कोरोनाची शाळा

अरे तू जरा नीट वागशील का?  कधी तुझी शाळा सुरू होणार 😵😵.... एकदा का शाळा सुरू झाली ना की जरा शांतता मिळेल मला... सध्या घरोघरी हेच सवांद चालू असतील. 
म्हणजे आज कोरोनामुळे का होईना ,पण शिक्षकांची आठवण  आणि त्यांच्या बद्दलचा मान खूपच वाढला असेल. 
सध्याच्या काळात इतके रुल्स आहेत शिक्षकांना, की त्यांचं शिकवणं पण formality झालीये. कारण हल्लीची मुलं शिक्षकांना हे बोलायला पण कमी करत नाहीत, की तुम्ही मला ओरडलात तर माझ्या पालकांना नाव सांगेन. मला आई ने सांगितलंय की teacher शिक्षा नाही देऊ शकत. 
तेव्हा खरंच आपल्या पालकांबद्दल आदर वाढतो, कारण अजूनही आपले शिक्षक जर समोर आले तर एक आदर आणि भीती वाटते आणि एकदम बाई नमस्ते असं तोंडून येतच..
असो, पण ह्या कोरोनाचा एक फायदा नक्कीच झाला, मुलांना त्यांचा हवा असणारा आई बाबा चा वेळ मिळाला. 
कोरोनामुळे मुलांची mother's day आणि  father's day 
ची व्याख्या बदलेल.... 
नाहीतर हल्लीच्या मुलांना mother's day का सेलिब्रेट करतात असं विचारलं तर मुलं म्हणतात की मम्मा आम्हाला मॉल ला घेऊन जाते, मोबाईल देते म्हणून... 
आज खऱ्या अर्थाने कुटुंबातील materialistic प्रेमाचं महत्व नाहीस होईल..... 
नक्कीच सगळ्यांनी सुरक्षित राहणं जास्त महत्वाचं आहे आणि देवाकडे एवढीच प्रार्थना की कोरोना लवकर निघून जाऊदे...

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही. 

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials