ROI

माणूस शेवटपर्यंत हा विद्यार्थीच असतो हे वाक्य रोज अनुभवायला मिळतं. खरंच सोमवारचा दिवस काही तसाच होता. मी आणि माझे सहकर्माचारी ROI म्हणजेच returns on investment म्हणजेच गुंतवणुकीवर परतावा ह्या बद्दल बोलत होतो, की कंपनी नवीन लोकांना नियुक्त करताना त्या व्यक्तीचा ROI विचारात घेऊन मग निर्णय घेते. 

खरंतर हा विषय दुपारच्या जेवणाच्या टेबलवरच संपला होता. पण माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला,की return on investment चा विचार आपण आपल्या खाजगी आयुष्यात कधीच करत नाही. पूर्वी म्हण ऐकली आहे जसं पेरता तसं उगवतं पण कदाचित मनुष्याचा अहंकार कधीकधी इतका वाढतो की आपण नक्की काय पेरातोय ह्याकडे दुर्लक्ष होतं. 

आपण ऐकतो सकारात्मक विचार करा, ध्यान करा, अहंकार बाजूला ठेवा, ऐकण सोपं आहे पण अमलात आणताना रोज कष्ट घ्यावे लागतात, कारण investment नक्की कश्यात करायची आणि किती करायची ह्याचं गणितंच उलगडत नाही. 

काही नात्यांनमध्ये आपण कितीही invest केलं तरी त्याचे returns तेवढे मिळतं नाहीत कारण ते नात तेवढच असतं पण काही नाती आपोआप इतके सुंदर returns देतात की आपल्याला ५% investment पण १००टक्के गोड फळं देऊन जातात. अगदी तसच स्वतः मध्ये invest केलं तर स्ट्रेस, वेगवेगळे आजार, नैराश्य, स्वतःच्या  सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे हे सगळं निघून जाईल. 

कारण ती investment म्हणजे कुठल्याही अपेक्षेशिवय जगणं, स्वतः वर प्रेम करणं, छंद जोपासण, स्वतः च्या इच्छा स्वतः चं पूर्ण करणं आणि अश्या बऱ्याच investment schemes आहेत. पण माणूस त्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करतो की त्याला investment औषध, डॉक्टरांच्या फेऱ्या ह्यामध्येच करावे लागते. 

बँकमधे किती invest केलं ते पासबुक भरल्यावर कळतं तसचं आयुष्याच्या पाप- पुण्याची पण एक पासबुक असायला हवी होती. रिव्हर्स entry करता आली असती की नाही माहीत नाही पण पुढच्या entry विचार करून करता आल्या असत्या. 
रोज दिवस खर्च लिहून काढतो तसं रोजची स्वतः साठी केलेली investment पण लिहून काढायला हवी म्हणजे कळेल कुठल्या नात्यात किती, कुठे आणि कशी investment केली आहे. 

शेवटी आपण एक वाक्य नेहमीच ऐकतो की, investments are subject to market risk. Please read the documents before investing. 
स्वतःचा विचार करून invest करायचं का लोकांचा, समाजाचा विचार करून invest करायचं ते तर आपल्या आयुष्यातल्या अनुभवांचे डॉक्युमेंट्स वाचूनच ठरवायला लागेल.. 

ह्याला (last date) शेवटची तारीख नाहीये पण ITR file करायची शेवटची तारीख ३१ जुलै आहे बरं का.... 

#NehaP




Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials