एक salute house hasband ना.🙏

कालच मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलत होते, की आजकाल Instagram वर सगळेच सेलिब्रिटी घरात कामं करत असल्याचे फोटोज् आणि व्हिडिओज टाकत असतात.    कारण त्यांनापण Rapunzel झाल्यासारखं वाटयाला लागलंय.. म्हणजे कसं सगळंच पहिल्यांदा 🙊😂....
नंतर घरातल्या बाईला मात्र सुट्टी नाही. तिला सगळचं करायचंय. ती मात्र कायमच काम करत असते. अश्या बऱ्याच प्सोट यायला लागल्या. आणि नक्कीच त्यांना सलाम.🙏. 
कारण कितीही झाल तरी तिची मात्र सुटका नसते घराच्या कामातून. आणि हो ह्या lockdown मुळे खाण्याच्या 
फरमैश भरपुरच वाढल्यात. आणि त्यातून घरात लहान मुलं असली तर पूर्ण दिवस स्वयंपाक घरात जातो... 
आणि काही पोस्ट lockdown मुळे घरी बसलेल्या पूरषांचे येतात, की ते किती मदत करतायत घरकामात... कारण त्यांनापण Rapunzel झाल्यासारखं वाटयाला लागलंय.😂🙊😂 .. सगळचं पहिल्यांदा. 
म्हणजे आत्ता जर आदेश बांदेकर त्यांच्याकडे होमेमिनिस्टर खेळायला आले तर नक्कीच पुरुष जिंकतील. कारण त्यांना घरात सगळ्या वस्तू कुठे ठेवल्यात ते माहीत झालंय...

असो, पण ह्या सगळ्यात मात्र आपण विसलरो ते house husband ना.. हो अगदी बरोबर वाचलत. ऐकायला वेगळं वाटलं ना. पण खरं आहे हे. 
आपण आपल्या संस्कृतीमध्ये किंव्हा चौकटीमध्ये इतके अडकलोय की, ही कॉन्सेप्ट चं आपल्याला पटत नाही. म्हणजे घरचा कर्ता पुरुष म्हणून तूच कमावलं पाहिजेस. तुला लाज वाटली पाहिजे की तू बायकोच्या पैश्याचं खातोस.. हे तुला शोभते का? असे त्यांना ऐकवले जाते. 
नक्कीच की हल्ली खर्च इतके वाढलेत की दोघांचा पगार पण कमी पडतो. पण त्याच बरोबर हेही खरे आहे की घरातल्या house wife ला आपण काहीच बोलत नाही ना. का तर ती 
प्रथा. मग तीच प्रथा पुरुषांसाठी वेगळी होते का? म्हणजे माणूस किती सोयीस्कर वागतो.
मला वाटलं की आज त्यांना पण सलाम केला पाहिजे. कारण ते house husband पण तेवढीच कामं करत असतात जेवढी की एक house wife करत असते. फरक एवढाच आहे,  की समाज काय म्हणेल म्हणून आपण त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यांना house husband बनून मज्जा येते असे वाटते का तर नाही. कारण त्यांना हे माहितेय की एकट्याच्या पगारावर खर्च भागणारे नाहीयेत. पण मग त्यातल्यात्यात हातभार म्हणून घरची सगळी जबाबदारी ते घेतात. तर काही कपल्स नी ते स्वतःहून decide केलेलं असतं आणि ते त्यामध्ये खुश असतात.
पण आपल्याकडे समाजाच्या विचारांना इतकं महत्व दिलं जातं की त्या चौकटीतून बाहेर येणार कसं. 
सगळ्यांना तर आपण बदलू शकत नाही, पण छोटंसं योगदान करू शकतो.
आणि ते योगदान ह्या house husband सलाम करून केलं तर? 

#NehaP# 

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही. 

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials