गुरु - सगुण रुपात
गुरु - सगुण रुपात की निर्गुण रुपात? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला उणीव भासते ती एका अश्या व्यक्तीची जी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत धीर देईल. एक अशी व्यक्ती जिच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि निश्चिंत होतो.. एक अशी व्यक्ती जी आपल्याला मार्गदर्शन करेल... बरं ही उणीव अगदी लहान असल्यापासून आपल्याला भासते. उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी आपल्याला आई बाबांच्या ओरडण्यापासून वाचविणारे काका काकू असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा ताई दादा असेल. आपल्याला ती व्यक्ती जणू काही एक आधारस्तंभ वाटायला लागतो. शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी आपले आधारस्तंभ होतात. तसं बघितलं तर प्रत्येक टप्प्यात आपल्याला आधाराची गरज असते. मगं अश्या एक किंवा अनेक व्यक्ती असतील. जसजसं आपण मोठे होतं जातो तसतसं आपण अनुभव घेत, व्यक्तींचे अनुभवांच्या अनुषंगाने द्विभाजन करत जातो. मनुष्याचे संपूर्ण आयुष्य नेमका खरा गुरू कोण हे ओळखण्यात जातो. गुरू ची परिभाषा, त्यांचं वर्णन म्हणजे केशरी रंगाचा पोशाख, रुद्राक्षाच्या माळा, मस्तकी भस्म किंवा अंगारा आणि नेहमीच सकारात्मकतेने मार्गदर्शन करणारे अशी व्य...