अ. वि. उ. वि.
अ. वि. उ. वि कितीही सरळ जायचं ठरवलं तरी "विचार" ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला द्विधा मनस्थितीत टाकते. सरळ जाणाऱ्याला वाकडी तिकडी वाट घ्यायला भाग पाडते. "विचार" येताना एकटेच येतात. आपण त्याला विशेषण देतो, "अति विचार आणि"उगाच" विचार आणि सगळं बदलून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात की एक छोटीशी गोष्ट असते पण आपण त्याला खूप मोठ् रूप देतो. सगळेच विचार हे शुल्लक नसतात. काही विचार इतिहास घडवून गेले आहेत. विचारांवर विजय मिळवणे हे प्रत्येकाला शक्य असते पण तो विजय मिळवताना वेळ किती लागेल हे स्वतः ला निश्चित करावे लागतो. लहान मुलं असुदे किंवा मोठी व्यक्ती असुदे, नेहमीच आपण ऐकत आलोय की उगाच विचार करत बसू नकोस. अति विचार करत बसू नकोस. बऱ्याच वेळेला आपली तंद्री लागलेली असते आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्याला विचलित करते. असं म्हणतात की माणसाचा मेंदू एका मिनिटात ३८-४५ विचार निर्माण करते म्हणजे दिवसभरात सुमारे ५००००-७०००० विचार. ( Google वर मिळालेला नंबर ) एवढं नक्की की आकडा खूप मोठा आहे. पण सगळ्याच विचारांकडे आपण लक्ष देत नाही. कधीकधी विचारांमध्य...