मोठी झालेली लहान मुले...🤔🥺🤫🤐😬🙄😂😊

हो... हो... अगदी बरोबर वाचलत. मोठी झालेली लहान मुले. ह्यांच्या बद्दलच बोलायचं आहे मला. तुमच्या मनात विचार येतील सुद्धा की मुलं मोठी झाली तर ती लहान कशी?
.... 🤔🤔...

शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे बरेचं अनुभव आले. आणि त्यात हा मुद्दा नेहमीच समोर आला, की ५-६ वर्षाच्या मुलांना बऱ्याच वेळेला तू मोठी झालीस किव्हां तू मोठा झालास असं म्हटलं जातं. आता तू असा नाही वागायचं, असं हि म्हटलं जातं. पण खरंच ती एवढी मोठी असतात का की कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं ते त्यांना कळेल?

किंबहुना तू आता ताई झालीस किव्हां तू दादा झालायस म्हणून तू मोठा झालास की व्याख्या कितपत बरोबर आहे?

आपल्याकडे (मोठी झालेली लहान मुले ) जर मोठ्यांसारख बोलायला लागली तर लगेच त्यांना सांगितलं जातं की बाबारे तू लहान आहेस, लहनांसारख वाग. आम्ही तुझ्या वयाचे असताना आगाऊ पणे बोलत न्हवतो. म्हणजे आपणच जर का क्लिअर नसू आपल्या (मोठ्या झालेल्या लहान मुले ) ह्यांच्या व्याखेवरती तर त्यांच्याकडून समजूतदार पणाची अपेक्षा करणं किती चुकीचे आहे आणि किती बरोबर आहे? (हे आपणच ठरवायला हवे नाही का? ) 

जेव्हां इतकं confusion असतं तेव्हां त्यांच्या मनात खोलवर किती confusion 🙄🙄😬🤐🤫🤔🥺असेल ह्याचा विचार करणं पण खूप अवघड आहे. आणि त्यातून ती जर का मोठी ताई किव्हां मोठा दादा असेल तर मग तर बघायलाच नको. कारण तेव्हां त्या मुलांवरती ताई/दादा झाल्याची जवाबदारी पण असते आणि त्यांच्यांतल लहानपण बाहेर काढण्याची इच्छा सुद्धा. आणि ते समजणं खूप कठीण आहे. 

आणि ते confusion जर दूर करायचं असेल तर त्यांना पण लहान असल्याचा आनंद मिळाला पाहिजे नाही का? (अजुन खुप आहे लिहायला पण ते पुढच्या blog मध्ये नक्की. )

*हे मला कोणालाही संबोधून म्हणायचं नाही 🙏🙏😊😊🙏🙏. माझे विचार मी मांडले.. 

#NehaP#


Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials