भोलानाथ का रे वागलास असं?

ह्या कोरोनाने सगळ्यांचं आयुष्य हलवून टाकलंय....म्हणजे बघा ना किती ते विनोद वर्क फ्रॉम होम वरती... नंतर बायकोशी नीट वागा, कारण हॉटेल्स बंद आहेत... आणि नंतर हल्लीची मुलं किती नशीबवान आहेत, का तर परीक्षा नाही, शाळेला सुट्ट्या.. म्हणजे cherry on top म्हणतात ना अगदी तसं....

पण सगळ्यात जास्त feel झालाय ते ऐंशितल्या पिढीला... कारण आमचीच पिढी नुसती भोलानाथ ला साकडं
घालत बसली, ह्या आशेवराती की कधीतरी भोलानाथ आमचं ऐकेल. पण कसल काय ना कधी शाळेभोवती तळे साचले,  ना कधी पोटात कळ येऊन ढोपर दुखलं आणि नाही कधी गणिताचा पेपर बुडाला...
 श्या बाबा...😏😒😒... 
पण आज ह्या कोरोनामुळे मुलांना शाळेला नाही तर परीक्षेला पण सुट्ट्या मिळाल्या... काय ना.. 
बरं नुसत्या सुट्ट्या नाहीत ह तर परिक्षेशिवाय पुढच्या वर्गात पण गेली ही मुलं.... 
आणि म्हणून आम्ही भोलानाथ ला बोलावलंय. जाब विचारायला, की काय रे बाबा आमचं गाणं आवडलं नाही? का आमचा सुर आवडला नाही तुला? 
नक्की प्रॉब्लेम काय होता तुला भोलानाथ?
आणि प्लीज नुसतं बुगुबुगुबुगु करू नकोस.... 
भोलानाथ : अरे खूप वाटायचं तुमच्या गाण्यातला प्रत्येक शब्द खरा करावासा.. पण जेव्हा तुम्हाला मी शाळेत जाताना बघायचो, शाळेत खेळताना बघायचो, शाळेतलं आयुष्य
 सुंदरपणे जगताना बघायचो, शाळा सुटल्यावर गाडीवरची 
बडीशोप खाताना बघायचो, शाळा सुटली तरी घरी जाण्यासाठी आळस करताना बघायचो अश्या बऱ्याच आठवणी आहेत.. तेव्हा खरंच कधी नाही वाटलं रे की तुमची शाळा बंद पडावी म्हणून... कारण तुमचा निरागस पणा आणि तुमचं शाळेबद्दलच्या प्रेमाने मला जास्त भारावून सोडलं. 
आणि म्हणून मी तुमच्याशी असा वागलो... पण तरीही तुम्हाला वाटत असेल की मी चुकलो तर ठीक आहे मी परत तुम्हाला भेटायला नाही येणार... आणि तसं बघितलं तर हल्लीच्या मुलांना तर मी माहितीच नाहीये... 

खरंच रे भोलानाथ, तू होतास म्हणून आम्हाला तुला सारखं बोलवावसं वाटायचं... नाहीतर हल्ली कोरोना गो गो कोरोना 😃🤣😂😆😆असं म्हणावं लागताय.....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials