त्यातून मुलांच्या शाळेची फी, सगळेच पालक IT मध्ये नोकरी करत नाही त्यामुळे फी चा आणि इतर खर्चाचा ताण असतो तो वेगळा. 

हे सगळं सांभाळताना बऱ्यापैकी millennials ची विचारसरणी अशी झाली आहे की "तुम्ही जागा आणि आम्हाला पण जगू द्या". कुटुंब पध्दती बदलली, आई वडील आणि मुलं अशी पद्धत जास्त प्रमाणात सुरू झाली. त्यावर टीका करणारे आणि समर्थन करणारे दोन्ही समाज आहेत. 

आजच्या पिढीला स्पर्धा सगळीकडेच बघावी लागते कारणं नवीन दिवस नवीन बदल... नवीन बदल नवीन स्पर्धा ह्या तत्वावर जीवन जगत आहेत. नोकरीच्या ठिकाणी "तू नही तो कोई और सहि" अशी वागणूक असल्यामुळे नोकरी टिकवणे ही Millennials पुढील समस्या आहे. नोकरी टिकवण्यासाठी मुलांना वेळ दिला नाही, घरातली कामं झाली नाहीत, मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत अशी अनेक उदाहरणं देऊन अपराधी भावना निर्माण करतात.. 
 
अपराधी भावनेचा परिणाम जोडप्यावर होतो आणि त्यातून उद्भवते ते म्हणजे क्लेश, भांडण, चिडचिड... कारण नकळत पणे millennials वयाच्या जोडप्याला खर काय चुकतंय हे कळतच नाही .... अहो, कुठल्या आई बाबाला वाटेल की आपल्या मुलाला, पालकांचं प्रेम म्हणजे मॉल मध्ये जाणं बाहेर खाणं, नवीन खेळणी देणं असं वाटावं...

आणि त्याच संघर्षात एकटा आहे तो ठे Millennials... ओले आले सारखे चित्रपट बघून सोडून द्यायला नसतात.. प्रत्यक्षात उरविण्यासाठी कधी तरी एकदा म्हणा, की थोडं थांब.. स्वतःसाठी जग... आयुष्यभर हे चालूच राहणार आहे... पण तु एकदा तरी तुझ्या स्वतःचा होऊन जग... बघ किती समाधान मिळेल.... 

#NehaP
20th Feb 2024




Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य