दार उघडं बये दार उघडं....


दार उघड बये दार उघड....

नाही नाही, मी काही होम मिनिस्टर मध्ये भाग नाही घेतला... पण सध्या हे गाणं म्हणायची वेळ त्या लोकांवर आलीय, ज्यांना आपण घरकोंबडी / घरकोंबडा म्हणायचो..😂😂..

म्हणजे खरं तर ज्यांना घरी बसायची सवय नसते त्यांना तर हे quarantine खूपच कठीण जातंय. पण सगळ्यात जास्त कठीण परिस्थिती घरकोंबडी / घरकोंबडा ज्यांना म्हणायचो त्यांच्यावर आलीये.😂😂😆😷😷

म्हणजे बघा ना, गर्दी आवडत नाही म्हणून किंव्हा लोकांशी बोलायला आवडत नाही म्हणून आणि मुख्य म्हणजे आपली comfort zone शक्यतो तोडायला आवडत नाही म्हणून ही लोकं घराच्या बाहेर पडत नाहीत किंव्हा जास्त मिक्स होतं नाहीत. पण ह्या कोरोनाने तर ह्यांना पण भांबावून सोडलाय. म्हणजे घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा माणसंच माणसं.. 😵😵

बरं ही माणसं त्यांना शांत पण बसू देत नाहीयेत. म्हणजे अगदी बोलायचं झालं तर quarantine ची सुरवताच त्यांच्या मुलाखतीने झाली.. 
तर प्रश्न असे होते की, सकाळी उठून तुम्ही काय करता?  तुमचा वेळ तुम्ही कसा घालवता? तुम्हाला कंटाळा कसा येत नाही? बरं तुम्ही असे किती दिवस राहू शकता? तुमचे छंद काय काय आहेत? तुमचं उत्पन्न कसं होतं? वगैरे वगैरे...
बरं एवढ्या वरती तरी त्यांनी थांबावं नं.. तर नाही सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी विचारला की हे सगळं तुम्ही रोज करता का ३६५ दिवसाला वेगवेगळे दिनक्रम आहेत? 

बरं पहिला दिवस म्हणून शांतपणे घरकोंबडी / घरकोंबडा ह्यांनी उत्तरं दिली.
 पण नंतर मात्र जसा उन्हाळा वाढत चाललंय तसा त्यांचा पारा पण वाढायला लागला... आणि हे सगळं झाल्यावर घरकोंबडी / घरकोंबडा ह्यांनी एकच प्रश्न घरातल्यांना विचारला, की तुम्ही घराच्या बाहेर कधी जाणार?😟🥺😕😖😰🤯🤯
मला वाटतं ही लोकं सगळ्यात जास्त प्रार्थना करत असतील देवाकडे, की कोरोना लवकर नष्ट होऊदे आणि सगळे घराच्या बाहेर जाऊदेत. 

असो, ह्या निमित्ताने का होईना पण कोरोनाला नष्ट कर रे देवा 😃🙏😃

#NehaP#

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials