Posts

Showing posts from August, 2024

सेम पेज

" हम तुम " हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. कारण त्यामधला एक लोकप्रिय संवाद की, "हर किसी की कोई ना कोई कहानी होती हैं" | हा सगळ्यात जास्त मला मनाला आवडला..काही नाती आयुष्यभरासाठी टिकतात तर काही एका दिवसात संपतात...  ह्याचाच अर्थ त्या नात्यांमधल पुस्तकं हे छोटं किंवा मोठं असू शकतं. " वाचाल तर वाचाल " ही म्हण आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत आलोय. मगं ते वाचन पुस्तकांचं असेल किंवा आयुष्यात येणाऱ्या नात्यांचं. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सेम पेजवर असण. कारण जसं आपण म्हणतो की पुस्तकांचं वाचन करताना तुम्ही जर ते टप्प्यात केलं तर दुसऱ्यादिवशी तुम्हाला संदर्भ लागला पाहिजे. अगदी तसचं नात्यात पण आपण काल ज्या पानावर होतो तिथूनच पुढे दोघांनी सेम पेजवर असण महत्वाचं आहे. कितीही झाल तरी पुस्तकात आपण एखादी निर्जीव वस्तू खूण म्हणून ठेवु शकतो, जी आपल्याला दुसऱ्या दिवशी काल शेवट कुठे केला ते दाखवते. पण नात्यांचं तसं नाहीये कारण काल शेवट कुठे केला हे आपलच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तिथून पुढे सुरवात करताना त्या दोन व्यक्ती सेम पेजवर असण  गरजेचं आहे.  मगं ते नातं नवरा बायकोच अस...