Posts

" पासवर्ड "

Image
(आदी ची आई ) आदी ची आई : काय फालतुगिरी आहे यार... कळतंच नाही की कसं वागायचं आदि बरोबर. असं वाटतं की आपण केलेले संस्कार गेले कुठे? लहानपणी तर असा नव्हता हा. माझ्याशी सगळं बोलायचा, शेअर करायचा आणि आता काहीच शेअर नाही करत तो माझ्याबरोबर. असा तर नव्हता अगं आदी. कळतंच नाही की कसं वागायचं आम्ही , म्हणजे हा नीट वागेल आमच्याशी.  हे संवाद बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतात. मुलं लहान असतात तेंव्हा ते आई बाबा बरोबर सगळं शेअर करतात. असं म्हणतात की जनरेशन गॅप मुळे हे वादविवाद होतात. मला असं वाटतं की हे वादविवाद होतात कारण आपण आपल्या मुलांमधल्या बदलला ला स्वीकारू शकत नाही. लहान असताना आपल्या मुलाने कुठलीही मस्ती केली तरी आपण त्यांना स्वीकारायचो कारण ते निरागस होते. आपल्यामध्ये संवाद असायचा, कारण त्यांना आपण मुक्त पणे  स्वीकारायचो. मुलांनाही वाटायचं की कधी एकदा शाळा सुटते आणि घरी जाऊन मी आज काय काय घडलं ते आई बाबा बरोबर शेअर करतोय. छोट्यातली छोटी गोष्ट सुध्दा ते आपल्याला येऊन सांगायचे. जनरेशन गॅप तेंव्हा होतीच की, मगं मोठे झाल्यावर असे काय घडलं की आपल्यापासून गोष्टी लपवायला त्यांना " पासव...

टोपण नाव

बाळ जन्मल की आपण त्याच बारस करतो. जन्माला आल्याबरोबर त्याला चिनू, सोनू , मनु, पिल्लू अशी बरीच नावं ठेवतो. आयुष्यात सगळ्यात जास्त ओळख निर्माण होते ते आपल्या टोपण नावाने. काही जण व्यक्तीच्या स्वभावावरून टोपण नावे ठेवतात तर काही आडनावावरून. बरं सगळ्या टोपण नावांना अर्थ असतोच असं नाही, काहींना असतो तर काहींना नसतो.  एखाद्याच टोपण नाव इतकं प्रसिध्द असतं की तो व्यक्ती कितीही मोठा झाला तरी चारचौघात त्याला त्याच्या टोपण नावानेच हाक मारतात. अहो लग्नं मंडप पण सोडत नाहीत. तिथे तर नवरदेवाला टोपण नावाने त्याचा फोटोग्राफर हाक मारत होता. कमालच ना म्हणजे ... बरं मुलीकडच्यांना पत्रिका परत बघावी लागली की हा बालविवाह तर नाही ना😂🤣? कारण मुलाचं नाव वेगळच आणि लग्नमंडपात नवरदेव म्हणून कोणीतरी भलताच बबल्या उभा राहिला की काय🤔🤔😂 अहो अशी पण लोक आहेत जी फोन वरती दुसऱ्याचं व्यक्तीशी अर्धा तास गप्पा मारतात कारण त्यांचं टोपण नाव same असतं म्हणून. हा प्रसंग नेमका माझ्या बाबतीतच घडला. माझं आडनाव पटवर्धन त्यामुळे आमच्या घराण्याची टोपण नाव पटू , पट्या, पटी अशी. आता एकाच घरात जर ५ पटू किंव्हा पट्या एकत्र राहत अस...

" दत्तक "

Image
आदी ची आई : अरे तुला माहितेय का, आपल्या आदीच्या वर्गात ती परी आहे ना तिला म्हणे दत्तक घेतलाय. आदी चे बाबा : ओके, तुला कसं कळलं?  आदी ची आई: तिच्या शेजारीच माझ्या मैत्रिणीची बहीण राहते. तिच्याकडून कळलं.  .....तेवढ्यात आदी आत येतो... आई दत्तक म्हणजे काय?  काही नाही रे आदी दत्तक म्हणजे जी मुलं अनाथ आश्रमात असतात ना त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात त्यांना दत्तक म्हणतात. बरं तू जाऊन झोप आता, उद्या शाळा आहे ना.. ओके म्हणत आदी झोपायला जातो.  दुसऱ्यादिवशी शाळेत जायची तयारी सुरू असते, पण आदी च्या मनातून " दत्तक " हे काही गेलेलं नसतं आणि तो लगेच ठरवतो की शाळेत जाऊन पहिल्यांदा परी ला विचारायचं. तो शाळेत जातो आणि लगेच परी ला विचारतो की तुला दत्तक घेतलाय का ग? तुला अनाथ आश्रमातून आणलाय का ग? माझी आई म्हणाली की जी मुलं अनाथ आश्रमात असतात त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात.  परी ला काय बोलायचं ते सुचत नाही. ती गप्प बसते आणि फक्त एवढंच म्हणते आईला विचारून सांगते.. पण मनामध्ये खूप जास्त दुखावलेली असते. ती शाळा सुटल्यावर घरी जाते आ...

नाण्याच्या दोन बाजू....

Image
अरे ऐक ना, आज मी शाळेत गेलेले आपल्या चिनुच्या शिक्षकांना भेटायला. भरपुर कौतुक करत होत्या तिचं की ती खूप छान नृत्य करते आणि खूप छान प्रकारे सगळ्यांमध्ये रमते. पण...त्या हेही म्हणाल्या की तिला काऊंसेलींग (समुपदेशनाची) ची गरज आहे. शिक्षकांचं म्हणणं की ती डिस्टर्ब असते, ती सतत कुठल्यातरी विचारात असते आणि त्यामुळे तिला पटकन राग येतो. आत्ताच हे आपण नियंत्रणात आणलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.  अरे बोल ना काहीतरी, तुला काय वाटतं? बाबा : बघू वेळ आली की आत्ता काहीच गरज नाहीये. चल यार जेवायला बसुया.. ही परिस्थिती हल्ली बऱ्याच घरांमध्ये असते मात्र ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. काहींना पटतं तर काहींना पटत नाही. मुलं जेंव्हा आईच्या पोटात असतं अगदी तेंव्हापासून ते शिकत असतं. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे ते पण एक भाग असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संस्कार त्या बाळावर होतं असतात. असं वाटतं की त्यांना काहीच कळत नाहीये पण खरंतर अगदी पहिल्या दिवसापासून ते शिकत असतात. नऊ महिने मुलं पोटात असतं, तेंव्हा ते मुलं एकदातरी आपल्याला आतून विचारतं का हो की आज ...

बाबा गोष्ट सांग ना...

Image
बाबा गोष्ट सांग ना... गोष्ट, झोण्यापूर्वी गोष्ट सांगणं ही जणू काही एक परंपरा आहे आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे अजूनही ते चालू आहे. काळाप्रमाणे माणसाला बदलणं गरजेचं आहे अगदी तसचं आजच्या काळातल्या पालकांचं झालंय. आता तो काळ गेला जेंव्हा आपण मुलांना चिऊ काऊ च्या गोष्टी सांगायचो. हल्लीचा काळ हा super heros चा आहे. बरं आज एका सुपर हीरो ची गोष्ट सांगितली तर दुसऱ्यदिवशी नवीन गोष्ट चालतं नाही हा. एका गोष्टीत सुपर हीरो संपत नाही तर त्याच्या सिरीज लागतात. आणि मग तो सुपर हीरो जणू काही आपला घरचा सदस्य असल्यासारखा नांदायला लागतो. म्हणजे बघा ना घरात मुलांच्या खोलीत सुपर हीरो ची थीम पाहिजे. नंतर शाळेचं दप्तरापासून पेन्सिल आणि खोडरबर पण त्याचं तर थीम चं हवे.  खरंतर पालकांनी त्याचं आधार कार्ड आणि pan card काढायला हरकत नाही..😂😂... फारफार तर त्याला स्लीपिंग पार्टनर दाखवा...जो घरात काहीच करत नाही, जो घर खर्च ही करत नाही पण घरात वर्चस्व मात्र त्याचच चालतं. 😂. सुपर हीरो मुळे मुलांची कल्पनाशक्ती नक्कीच वाढते. इतक्या लहान वयात नवीन कल्पना सुचणं आणि त्याच्या आधारावर गोष्टी सांगणे हे मुलांच्या वय...

झोपेतली लंगडी

पाळणाघर, काही जणांसाठी आवडीची जागा असते तर काही जणांसाठी पर्याय नाही म्हणून राहायची जागा. हल्लीच्या काळात त्याला Daycare अस म्हणतात.  मी सुध्दा लहान असताना पाळणाघरात जायचे. खूप मजा असायची. आम्ही जवळपास १२-१३ मुलं होतो पाळणाघरात. बर आमचं पाळणाघर एका सोसायटी मध्ये असल्याने सोसायटी मधली मुलं आणि आम्ही अशी मोठी team असायची खेळायला. जरी सुट्टी असली तरी आई बाबांना सुट्टी नाही म्हणून आम्ही मात्र पाळणाघरात असायचो. मगं काय, संपूर्ण दिवस खेळ खेळायचे आणि नुसती धमाल करायची. सगळ्या मुलांमध्ये मी लहान होते. मला कोणी नाव विचारलं की मी नाही सांगायचे. कारण त्याच वेळी मला कळलं होतं की नावात काय आहे.😂😂..खरी गोष्ट ही होती की माझं आडनाव पटवर्धन आणि त्या वेळी मला र्ध म्हणता यायचा नाही. पण सांगणार कोणाला, तरी मी धीर करून सांगायला लागले की माझ नाव नेहा वसंत पटकनधर.. 😂🤦‍♀️🙈😂.. असा हा एक आणि अनेक किस्से पाळणाघरात घडले. त्यातला नेहमी लक्षात राहणारा किस्सा म्हणजे झोपेतली लंगडी.. मी साधारण पाचवीत किंव्हा सहावीत असेन. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पाळणाघरात सकाळपासून असायचो. आम्ही सगळ्यांनी लंगडी धावकी खेळा...

मतदान हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी निभवणारच....

इलेक्शन म्हटलं की काही वेगळच वातावरण असतं. प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असते की नक्की कोण जिंकून येणारं? आपण ज्याला मतं देऊ तोच येईल ना? दुसरा कोणी निवडून आला तर?  असे अनेक प्रश्न मनात असतात. तसेच जे पहिल्यांदा मतदान करणारे असतात, त्यांच्या पण मनात बरेचं प्रश्न असतात. मगं ते प्रश्न दोन तीन दिवस आधीच सुरू होतात. तसच काहीसं झालं माझ्या बाबतीत. मी पहिल्यांदा मतदान करणार होते. मी कधीच मतदान केलं नव्हतं. कारण काही कारणास्तव माझा इलेक्शन कार्ड चं आल नव्हतं. असो तर घडल असं की, इलेक्शन ला दोन दिवस बाकी होते. आणि मी माझ्या नवऱ्याला प्रश्न विचारत होते. की अरे परवा आपल्याला किती वाजता रांगेत उभे रहायचे आहे? बरं pan card लागेल का? नक्की procedure काय असते? तू थांबशिल ना माझ्याबरोबर? असे अनेक प्रश्न विचारले. हल्ली ह्या YouTube मुळे उत्तर देणं सोप्पं झालंय. त्याने सांगितलं की YouTube वर बघ तुला videos मिळतील. पहिल्यांदा मतदान करताना काय काय करायचं ते. असं सांगून हा जागरूक नागरिक झोपी गेला. मला पण त्याच्याकडूनच उत्तर हवं होतं. म्हणून मी पण videos नं बघता झोपून गेले. इलेक्शन ला एक दिवस बाकी ह...