आईचं पत्र हरवलं🤔🤔🤫🤫😂😂

आईचं पत्र हरवल ते मला सापडलं..... लहानपणी हा खेळ बऱ्याच वेळेला खेळायचो. पण सध्याच्या जगात असं बऱ्याच वेळेला जाणवतं की मुलींच्या आई पत्र लिहायला विसरल्या बहूतक🤔🤔🤔... कारण हल्ली मुलांच्या आई ची पत्र फारच फिरतं असतात सोशल मीडिया वर.🤐🤐🤐😂.. 

आणि सुरवात पण एकदम धडाकेबाज असते (मुलाचं लग्न करताय सावधान )... आणि मग त्याच्यात हल्लीच्या मुलींच्या वागुणुकीच वर्णन करतात...😂😂🧐🧐🤦‍♀️🤦‍♀️.....

बरं अपेक्षांमध्ये मुलगी modern हवी... आणि लग्न झाल्यावर हाच मॉडर्नपणा नकोसा होतो.... बरं जावयाचा उद्धार करणारी पत्र अजूनतरी दिसली नाहीत 🧐🧐😂😂🧐🧐.... पण सुनेचा उद्धार करणारी भरपूर दिसली... म्हणतात ना आज की नारी सबपे भारी 👩‍🏫👩‍🎓👩‍💻🧗🧘💇👰👩‍✈️👩‍🔬👩‍⚕️👩‍🏭👩‍🎨👩‍🎤🧕😂😂🤫🤫🤣... म्हणजे जसं रोज FB , WhatsApp ओपन केलं की आपल्या मित्र - मैत्रिणींचे लग्न झाल्याचे, डोहाळजेवणाचे, साखरपुड्याचे पोस्ट असतात.... अगदी तसचं मुलांच्या आईंची पत्र असतात... आणि मग त्यावर होणाऱ्या गंभीर चर्चा 😂🤣🤣🤫... 

अश्या वेळी खरंच वाटतं की काश मुलींच्या आईंनी पत्र लिहिली असती तर🤔🤔🤔🤔.... हल्लीच्या मुली आपली मतं मांडतात म्हणून त्यांचा उद्धार होतो की त्या स्वतःचा respect करतात म्हणून त्यांचा उद्धार होतो? आणि त्यातून जर मुलीने वेगळं राहायचं म्हटलं तर मग तर तिने न बघितलेल्या पिढ्या पण खाली येतात🤣🤣🤣🤣🤣🤣😇😇😇😇...... म्हणजे काय आज की नारी सबपे भारी 👩‍🏫👩‍🎓👩‍💻🧗🧘💇👰👩‍✈️👩‍🔬👩‍⚕️👩‍🏭👩‍🎨👩‍🎤🧕😂😂🤫🤫🤣 हे खरं केलं तर..... जावई as usual safe 🤣😂😎😎😎.... 
म्हणून मी म्हणाले आईच पत्र हरवल.......

*कोणालाही संबोधून म्हणायचं नाही.🙏🙏😊😊🙏🙏

Comments

  1. मुलीची आई न बोलताच काहीबाही शिकवते म्हणून आधीच बदनाम असते, त्यांचा बाब्या असतो, आणि सून ही कार्टीच असते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials