Posts

शाळेत बाई आणि घरात आई

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे." ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? "  अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात..  आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो...   " नावात काय आहे "  असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी  "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे... २०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क ...

गोरी गोरी पान फुलासारखी छान......

Image
" काय झालं का गाणं म्हणून?"  अहो मी तुम्हालाच विचारत आहे. शिर्षकच असं आहे की गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.. हे गाणं आपोआप आपण गुणगुणारच.  आपल्या घरातली अशी एक व्यक्ती जिच्या बद्दल आपल्याला लहानपणापासून ओढ निर्माण होते. मगं ती सख्खी वहिनी असेल किंवा चुलत मामे वहिनी , आपल्याला तिची चाहूल हवीहवीशी असते. कारण कुठेतरी आपण तिला मनातूनच बहीण मानलेल असतं.  आपल्याकडे लग्नं ठरल्या दिवसापासून मुलींकडून अपेक्षांना सुरवात होते. ती कुणाचीतरी मामी होते, कुणाचीतरी काकू होते, कुणाचीतरी वहिनी, जाऊ होते.. अशी अनेक नाती तिला सांभाळायची असतात. खूप पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. बरं बाकीची नाती निभावताना तिला तिचं लग्नाआधीच्या आयुष्याची उणीव भासते.. तिला परत ते आयुष्य जगावस वाटतं.. कारण लग्नाआधी तिच्या आयुष्यात एक मोकळीक असते.  पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर नणंद भावजया (वहिनी) ह्यांच्यावर भरपूर किस्से लिहिले जातात. आमची पिढी तर सरळ तिला तिच्या नावाने हाक मारते. मला वाटतं आपण आपल्या घरातल्या सगळ्याच व्यक्तींना बरोबर ओळखत असतो. पण वहिनीने जर का आपल्या घरातल्यांवि...

हक्क - महत्वाचा की नाही?🤔🤔

Image
हक्क ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच बजावयची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत पहिल्यापासूनच हक्क ह्या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. सगळ्यात जास्त महत्व तर खुर्चीवरच्या हक्काला आहे. मग ती खुर्ची राजकारणातली असुदे किंवा बस आणि ट्रेन मधली, ती ज्याला मिळाली ते नशीबवान असतात. बरं त्याच्यामुळे आजूबाजूच्या नात्यांवर काय परिणाम होतील त्याची शाश्वती नाही..  मात्र तोच हक्क तुम्ही एकमेकांवर बजावला तर त्याचे परिणाम खूपच वेगळे असू शकतात. प्रत्येक गोष्टीला जश्या सीमा असतात अगदी तश्याच प्रत्येक नात्यात सुध्दा असतात. मग ते नात बहीण भावांच असेल, मित्र मैत्रिणीच असेल, आई मुलांमधले असेल, बाबा - मुलांमधले असेल, सासू- जावई मधले असेल, सासू - सूनेतल असेल.   आपल्याला वाटतं की असं काही नसतं आणि घरातल्यांशी वागताना कुठल्याच सीमा नाही ठेऊ शकत. सत्य पचवणं आणि मानणं कठीण असतं ते हेच. एरवी आपण पूर्वजन्मी च्या गोष्टी करतो. प्रारब्धाच्या गोष्टी करतो ते मान्य असतं कारण आपल्याला सोयीस्कर वागण्याची सवय झालेली असते.  जर का घराबाहेरच्या व्यक्ती बरोबर तुमचं खूप चांगलं पटतं असेल तर लगे...

आलोय तुमचा निरोप घ्यायला..

Image
अथिती देवो भव.. ही म्हण तुमच्या जगात आहे. निश्चितच मला अशी वागणूक मिळणारच नव्हती. कारण बीनबुलाये मेहमानाच तुम्ही माणसं किती मनापासून स्वागत करता याबद्दल पण ऐकलंय.... मी तर सगळ्यात नावडता पाहुणा.  तुम्ही सगळ्यांनी माझा शोध घेतला. माझ्या विषयी जाणून घेतलं. मी तुमच्या जवळपास पण येऊ नये म्हणून तुम्ही खूप काळजी घेतलीत. माझ्याबद्दल अपशब्द पण उच्चारले.  " काळजी करू नका, मला त्याचा राग नाही आला. मी मान्य करतो की मी चुकलो.  खरंतर तुम्हाला जवळून बघितल्यावर असं जाणवलं की तुम्ही इतकेही वाईट नाही. काहीजणांनी माझ्यासाठी  कविता रचल्या, गाणी गायली. माझ्यासाठी अगदी मंत्र , आरत्या पण रचल्या. तर काहीजणांनी माझ्यावर विनोद केले, माझी चेष्टा केली.  माझ्या जाण्यासाठी जेवढे जमतील तेवढे उपाय केलेत. तुम्हाला मी दिसत नाही याचाही राग आला, पण काय करणार मला रूपच असे दिले. म्हणूनच आता निरोप घ्यायला आलोय कारण मला माहिती आहे, एक दिवस तुम्ही मला नष्ट करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही मान्य करा किंवा नका करू माझ्या येण्याने तुमच्या जीवनशैलीत भरपूर फरक पडला. अहो लहान मुलं तर किती खुश झालेत कारण त्...

कोरोना आणि ‍ बदलते नातेसंबंध

Image
नातं, एक असा शब्द जो एकमेकांना एकमेकांशी जोडतो. मगं त्या प्रत्येक नात्याला नावं असेलच असं नाही. काही नाती ही निःस्वार्थी उद्देशाने केलेली असतात, तर काही नाती कुठल्यातरी योजनेसाठी केलेली असतात.  नातं, घरातल्यांशी असुदे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनबरोबर असुदे. नातं, निसर्गाशी असुदे किंवा देशाशी असुदे. नातं, जुन्या काळातल्या (पुरातन) गोष्टींशी असुदे किंवा नवीन तंत्रज्ञानाशी असुदे. सगळ्यात महत्वाचं आहे, ते नातं जोपासणं. मगं ते जोपासताना तुम्हाला कधीकधी योग्य वेळेची वाट बघावी लागते.  कारण नातं जोडणं कठीण आहे पण तोडण खूप सोप्पं आहे.  जशी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहे अगदी तशीच नात्याला सुद्धा आहे. मोबाईल बंद झाला तर आपण (restart) परत चालू करतो. पण (restart) परत चालू करताना थोडा वेळ थांबतो.  कारण वेळ हेच औषध आहे. पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हणतात,  योग्य वेळ आली की सगळं नीट होईल.  बरं मग ती वेळ नक्की येणार कधी हे आपल्याला माहीत नसतं पण विश्वास ठेऊन आपण त्या वेळेची वाट बघत असतो. कारण मनात कुठेतरी एक आशेचा किरण लपून बसलेला असतो, ज्याला त्या योग्...

आई , बाबा आणि मी

आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे पालकत्व स्वीकारणं. आपल्याकडे असं म्हणतात की आयुष्यातला दुसरा टप्पा हा पन्नाशी ओलांडली की मग सुरू होतो. पण मला तर वाटत की दुसरा टप्पा (second inning) हि आपण बाळाचा विचार करायला लागतो तेव्हाच सुरू होतो. कारण नंतरच आयुष्य (अगदी पन्नाशी ओलांडल्यावर सुध्दा) हे मुलांच्या अवतीभोवती असतं.  बाळाचा विचार करण्यापासून ते प्रत्यक्ष आई बाबा झाल्यावर कसं वेगवेगळ्या प्रसंगाना सामोरं जावं लागतं त्यावर माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.  आई बाबा आणि मी हे शीर्षक मुद्दाम ठेवले आहे कारण पालकत्वामध्ये नुसते आई बाबा नाही तर त्यांचं मुलं (एक किंवा दोन) पण तेवढाच महत्वाचा भाग असतो.  आणि म्हणूनच आई बाबा आणि मी ह्यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.  तुमचा अभिप्राय नक्की कळवा. #NehaP

अस्तित्वाची तुलना

Image
कालच मी जब वी मेट बघत होते. त्यामध्ये नायिकेच स्वतः वर खूपच प्रेम असतं. तिचा ठरलेला डायलॉग म्हणजे मैं अपनी favourite हुं | असा आहे. चित्रपट बघताना खूपच भारी वाटत. एकदम जबरी वाटतं. असं वाटायला लागतं की बासच आपणच ती नायिका आहोत आणि आज पासून मी पण म्हणणार, की मैं अपनी favourite हुं |   असं म्हणत नकळत आपण त्या नायिकेच्या भूमिकेत शिरतो आणि उगाच वाटतं की आपण तिच्या पेक्षा नक्कीच चांगला अभिनय केला असता.  पण मग आजुबाजुच्या माणसांकडे बघितलं की असं वाटतं , जणू काही मालिकांमधल्या खलनायिका किंवा खलनायक आपल्याच नशिबात आहेत. तिथेच आपण ठरवतो की साध्या आयुष्यात आपल्या अस्तित्वाची तुलना केली जाते तीच सांभाळताना नाकिनव येतो . तर हे असं दुहेरी आयुष्य सांभाळताना काय होईल आपलं. खरंच हे सगळं सांभाळणं सोप्पं नाहीये.  मात्र एक विचार नेहमी येतो की आपल्याकडे तुलना करणं कधी थांबणार. प्रत्येक गोष्टीत तुलना. लहान मुलं एकत्र खेळत असतील तरी तुलना. अभ्यास करत असतील तरी तुलना करणार. खरंतर त्या मुलांमध्ये हे विचार निर्माण करणारे आपणच आहोत. अहो मुलं निरागस असतात त्यांच्या मनात हे विचा...