# शिवम

#शिवम .... हे नक्की आहे तरी काय? 🤔? तर ही मनात आलेली एक संकल्पना आहे. 

आणि शिवम हेचं नाव का? शिव म्हटलं की आपल्याला नवरस आठवतात. त्याची सगळी रूप आपल्या समोर येतात. आणि नुसती समोर येतं नाहीत तर आपण तसे व्यक्त पण होत असतो. 

म्हणजे सोमवार ते रविवार आपण ९ पैकी ८ रस नक्कीचं बऱ्याच वेळेला वापरतो. म्हणजे अगदी खुद्द शंकराने वापरले नसतील तेवढ्या वेळेला आपण वापरतो.😂😂😂..  पण हास्य हा एकच रस असा आहे जो आपण मोजून मापून वापरतो. 

लहान असताना आपण कुठल्याही फालतू जोक वर हसायचो, अगदी कावळा चिमणीच्या पण.🤦🤦🤣🤣🤦‍♀️
पण आता जोक पण कसे matured हवेत. नाहीतर तुम्ही जोक बनता🤔🤔🤭😂😂😂. आणि मग नंतर एक डायलॉग मारायचा (आधी कसे होतो ना आपण) आणि मग परत हसायचं. आणि मग शेवटचा डायलॉग (बरं वाटलं यार बऱ्याच दिवसांनी बोलून).🤗🤗.. 

म्हणजे खरं तर आपण रोजचं जर आधी सारख्या गप्पा मारल्या(त्या कोणाशी पण असुदेत) तर शंकराला पण हास्य रस निर्माण केल्याचं आनंद मिळेल नाही का? 

* I was inspired by my student Shivaum. Who is a bundle of joy. And who showed me a different angle to Navrasa.... Thank u Shivam....


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials