माझ्यातली मी...🤗🤗

लहान असताना काय धमाल करायचे मी...🥳🥳😄😄.. आता किती बदल्ल्यासारखं वाटतं यार.... काश परत लहान होता आलं असतं तर, किती मज्जा आली असती... असे सगळे सवांद माझे माझ्या मैत्रीणी बरोबर फोन वर चालू होते... थोड्यावेळाने फोन ठेवतांना मी तिला म्हणाले की जाऊदे यार सवय झाली आता... आणि मग फोन ठेवून दिला... 
आणि मग काय , जसा फोन ठेवला, तसं प्रश्नाचं जाळं निर्माण झाले...
 खरंच हि मी आहे🤔🤔? का मी दुसऱ्याचं आयुष्य जगतेय? का रूटीन ची इतकी सवय झालिये की मी स्वतःला विसरून गेलीये?🙄🙄🧐🧐🧐🤔....
हळूहळू सगळं उलगडायला लागलं, की माझ्यातल्या मी ला , 
मी विसरून  गेलीये. 
असं म्हणतात की मुलीचं आयुष्य लग्नानंतर बदलतं... अर्थात् मुलाचं ही बदलत.... पण मुलींचे थोड्या जास्त प्रमाणात बदलतं. अगदी आडनांवापासून सगळं बदलतं...
आणि मग उरलेलं सगळं आयुष्य तिचं तीच्या माहेरच्या आडनांवाला सिद्ध करण्यात जातं. 
उदाहरण द्यायचं झालं तर आपली आई सुद्धा लग्नाच्या इतक्या वर्षानंतर तिच्या माहेरच्या आडनांवाचा जप करते. चारचौघात जर का तिच्या माहेरच्या आडनांवाचं कोणी असले तर काही वेगळंच तेज येतं चेहऱ्यावर. आणि मग वेगळीच ट्रीटमेंट मिळते त्या व्यक्तीला... 
आणि तो एक क्षण असतो जेव्हां तीला सुद्धा तिच्यातली ती मिळते. आणि त्या एका क्षणात लहानपणापासूनच अख्खं आयुष्य ती जगून घेते. 
अगदी तसंच झालं माझ्याबरोबर , त्या एका क्षणात मी माझे लहानपणापासूनचे अख्खं आयुष्य जगले.. आणि तो मााझ्या आयूष्यातला टर्निंग पॉईंट ठरला... 
लगेच ठरवलं की माहेरच्या आडनावानेच अभिमानाने जगायचं.....
कारण ती माझी ओळख आहे. आणि ते आडनांव माझा श्वास आहे.. 
आणि हो त्यानेच (आडनावानेच) मला मदत केली , माझ्यातल्या मी ला शोधायला. .......

*कोणालाही संबोधून म्हणायचं नाही.🙏🙏😊😊🙏🙏

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials