guests = relatives or audience = comfort zone ?

" आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. कळलं ना, घर नीट आवरून ठेव. आणि नीट वाग ते आले की, उगाच मला ओरडायला लावू नकोस...."
असे नेहमीचेच सवांद प्रत्येकाच्या घरात होतं असतात. पाहुणे येणार असं म्हटलं की घरातलं वातावरण काही वेगळच असतं. 

सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे कोण येणार आहे नक्की?  
कारण जसे खाण्याच्या पदार्थांना आपण आपल्या आवडी नुसार devide केलेलं असतं, अगदी तसंच पाहुण्यांना पण devide केलेलं असतं.. म्हणजे काही पाहुणे सारखे यावेत असे वाटते... काही पाहुणे आले तरी ठीक नाही आले तरी ठीक असे वाटते... आणि काही येणार असले की आधीच आपण घरी declare करतो, की मी उद्या बाहेर जातेय 😂😂🤫🤫🤐🤐... कारण आपण आपली comfort zone शक्यतो मोडण्याचा विचार नाही करत. 

बरं त्यातून घरी लहान मुले असली की मग ती मुलं फारच द्विधा मनःस्थितीत असतात. कारण तो त्यांचा performance चा दिवस असतो. म्हणजे जेवढं ऑडिशन्स ती मोठी झाल्यावर देत नाहीत, तेवढं ते लहानपणी पाहुण्यांसमोर देतात.😂🤣🤣😬😬🥺🥺🥺😰😰😵😵... 
कारण जसे पाहुणे येतात, तसे लगेच आई बाबा सूचना द्यायला लागतात, की अरे/अगं तुला शाळेत शिकवलं ते म्हणून दाखव, डान्स करून दाखव, तुझे certificates दाखव ना.. etc.....

 म्हणजे त्या मुलांना खरंच आश्चर्य वाटतं की हे पाहुणे इतक्या लांबून माझी कला बघायला आलेत की काय?🤣😂😂😂🧐🧐🙄🙄.... बरं एवढ्यावरती पाहुणे थांबत नाहीत, तर ते त्यांचं मतं दिल्यावरच थांबतात.. ते मतं चांगल असलं तर ठीक नाहीतर आई बाबांचे डोळे आपल्याला वेगळीच मतं देतात..🙄🙄😡😲😳🧐🤔.. 

Guests = relatives or audience हे जर confusion दूर करायचं असेल तर मुलांना ठरवू दे की त्यांना आज त्यांच्यातली कला दाखवायची आहे की नाही... कारण जसं आपण आपला comfort zone सांभाळतो तसा तेही त्यांचा comfort zone सांभाळतात.... जरुरी नाही की प्रत्येकवेळी त्यांनी पाहुण्यांसमोर perform केलंच पाहिजे.. आणि जरुरी नाही की घरातल्यांनी पण पाहुण्यांचा मान ठेवण्यासाठी मुलांना जबरदस्ती केली पाहिजे.... तरच मुलांची 
guest = relatives = comfort zone  ही व्याख्या तयार होईल....

* कुणालाही संबोधून म्हणायचं नाही...🙏🙏😊😊🙏🙏
#NehaP#

Comments

  1. सुंदर विचार, मुलांना गृहीत धरलं जातं खरं !!

    ReplyDelete
    Replies
    1. Hmmmmm... Anubhavache bol... Je mula shalet vyakta kartat

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials